आता उठवू सारे स्मशान….

(१५ ऑगस्ट-२०२५)

आता उठवू सारे स्मशान….
शहिदांच्या राखेतूनी फुलवू,
देवी-स्वतंत्रतेचं गान…!!!

तिजोरीत बंदी जो तो…
चाले मग्रूर इथे दलाली!
खेळ मुजोरीत मतचोरीचा,
मतपेटीतून ऐसा चाले…
राजा बोले लगटून,
दळ ते तत्पर हाले…
साव बनूनी आयोग ‘शर्विलक’,
हात जोडूनी तो उभा ठाके!

‘चौकीदार चोर’ म्हणावा की,
संमेलन म्हणू चोरांचं?
….की, न्यायालय बंद दारांचं!
चोरांची वाराणसी न् काशी,
रोज संन्याशाला फाशी!

काळजातून जनांच्या होऊ द्या
पार किती धार-कट्यारी…
लोकशक्तिच्या होता अशा,
त्या जीर्णनिष्प्रभ ढाली…
स्वातंत्र्यासाठी रक्तवर्णी पुन्हा,
टिळा लावूया भाळी….
पुन्हा टिळा लावूया भाळी!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)