Dash Down’ From “AIR TO GROUND”…DOWN DOWN WE COME, Both Indigo and NDA….

इंडिगोची इलेक्टोरल-बाॅण्ड्सद्वारे (टेबलावरुन) तब्बल ३१ कोटींची भाजपला भरभक्कम देणगी (विरोधी पक्षांच्या पाचसहा पट)…टेबलाखालून किती, त्याची गणतीच नाही! वैमानिक व अन्य कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी करणारी; पर्यायाने, विमान-प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेणारी DGCAची नवी-नियमावली गेल्यावर्षीच जाहीर व इंडिगोकडून अंमलबजावणीबाबत अतिरिक्त मुदतवाढीची मागणी…पायलट/क्रू-मेंबर्सची वाढवावी लागणारी संख्या व त्यातून घटणारा ‘नफा’ पाहून, पंधरा महिन्यांच्या गुन्हेगारी-विलंबानंतरही इंडिगोचा नवी-नियमावली अंमलबजावणीस कथित नकार…’नवी-नियमावली’ रद्द होत नसल्याचं पाहून प्रतिशोध म्हणून, (केंद्र-सरकारला मोठा निवडणूक-निधी दिलेला असल्याने ‘गृहीत धरुन’), प्रवाशांना वेठीला धरत…इंडिगोच्या ‘Blackmailing Tactics’ बिनधास्त सुरुच असल्याचा कालपरवापर्यंत मोदी-सरकारचे अंधभक्त’ असलेल्या संत्रस्त व संतप्त प्रवाशांचा उघड आरोप!
…अर्थातच, एवढे असे असंख्य संतापजनक व घृणास्पद घटनाक्रम अवतीभवती घडत असताना, ज्यांचे डोळे कधि उघडले नाहीत ते; स्वतःच्या पार्श्वभागाला चटके बसल्यावर तरी उघडतील का, हा यक्षप्रश्न असला…तरीही, ते जरी पूर्ण उघडले नाहीत, तरी ‘किंचित किलकिले’ होण्याची आशा मात्र बाळगायला हरकत नसावी!
——————————————————————–
एकूणात तात्पर्य : भाजप-संघीय NDA सरकारच्या काळ्या कारकिर्दीतील ‘अंबानी-अदानी’ टाईप ‘MONOPOLY OR DUOPOLY’मुळे बेलगाम झालेली भांडवली-व्यवस्था, नफ्याच्या राक्षसी हव्यासापोटी कुठल्या थराला जाऊ शकते, हे गेल्या चार दिवसांच्या देशभरातल्या विविध विमानतळांच्या रंगमंचावर झालेल्या भांडवली-तमाशातून प्रतिकरुपाने दिसले…हाच रंगमंच, देशभरातल्या औद्योगिक व सेवा क्षेत्रात सर्वत्र विस्तारलेला आहे आणि वेळीवेळी जेव्हा जेव्हा कंपन्या-कारखान्यांतून असंख्य कामगारांचे क्रूरपणे जीव घेणारे रासायनिक विस्फोट होतात वा आग लागण्यासारखे अनेक अपघात होत रहातात…तेव्हा तेव्हा, प्रशासकीय-भ्रष्टाचाराच्या पडद्याआड, भांडवली-उत्पातातून घडलेली रौद्रभीषण नाट्ये, सहजी लपवता येतात आणि आता तर, कामगारांचं ‘माणूसपण’च मुळातूनच नाकारणाऱ्या ‘काळ्या कामगार-संहिता’ व त्याअंतर्गत, राजमान्य झालेलं ‘कंत्राटीकरण’… भाजप-संघीय सरकारकडून कामगारांवर लादलं गेल्यानंतर तर, नव्या कामगार-कायद्यांनुसार कंपन्यांतील कंत्राटी-कामगार, हे आता एकप्रकारे नोंदी नसलेले ‘मि. इंडिया’सारखे ‘अदृश्य’ गुलाम असणार… अपघात झाला, कामगार मेले; तर, मेलेले कामगारच जर ‘अदृश्य’; तर मग, नुकसानभरपाई द्यायची गरजच काय आणि ती द्यायची तरी कुणाला…???

लक्षात ठेवा, कामगार म्हणजे, सीमेवर लढायला गेलेले सैनिक नव्हेत, ते कंपन्या-कारखान्यांमधून उदरनिर्वाहाचं एक साधन म्हणून ‘पोट भरायला आलेले’ असतात… तेव्हा, बेसुमार नफे कमावण्यासाठी त्यांच्यावर अन्याय-अत्याचार कराल, त्यांचं जिवीत धोक्यात टाकाल…तर, खबरदार!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)