**’आय.क्यू.’ (I.Q.) अतिशय कमी असलेला पहिला पंतप्रधान… उदा. गटारातल्या गॅसवर स्वयंपाक करणारा, पाकिस्तानच्या रडारला चकवण्यासाठी ढगाआडून सर्जिकल-स्ट्राईक करणारा आणि अस्तित्वात नसलेल्या रेल्वे-स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर चहा विकणारा…समजा, अशातऱ्हेनं पंतप्रधानांच्या बुद्धीवर टिपणी केल्याबद्दल; जर कुणावर बदनामीचा खटला भरला गेला आणि न्यायाधीशाने कुणाला शिक्षा केलीच; तर, ती यासाठी असेल की, त्याने ‘भारताचं सर्वोच्च राष्ट्रीय गुपित’ जगासमोर उघडं केलं म्हणून….
**शैक्षणिक पदवीसह, आपल्या वैवाहिक ‘सिंदूरा’चा थांगपत्ता लागू न देणारा पहिला पंतप्रधान….
**कोणी ऐको न ऐको सतत ‘मन की बात’ करणारा; पण, ‘जन की बात’ साफ ठोकरणारा पहिला पंतप्रधान….
**थापेबाजी, जातधर्मविद्वेष व ढोंगबाजीचा शब्दशः कहर माजवणारा पहिला पंतप्रधान….
**डोनाल्ड ट्रंपसारख्या विकृत, गुन्हेगार व बलात्कारी राष्ट्रप्रमुखाचा खास दोस्त असलेला पहिला पंतप्रधान….
**‘‘न खाऊंगा, न खाने दूंगा’’, अशी भंपक घोषणाबाजी करत भ्रष्टाचाराला नुसती मोकळीकच नव्हे; तर, प्रचंड उत्तेजन देणारा व भ्रष्टाचाराचं ‘संस्थानीकरण’ करणारा पहिला पंतप्रधान (उदा. इलेक्टोरल-बाॅण्ड आणि PM-Care घोटाळा आणि देशातल्या बड्या राजकारणी भ्रष्टाचार्यांना पक्षात व मंत्रिमंडळात ‘पावन’ करुन घेणे)….
**निवडणूक-आयोगाला ताटाखालचं मांजर बनवून ‘निवडणूकपूर्व व निवडणूकपश्चात’ अशा दोन्ही घोटाळ्यांतून, निवडणूक-प्रचारातील बेधडक ‘जुमलेबाजी’तून; तसेच, EVM घोटाळ्यातून व बड्या भांडवलदारांच्या प्रचंड काळ्या पैशातून निवडणुका जिंकणारा पहिला पंतप्रधान….
**निवडणूक हरल्यास ईडी/सीबीआय/आयटीच्या धाकदपटशहाच्या माध्यमातून विरोधी पक्षांचे खासदार/आमदार फोडून गैरमार्गाने सत्तासोपान चढणारा व चढवणारा पहिला पंतप्रधान….
**चीनला लडाखच्या गलवान खोर्यातील ४ हजार चौ. कि. मी. भारतीय भूमी ‘दान’ देणारा, सर्जिकल-स्ट्राईक्सची ‘सत्यस्थिती’ लपवून ठेवणारा आणि ‘फेल्ड-स्टेट’ असलेल्या पाकिस्तानसमोर ‘फेल’ ठरणारं ‘राफेल’ खरेदीचा घोटाळा करणारा पहिला पंतप्रधान….
**’विश्वगुरु’ म्हणवणारा; पण, जनतादलातल्या नेत्यांना जसे अनुयायी नसतात…तसा, जगभरात कुणीही त्याचा ‘शिष्य’ वा अनुयायी (अगदी मित्रसुद्धा) नसलेला पहिला आगळावेगळा ‘विश्वगुरु पंतप्रधान’….
**राममंदिर उभारणारा; पण, गेल्या एका तपात देशभरात सामान्य जनतेसाठी एकही नाव घेण्याजोगी ‘सार्वजनिक शाळा-शिक्षणसंस्था’ अथवा ‘सार्वजनिक इस्पितळ’ ‘न’ उभारणारा पहिला पंतप्रधान….
**श्रीमंत बापाच्या बेजबाबदार उधळ्या मुलासारखी, ‘‘देशाची मूलभूत साधनसंपत्ती असलेले सार्वजनिक प्रकल्प-उद्योग, जमिनी, खाणी, जंगलं विकणारा’’ आणि निव्वळ आपल्या निवडक बड्या भांडवलदार-मित्रवर्गाचं ‘उखळ पांढरं’ करण्यासाठी सरकारी-दहशतीने बेलगाम ‘खाजगीकरणा’चा बुलडोझर चालवणारा पहिला पंतप्रधान….
**’’रोम जळत असताना फिडेल वाजवणाऱ्या निरो’’सारखा…मणिपूर जळत असताना बेफिकिरीने वावरणारा व आजतागायत मणिपुरसारख्या अशांत प्रदेशात पायदेखील न ठेवणारा पहिला बेजबाबदार पंतप्रधान….
**पत्रकार-परिषद घेण्यास घाबरणारा, तरीही ५६’’ छातीचा बेमालूम देखावा आपल्या ‘अंधभक्तां’साठी उभा करणारा; तसेच, टेलिप्राॅम्टरच्या मदतीने भाषणे करणारा पहिला पंतप्रधान….
**हजारो कोटींची विमाने-गाड्या, लाखो रुपयांची जॅकेट्स, अत्यंत महागडी घड्याळे-गाॅगल्स व इतर किमती चीजवस्तू वापरुनही स्वतःला ‘फकिर’ संबोधण्याची हिंमत दाखवणारा पहिला ढोंगी पंतप्रधान….
**कायदेशीर बंदी असतानाही लष्करी-गणवेष ‘फॅशन शो’सारखा वापरणारा पहिला पंतप्रधान….
**कामगारांचं व कामगार-चळवळीचं पूर्ण खच्चीकरण करण्यासाठी ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour Code) लादून, त्यांना गुलामगिरीत ढकलू पहाणारा पहिला पंतप्रधान….
**सरतेशेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ‘‘भारतीय जनतेच्या शिव्याशापांचा सगळ्यात मोठा ‘धनी’ असूनही EVM मधून धो धो मतं मिळवण्याचा चमत्कार घडवणारा’’ पहिला आणि शेवटचा सेटिंगबाज पंतप्रधान….
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)