जशी, फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी जागतिक-महामंदीनंतर अमेरिकन अर्थव्यवस्था व सामान्यांची दारुण अवस्था सावरताना…’नव्या करारा’द्वारे (New Deal) भांडवलदारांच्या नाकात वेसण घालून एकप्रकारे निश्चित केली होती!
…अमेरिकेची लोकसंख्या मर्यादित असली तरी दरडोई ‘कार्बन-ऊत्सर्जन’ भारतीयांच्या कैकपटीने असल्यानेच, प्रत्यक्षात ते संपूर्ण भारतीय लोकसंख्या जेवढं कार्बन-प्रदूषण करते…त्याहूनही अधिक प्रदूषण करत ‘जागतिक तापमानवाढी’त मोठी भर घालतेय…तेव्हा, ही ओंगळवाणी अतिश्रीमंती, केवळ मानवीय-दृष्टीकोनातूनच पहाता आता ‘अमानुष व घृणास्पद’ राहिलेली नसून; ती मानवी-अस्तित्वासह अवघ्या सजीवसृष्टीलाही मारक ठरु पहातेय!
भले, ॲमेझाॅनवाला अब्जोपती (खरंतरं, खर्व-निखर्वपती) ‘जेफ बेझोस’ला जागरुक अमेरिकन नागरिकांच्या आंदोलनामुळे आपल्या ‘घोड-लग्ना’चं स्थळ बदलावं लागलं असलं; तरीही, भांडवली प्रदूषणकारी व शोषक प्रवृत्ती, ती आणि तशीच आहे…आपल्याकडे नाही का अंबानीच्या मुलाच्या लग्नात वेगळं कुठे काय घडलं…???
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)