पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरमध्ये मदत करणाऱ्या व भारतीय-भूभाग बळकवण्यात ‘लालची’ असलेल्या ‘लाल चीन’ला होणारी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर रोजीची पं. नरेंद्र मोदींची नियोजित भेट…!!!

पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरमध्ये मदत करणाऱ्या व भारतीय-भूभाग बळकवण्यात ‘लालची’ असलेल्या ‘लाल चीन’ला होणारी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर रोजीची पं. नरेंद्र मोदींची नियोजित भेट…!!!

** कालपर्यंत पाकिस्तानला (याच पाकिस्तानशी, ‘सिंदूर’ लावून दुबईत, अमित शहांच्या मुलाच्या BCCIचं नुकसान व्हायला नको, म्हणून भारत क्रिकेटचा सामना खेळणार) ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताची राफेल विमाने पाडायला थेट मदत करणारा आणि आपली भूमी बळकावणारा चीन… फक्त, मानसरोवर-यात्रेच्या ‘वाटाण्याच्या अक्षता’ लावून आज अचानक ‘मैत्रीच्या विवाहवेदी’वर उभा करता येतो?

** लाल चीनला ‘लाल आँखे’ दाखवण्याच्या राणाभीमदेवी थाटात गर्जना करता करता, अचानक एकदम चीनची ‘गळाभेट’?…जणू काही शहाण्या झालेल्या मुलासारखा चीन, लडाखमधल्या बळकावलेल्या भारतीय-भूभागातून माघार घेतोय की, काय? …मग, पं. नेहरुंना शिव्याशाप द्यायचा, अंधभक्तांना काय अधिकार?

** या नियोजित चीन-भेटीमागे, अदानींच्या आर्थिक-हितसंबंधांची काळजी घेणं आहे की, दोस्तीत ‘गद्दारी’ करणाऱ्या ‘ट्रंप तात्यां’ना फुकटची ‘हूल’ देण्याचा प्रयत्न? …की, ५०% टॅरिफमुळे अमेरिकन-निर्यात थंडावल्यास, ती सगळी चीन स्विकारुन भारताचा चीनशी असलेला निर्यातीचा आतबट्ट्याचा व्यवहार जरा संतुलित करु पहाणार आहे??

** चीनकडून आयात होणारे ‘बारीक आँखोंवाले गणेशजी’ म्हणत…एकाच वेळेस श्रीगणेश-दैवताचा आणि चिनी जनतेसह चीनच्या अध्यक्षांचाही घोर अपमान करणार्‍या पं. मोदींचे डोळे उघडले म्हणायचे की, चीनमधून आयात होणाऱ्या गणेशमुर्तिंचे ‘डोळे मोठे’ झाले म्हणायचे?

** चीनमधून आयात होणाऱ्या गणेशमुर्तिंसह होळीच्या रंगांपर्यंत…विदेशी मालावर बंदी घालण्याचं आवाहन करणारे पं. मोदी व त्यांचे गोबर-गणेश अंधभक्त…ट्रंप तात्यांनी अगदी लाथाडल्यानंतर अमेरिकी आयातमालावर, अमेरिकी-समाजमाध्यमांवर आणि एकूणच अमेरिकी-कंपन्यांवर बंदी घालण्याचं आवाहन कधि करणार?

** भारताची परदेशनीति नेमकी कोण चालवतो, कोण ठरवतो…जयशंकर, अजित डोवाल (या दोघांचीही मुले परदेशी-नागरिक असल्याची वदंता आहे)…की, मुकेश अंबानी? सध्या, मुकेश अंबानींच्या ‘ORF’ (Observer Research Foundation) वरुन मोदी-अंधभक्तच मोठा गदारोळ निर्माण करत आहेत, म्हणून!

** रशियावरील अमेरिकी-निर्बंधांनंतर रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करुन नेमका कोणाचा एक लाख कोटींहून अधिक रुपयांचा फायदा झाला…भारतीय जनतेचा की, मुकेश अंबानींचा? पं. मोदी म्हणतात तसा, तो भारतीय जनतेला झाला म्हणावा; तर, पेट्रोल-डिझेल बिलकूल कधि स्वस्त झालेलं नाही!

तेव्हा, वरील पार्श्वभुमीवर, एवढं निश्चित म्हणावं लागेल की, “वोट चोर, गद्दी छोड” या राहुल गांधींनी छेडलेल्या ‘लोकशाही-बचाव’ आंदोलनावरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याची, ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर चीन भेटीची पं. नरेंद्र मोदींची खेळी, दुर्दैवाने यशस्वी ठरल्यास…उथळ व धेडगुजरी वर्तनाने देशाच्या आर्थिकनीतिसह परदेशनीतिचा ‘चुथडा’ करणाऱ्या भाजप-संघीय सरकारला निवडणुकीतून ‘धडा’ शिकवण्याची संधि… भाजपसाठी जादूई करामत करणाऱ्या EVM-मतपेटीच्या माध्यमातून ‘मतचोरी’ केली जात राहून, कायमची हिरावून घेतली जाईल…मग, भारतीय-जनतेला रशियाच्या क्रूरकर्मा हुकूमशहा जोसेफ स्टॅलिनचे उद्गार आठवतील, “निवडणुकीत मतं देणारे महत्त्वाचे नसतात…तर, मत मोजणारे महत्त्वाचे असतात!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)