निवडणुकीचा शिमगा संपला…आता त्याचं ‘कवित्व’ समस्त कामगार-कर्मचारीवर्गाला भोगावं लागणार आहे!
महाराष्ट्राची निवडणूक आटोपताच ‘बीजेपी’चा हत्ती…आपले खरे दात दाखवायला लागलाय. भाजपा( NDA) सरकारने आता तीन काळ्या कामगार-कायद्यांनी बनलेली ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) झपाट्याने लागू करायला घेतलीय…कल्पनातीत अशा भयंकर गुलामगिरीला व कंपनी-दहशतवादाला रोजच्या रोज तोंड देत काॅर्पोरेटीय क्षेत्रात आणि इतरही छोट्यामोठ्या कंपन्या-कारखान्यांमधून सगळ्यांनाच नोकरी मुठीत धरुन जगावं लागणार आहे…
या भयंकर दुरवस्थेतून कामगारांना केवळ आणि केवळ, एकच राजकीय पक्ष बाहेर काढू शकतो…त्याचं नाव *’धर्मराज्य पक्ष’!
…त्यासाठी, धर्मराज्य पक्षाचे सभासद व्हा, धर्मराज्य पक्षाच्या राजकीय-धोरणांना पाठिंबा द्या, धर्मराज्य पक्षाचे आमदार-खासदार निवडून द्या… तर आणि तरच, काही तरणोपाय आहे…अन्यथा, ‘भाजप-संघा’च्या’ कामगारद्रोही खोल ‘भांडवली-डोहा’त, तुम्हीही बुडाल आणि बुडताना भ विष्यातल्या मराठी पिढ्या पिढ्यांनाही बरबाद करुन जाल…!!!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
(सदरहू संदेश पाठवताच, एका ‘देशपांडे’ आडनावाच्या कट्टर (म्हणजेच, निर्बुद्ध…दगडासारखा काहीही व कितीही व्यवहारात विपरीत आढळले तरी अपरिवर्तनीय रहाणारा) भाजप-संघीय ‘अंधभक्ता’चा एकदम पोटशूळ उठला आणि तो प्रतिक्रिया लिहीता झाला की, “राजन राजे, बेडूक कितीही फुगला तरी व्यर्थ. तुमचा धर्मराज्य पक्ष किती जणांना माहित आहे, याची आधी माहिती घ्या…” तेव्हा, शांतचित्ताने त्या ‘विचारवंता’ला नव्हे; तर, ‘विखारजंतू’ला लागलीच खालीलप्रमाणे नुकतंच मी उत्तर दिलं, ते वाचकांसमोर नम्रपणे ठेवतो….)
कसं आहे देशपांडेराव…( खरं म्हणजे, डराव डराव) की, ईव्हीएम मधल्या बेईमानी आणि फसवणुकीने बेडकाचा बैल (तो ही अदानी-अंबानीसारख्यांचा ‘काळा-पैसा’ खाऊन खाऊन धष्टपुष्ट झालेला) होण्यापेक्षा…प्रामाणिकपणे, मेहनतीने, चिकाटीने बेडकाचा सच्चा बैल (तुमच्या ‘संघ-बीजेपी’सारखा लुच्चा नव्हे) होण्याचा प्रयत्न करणं, काय हो वाईट…??? आमच्या ‘धर्मराज्य पक्ष’ नावाच्या बेडकाचा बैल झाला तर, त्यात मराठी जनतेचं सर्वंकष कल्याण आहे, गुजराथी-भाषिक भांडवलदारांच्या गुलामगिरीतून त्यांची मुक्ती आहे …न झाला; तर, नुकसान आमचं वैयक्तिक थोडंच होणार आहे? परमेश्वरानं आम्हाला काहीही कमी ठेवलेलं नाही…आम्ही आजही सुखात आहोत आणि ईश्वरी कृपा राहिली तर, उद्याही राहू! तेव्हा, सामान्य मराठी-माणसांच्या (तुमच्यासारख्या कमवून बसलेल्या गब्बर मराठी-लोकांसाठी नव्हे) भल्यासाठीच केवळ आम्ही तडफडतो आहोत… बेडकाचा बैल व्हावा यासाठी आमचा वेडावाकडा कुठलाही आग्रह नाही, झालाच तर तो सरळ मार्गाने व्हावा… न झालाच तर आमचं काडीचंही नुकसान नाही. उलट, आयुष्यात प्रथमच शेवटी शेवटी का होईना; पण, चांगला आराम मिळेल!
लक्षात घ्या, श्रीकृष्णाने गीतेत ‘कर्मसिद्धांता’द्वारे सांगून ठेवलंय (जसे, मुस्लिम-अतिरेकी कधि कुराण वाचत नसतात; तसेच, तुमच्यासारखे म्हणजेच, भाजप-संघाच्या ‘अंधभक्तां’सारखे, बनावट-बेगडी हिंदुत्ववादी… गीता कधि वाचत नसतात; फक्त, हिंदूहिंदू म्हणून नाचत असतात) की, तुम्ही वाईट कर्म करत फार झपाट्याने मोठे होता (जसा तुमचा खासमखास ‘अदानी’ झाला); पण ते पहात नियती खदा खदा हसत असते आणि तुमच्या कर्माचं ‘कर्मफळ’ पक्व होताच, पदरात यथावकाश पापाचं ‘माप’ टाकतेच.
तुमच्याच म्हणण्यानुसार, दिड हजाराच्या क्षुद्र मोहाने महायुतीला मतं देणाऱ्या व प्रत्यक्षात ‘लंकेची पार्वती’ असणाऱ्या दरिद्री ‘लाडक्या बहिणीं’हूनही, लोकलज्जा सोडलेल्या तुम्हा लोकांचा अति अति लाडका ‘अदानी’…आता श्रीकृष्णाच्या ‘कर्मसिद्धांता’चा अनुभव लवकरच घेईल आणि तुमचे मोदी-शाह त्याला तारु तर शकणार नाहीतच; पण, तसा काही प्रयत्न त्यांनी केला तर, स्वतःच गोत्यात येतील… तेव्हा, केल्या महापातकांमुळे काळाच्या ओघात पुन्हा ‘बे एके बे’ या पूर्वीच्या लोकसभा-सदस्य संख्येला भाजप ‘भोज्या’ करेलच, याची खात्री बाळगा…फक्त, ही ‘बीजेपी’ची जादूची पोतडी असलेलं EVM, तीव्र जनआंदोलनातून एकदाचं नाहीसं होऊ द्या पुन्हा ‘कागदी मतपत्रिके’वर (Ballot Paper) मतदान करणं, सुरु होऊ द्या…कारण, त्या निवडणूक-आयोगाच्या पिंजऱ्यातल्या ‘EVM’ नावाच्या पोपटातच ‘भाजप’ नावाच्या राक्षसी पक्षाचा ‘प्राण’ दडलेला आहे…तो पोपटच मारुन टाकल्याखेरीज ‘भाजप’ नावाच्या राक्षसाचा ‘राजकीय-मृत्यू’ होणे नाही… “गुहेतल्या पिंजऱ्यातला पोपट मारल्याशिवाय राक्षस मरणार नाही”, हे एखाद्या सुरस कथेतल्या राजपुत्राला जसं रहस्य उमगतं…तसंच, आजच्या भारतीय-जनतेच्या हृदयातल्या व लोकशाहीला काळजीपूर्वक जपणाऱ्या ‘आधुनिक राजपुत्रा’ला (ज्याला, तुम्ही ‘शहजादे’ म्हणून करोडो रुपये खर्च करुन आजवर हिणवत आलात, तोच तो) चांगलंच उमगलंय…त्याकामी, संपूर्ण भारतीय जनता ‘भारत जोडो’ पदयात्रेसारखीच त्याच्या खंबीरपणे पाठिशी उभी राहील…लोकसभा-निवडणुकी पाठोपाठ महाराष्ट्र-विधानसभा निवडणुकीतल्या EVM हेराफिरी आणि बड्या गुजराथी-भांडवलदारांच्या काळ्या पैशाच्या पेरणी-फिरवाफिरवी नंतर भाजपाच्या अंताची सुरुवात झालीय…बस्, देखते रहो!