कंत्राटी-कामगार पद्धतीने कामगारविश्वात घातलेल्या अमानुष हैदोसाने, आता लांछनास्पद कळस गाठल्याचं, हे व्यवच्छेदक लक्षण होय!

कंत्राटी-कामगार पद्धतीने कामगारविश्वात घातलेल्या अमानुष हैदोसाने, आता लांछनास्पद कळस गाठल्याचं, हे व्यवच्छेदक लक्षण होय!
गुलामगिरी व नव-अस्पृश्यतास्वरुप असलेली कंत्राटी-कामगार पद्धतीची ‘अवदसा’ कामगार-कर्मचाऱ्यांच्या घराघरात घुसण्याअगोदर… “कामगारांचं आर्थिकदृष्ट्या ‘चांगलभलं’ करण्याच्या निमित्ताने कामगार-संघटनांमध्ये संघर्ष व्हायचे; पण, आता कामगारांचं जास्तीतजास्त शोषण करण्यातून आपलं ‘चांगभलं’ करण्यासाठी, आपली उखळ पांढरी करण्यासाठी कंत्राटदारांमध्ये संघर्ष उडायला लागलेत आणि हे लोण आता खाजगी क्षेत्रातही पसरु लागलंय”…’भांडवली-व्यवस्थेनं जे पेरलं, तेच उगवून वर आलंय! लक्षात ठेवा, “कंत्राटी-कामगार म्हणजे, ‘गुलाम + नव-अस्पृश्य’; तर, कंत्राटदार म्हणजे, ‘चोर + दरोडेखोर’…!!!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)