वर्ष-२०१४मध्ये मोदी सत्तेवर आल्यापासून एका वर्षातच डाॅलरचा दर ६० रुपयावरुन एकदम ६७ रुपयावर पोहोचला…२० ऑगस्ट-२०१५ला, ‘धर्मराज्य पक्षा’च्या ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात झालेल्या एका सोहळ्यात भाषण करताना मी म्हटलं होतं की, “नरेंद्र मोदींची त्यांच्या गुज्जू-दोस्तांच्या हितासाठीच केवळ राबवलेली; पण, देशाच्या आम जनतेच्या दृष्टिकोनातून ‘आत्मघातकी’ (‘आत्मनिर्भर’ नव्हेच) असलेली आर्थिक-धोरणे पहाता…भारतीय रुपया त्यांच्या कारकिर्दीतच भाजप सल्लागार मंडळ सदस्य, ‘लालकृष्ण अडवाणी’ यांच्या वयाशी स्पर्धा करेल (तेव्हा, अडवाणींचं वय ८८ होतं तर, आज ९८ वर्ष आहे). तेव्हा, अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या!
…आतापर्यंत प्रत्यक्षात, “उडाला तो पक्षी आणि बुडाला तो रुपया”, अशी रुपयाची वास्तविक घसरगुंडी पहाता; “शतायुषी भव”, असा मोदींचे खासमखास दोस्त, डोनाल्ड ट्रंप (सध्या, ब्लादिमीर पुतीन त्यांचे दोस्त आहेत) यांनी आशिर्वाद देत, रुपयाला ‘कात्रजचा घाट’ दाखल्यासारखी, त्याची न थांबता ‘ब्रेक फेल’ घसरगुंडी सुरुच आहे.
बॉलीवूडमधील तथाकथित राष्ट्रवादी ‘अंधभक्त’ तारे-तारकांनी (ज्यांची, गणिती ‘भक्ति व निष्ठा’, ही अंतःकरणातून आलेली नसते; तर, ती धंद्याच्या गणितावर अवलंबून असते) रुपयाच्या घसरणीबाबत; तेव्हा, ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ या उफराट्या वृत्तीने, “नशीब, आपले भारतीय-चलन, हे ‘अंतर्वस्त्र’ नाही”, असे कमरेखालचे ‘राष्ट्रवादी-उद्गार’ काढल्याचं चांगलंचं स्मरतं…ती ‘ढिंगच्यॅक’ मंडळी, आता ढेंगा टाकत कुठे पसार झालीत…???
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

