मुसलमानांची जिरवायची म्हणून मराठे भाजपसोबत, मराठ्यांची (जरांगे-पाटलाची) जिरवायची म्हणून ओबीसी भाजपसोबत, प्रकाश आंबेडकरांच्या मागणीला (‘अंगापेक्षा बोंगा मोठा’, असा तो ‘अतिहावरेपणा’ला का असेना) कधिच सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत; म्हणून, ‘मविआ’ची जिरवायला ‘दलित’ भाजपसोबत आणि शिवसेनेनंच ‘भाजप-संघा’ला मोठं केलं; म्हणून, शिवसेनेची जिरवायला ‘मुसलमान’ भाजपसोबत….
…ही विधानसभा-निवडणूक म्हणजे, “मत अडवा, मत जिरवा”, असा कुठला ‘जिरवाजिरवी’चा ‘एक कलमी’ किंवा ‘किमान समान’ (CM…Common Minimum) ‘महाराष्ट्रीय-कार्यक्रम’ होता?
…जसा ‘गटारी’, हा महाराष्ट्रीय-सण बनलाय अलिकडे, तसं काही घडलंय का? …एवढी राजकीय-दारु, मराठी माणसांच्या डोक्यात ‘झिंग झिंग झिंगाट’ करत धुमशान घालायला लागलीय??
…की, फाटक्या संसाराची गोधडी शिवण्यासाठी गुलाबी रिक्षा चालवण्याची शिकस्त करणाऱ्या व ‘दिड हजारा’त गुलाम बनायला तयार असणाऱ्या बहिणींच्या लाचारीचं हे लाजिरवाणं दर्शन मानायचं… की, की, ‘कंत्राटी-गुलाम’ असलेल्या त्यांच्या नवर्या/भावांच्या अगतिकतेचं-हतबलतेचं हे उघडंनागडं प्रदर्शन समजायचं???
…अजून काय काय वेगळे अर्थ काढायचे…या EVM ‘निवडणूक-सेटिंग’च्या; तसेच, काळा पैसा-उधळणीच्या (‘काळा-भंडारा’) ‘करेक्ट-कार्यक्रमा’ला…भाजप-संघाच्या खलनायकी-प्रचार-यंत्रणेकडून समजून घेताना आणि आपणच आपली गांडू समजूत करवून घेताना…???
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)