कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांनी “रोजच्या बारा तासाच्या कामा”बद्दल, जे जाहिरपणे कामगारांची दिशाभूल करणारं (वरील लिंकमध्ये पहा) वाक्ताडन

——————————————————————

https://www.facebook.com/share/r/1ZwoGb9pqB/
——————————————————————-
आपण आपल्या या लेखमालिकेत अजून पुढे सरकण्यापूर्वी कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांनी “रोजच्या बारा तासाच्या कामा”बद्दल, जे जाहिरपणे कामगारांची दिशाभूल करणारं (वरील लिंकमध्ये पहा) वाक्ताडन केलंय, त्याचा यथास्थित समाचार प्रथम घेऊया.
…त्यांच्या म्हणण्यानुसार, “कामगार-मंत्रालयाने आठवड्याचे एकूण कामाचे तास पूर्वीसारखेच जास्तीतजास्त अठ्ठेचाळीसच ठेवलेले असून; फक्त, आठवड्याच्या कुठल्याही एका दिवशी पूर्वीच्या जास्तीतजास्त आठ तासांऐवजी बारा तास काम करवून घेण्याची उद्योग जगताला परवानगी दिलेली आहे”. इथेच ‘ग्यानबाची मेख’ दडलेली आहे…भाजपाचे हे ‘कामगारमंत्री’, नावापुरतेच ‘कामगारमंत्री’ असून प्रत्यक्षात ‘मालकमंत्री’ आहेत; म्हणजेच, उद्योग-जगताचे सरळ सरळ ‘दलाल’ आहेत! ते पुढे जाऊन मखलाशी (खरी म्हणजे, ‘बदमाषी’) करतायत की, नाहीतरी हल्ली सगळीकडे कामगारांकडून सर्रास दिवसाचे बारा तास काम करवून घेतले जाते आहे; मग, त्यापेक्षा अधिकृतरित्या दिवसाचे कामाचे तास वाढवून निदान कामगारांना अधिकच्या चार तासांचा ‘ओव्हरटाईम’ मिळवून देण्याची आम्ही ‘व्यवस्था’ करतो आहोत ते कामगारांसाठी चांगलंच की…अरे व्वा, या ‘मालकमंत्र्यां’ना कामगारांची केवढी हो काळजी? जर, या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांच्याच कबुलीजबाबानुसार महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी जबरदस्तीने दिवसाचे बारा बारा तास करवून घेतले जात असेल; तर, ‘कामगारखातं’ नावाचा ‘पांढरा हत्ती’, काय बकासुरासारखं फक्त वरकमाईचं ‘खाण्या’साठी पोसला गेलेला आहे की काय? …की, बांद्रा-कुर्लामधलं अवघं कामगारखातं आरामशीर वातानुकूलित कार्यालयात टेबलावर ढेंगा टाकून झोपा काढत असतं??
वस्तुतः महाराष्ट्राच्या कामगारविश्वाची परिस्थिती एवढी भयावह व अस्वस्थ करणारी आहे की, देशीविदेशी (विशेषतः, पाशवी आर्थिक ताकद असलेल्या व म्हणूनच वरपासून खालपर्यंत सगळंच ‘कामगारखातं’ खिशात टाकू शकणाऱ्या ‘बहुराष्ट्रीय-कंपन्या’) एकूणएक सगळ्याच कंपन्या-कारखान्यांतून ‘कायम’ कामगारांची भरती-प्रक्रिया पूर्णतया थंडावलेली आहे व सगळीकडे ‘कंत्राटी-गुलामां’चे जत्थेच्या जत्थे (त्यात, भारतीय राज्यघटनेतील ‘महाराष्ट्रघातकी’ तरतुदीचा आधार घेत, महाराष्ट्रात घुसलेल्या उत्तर भारतीय गुलामांची संख्या मोठीच) मुळातूनच जाणिवपूर्वक ‘नपुंसक’ व दुबळे-लुळेपांगळे ठेवले गेलेले कामगार-कायदे, बेधडक धाब्यावर बसवून महाराष्ट्राच्या उद्योग-सेवा क्षेत्रात जागोजागी काम करताना आपल्याला दिसतात…पण, ‘वरकमाई’च्या राक्षसी हव्यासापोटी डोळ्यावर कातडं ओढून ‘गांधारी’ बनलेल्या (धृतराष्ट्राचं आंधळेपण निदान जन्मजात तरी होतं, त्यात त्याचा स्वतःचा काहीच दोष नव्हता) या तथाकथित ‘कामगार-खात्या’तल्या (प्रत्यक्षात, ‘मालक-खातं’) अधिकाऱ्यांना दिसत नाहीत! कामगार-मंत्रालयाच्या आशिर्वादाने कंपनी-काॅर्पोरेटीय क्षेत्राने ‘कंपनी-दहशतवाद’ (Corporate-Terrorism) माजवून ‘अनुचित कामगार प्रथां’चा हैदोस घालत…भांडवलदारवर्गाने कामगारांच्या युनियन्स संपवत आणल्यात किंवा त्या आपल्या ‘बटीक’ तरी बनवल्यात. अनेक कंपन्यांमधून ‘युनियन-पुढारी’ कोण, कुठल्या पुढार्‍याशी वा कुठल्या युनियनशी बोलणी करणार…हे आता तिथले बदमाष व प्रत्यक्षात कायद्यानुसार ‘गुन्हेगार’ असलेले HR/IR अधिकारीच बेलाशक ठरवायला लागलेत, ज्यांना, प्रगत पाश्चात्य देशात, असा ‘अनुचित कामगार प्रथां’चा (Unfair Labour Practice) अवलंब केल्याबद्दल “किमान दोन ते कमाल पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास” भोगायला लागेल; पण त्याबाबतीत आपल्याकडे नन्नाचा पाढाच! …मग, सांगा आता कामगारहिताच्या दृष्टीकोनातून, कामगार-कायद्यात व कामगारखात्यात काय दम उरला? तरी यांच्या पार्श्वभागाला, हे दुबळे व नपुंसक कामगार-कायदे, सदासर्वदा बोचत असतात आणि म्हणूनच, या भाजप-संघीय भांडवलधार्जिण्या सरकारने गलितगात्र झालेली उरलीसुरली कामगार-चळवळ संपवायला घेतलीय! कुठलंही भाजप-संघीय सरकार, हे कामगारांचा नंबर एकचा शत्रू असतं; पण, त्यांच्याकरवी जातीधर्मभेदात जाणिवपूर्वक अडकवल्या गेलेल्या महामूर्ख कामगारांना ते आकळत नाही.
तेव्हा, कामगारांच्या हिताच्या व त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने, निष्क्रिय व षंढ असलेलं ‘कामगारखातं’ एकदाचं बंदच करुन टाका व शासनाचे पैसे तरी वाचवा {नाहीतरी, आता या मोदी-सरकारने आणलेल्या ‘काळ्या कामगार-संहिते’च्या (Black Labour-Code) अंमलबजावणीतून त्यांना तोंडदेखलं देखील काम शिल्लक रहाणार नाहीये…कारण, युनियन्सच संपल्यानंतर, ‘ना रहेगा बाँस न बजेगी बाँसुरी’ अशी दारुण अवस्था होणार} किंवा माझ्या हातात द्या कामगारांनो, हे ‘कामगार-मंत्रालय’…मग बघाच, आजवर कामगारांचं वाटोळं केलेल्यांना चारसहा महिन्यातच, नाकात वेसण घालून कसं वठणीवर आणतो ते!

…पुढचा मुद्दा हा की, या फुंडकर-घराण्याच्या ‘आकाश’रावांना कुणीतरी ‘अस्मान’ दाखवत सांगणं गरजेचं आहे की, “तुम्ही भाजपाई लोकं सत्तेत आल्यावर देशांतर्गत बेकारी-बेरोजगारी प्रचंड वाढलीय… ती बेरोजगारी आटोक्यात आणायचं सोडून, बेकारी वाढवणारा ‘ओव्हरटाईम’ तुम्ही सर्रास देऊ पहाताय? ते फार तरुण आहेत, तब्येतीनं छान गलेलठ्ठ आहेत (पूर्वीच्या कामगारमंत्री प्रकाश मेहतांसारखे…इथे कामगारांशी खेळला गेलेला क्रूर विनोद हा की, गुजराथी माणूस ‘भांडवलदार’, हे काही विशेष नवल नाही; पण, एखादा धनदांडगा प्रकाश मेहतांसारखा गुजराथी माणूस महाराष्ट्रात ‘कामगारमंत्री’ देखील बनू शकतो)…आकाशराव, हे खात्यापित्या घरचे आहेत, असू द्यात…त्यात आम्हाला आनंद आहे; पण, आकाशजी, अहो *सध्या कंत्राटी-कामगार पद्धतीच्या आक्रमणाने सगळीकडे पगार एवढे रोडावलेत-खंगलेत (म्हणूनच, कामगारांच्या तब्येती, तुम्हा लोकांसारख्या ‘वजनदार’ नसतात) की, त्या तुटपुंज्या पगारात रोजच्या चारच काय, आठ तासांच्या ‘ओव्हरटाईम’ची भर घातली…तरी, महिन्याअखेर जी कामाची बिदागी हातात पडते; त्याने महागड्या शहरांमधला संसाराचा गाडा हाकता येणं कर्मकठीणच! म्हणजे, तुमच्या भांडवली-व्यवस्थेनं अत्यंत कुटीलतेने पगार एवढे कमी ठेवलेत की, कामगार सगळीकडे सक्तीने म्हणा किंवा नाईलाजास्तव म्हणा, मरमर ओव्हरटाईम करतोच आहे, करत रहाणारच आहे…त्यासाठी, तुमची कामगारहिताची ढोंगी मल्लीनाथी नकोच! *थोडक्यात, साधी गोष्ट ही की, “तुम्ही लोकांनी दिवसाचे कामाचे तास आपसूकच बारा तास होण्याची तरतूद केलेली आहे…तुम्ही लोकं एवढे निर्ढावलेले व संवेदनशून्य-नृशंस आहात की, ते उद्या दिडशे-दोनशे वर्षांपूर्वी होते, तसे १६-१६ तासांचे पण खुबीने कराल! तुम्ही ‘करियर’च्या व ‘महिलासबलीकरणा’च्या वगैरे भूलथापा देत सर्रास शिक्षित महिलावर्गाला घरच्या उंबरठ्याबाहेर ओढून उद्योग-सेवा क्षेत्रात आणलंत (कारण, नोकरी करण्याची मनस्वी इच्छा नसली; तरीही नवर्‍याच्या पगारात हंहार फुलवता येत नाही, मुख्य म्हणजे अतिरेकी महागडे फ्लॅट घेता येत नाहीत; म्हणूनच, अनेकजणींना नोकरीची भयंकर थकवणारी रोजची उलघाल करावी लागते…’घर आणि काॅर्पोरेट’, अशा दोन्ही आघाड्यांवर जीवघेणी लढत द्यावी लागते) आणि आतातर, तळागाळातल्या अशिक्षित महिलावर्गाच्या हातात ‘रिक्षाचं हँडल’च तुम्ही लोकांनी दिलंयत…उन्हातान्हात, पावसापाण्यात आमच्या भगिनींना ‘कंत्राटी-गुलाम’ असलेल्या त्यांच्या नवर्‍या‍ंच्या तुटपुंज्या पगारात एकीकडे भागत नाही आणि दुसरीकडे त्याही फडतूस नोकरीची बिलकूल शाश्वती नाही; म्हणून, हे सव्यापसव्य करावं लागतंय…आणि, दिवसेंदिवस अधिकाधिक महाग होत जाणाऱ्या शहरांमधून अगदीच जमेनासं झालं की, सहकुटुंब आत्महत्या करावी लागतेय.
…तेव्हा, तुमच्याकडून ‘शेंड्या’ लावून घेण्याएवढे आम्ही अगदीच ‘पेंदे’ नाही आहोत…उद्या जर कधी हा मराठी-कामगार जागा झाला ना, तुम्हा भाजप-संघीय लबाड (पक्के आतल्या गाठीचे) व लुटेर्‍या लोकांची कशी पळापळ होईल, ती बघाच…धन्यवाद!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)