डाॅ. दीपक पवारांना आमच्या पक्षाच्या नावाचं वावडं आहे; तर, त्यांच्या कार्यकर्त्यांना आमचंच वावडं आहे…हो, तरीही आम्ही, याहीपूर्वीही डाॅ. दीपक पवारांना ‘मराठीधर्म-कर्तव्य’ म्हणून मनापासून साथ दिलेली आहे आणि परवाही १८ डिसेंबरच्या ‘मराठी अभ्यास केंद्रा’तर्फे आयोजित मोर्चाला आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन साथ देणार आहोत….
…कारण, एकच, “निसर्ग आणि माणूस यांच्या शोषणाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध व मराठी-माणसांच्या हितासाठी जो कुणी खरा लढेल; त्या सत्कार्याच्या यज्ञयागात, चार समिधा आमच्याही पडाव्यात”, हेच आमचं धर्मकर्तव्य!
…हीच, ‘धर्मराज्य-प्रणित’ आंतरीक तळमळ, प्रत्येक धर्मराज्य पक्ष-सभासदा ठायी असतेच आणि असलीच पाहिजे.
“महाराष्ट्र कसा असावा, ‘गरीब की, श्रीमंत’, ‘विकसित की, अविकसित”, याची बिलकूल चिंता वा पर्वा न करता…”शिवबा-संतांचा महाराष्ट्र, हा पूर्वीसारखाच ‘निसर्गसंपन्न व शुद्ध हवापाण्या’चा हवा आणि त्यावर, न्याय्य-हक्क फक्त आणि फक्त, मराठ्यांचाच (जातिवाचक नव्हे; तर, ‘भाषावाचक’) हवा”, ही आमची पक्ष-स्थापनेपासूनच धारणा आहे…जसं जपानी कंपन्यांची धारणा, “जमेल तेवढा नफा अथवा न जमल्यास होईल तेवढा तोटा…पण, ‘गुणवत्ते’शी तडजोड न करता उत्पादन”, अशी असते; तद्वतच, “जमल्यास ‘श्रीमंत व विकसित’..न जमल्यास, ‘गरीब व अविकसित’ पण चालेल; पण, महाराष्ट्र हा, निसर्गसंपन्न व मराठ्यांचाच (मराठी-भाषिकांचाच) हवा”, हे आमचं ब्रीद आहे…यासाठीच, संयुक्त-महाराष्ट्रानंतर ‘स्वायत्त-महाराष्ट्र’…राष्ट्रांतर्गत राष्ट्र, ‘स्वायत्त-महाराष्ट्र’, अशी निर्भेळ, निडर भूमिका घेणारा ‘धर्मराज्य’ एकमात्र राजकीय पक्ष आहे.
“Zero-Tolerance towards Corruption and Exploitation of Man & Nature”, या संदर्भीय विषयांबाबत ‘धर्मराज्य पक्षा’ची, ही अशी निष्कलंक व ठाम ‘सक्रिय’ भूमिका असतानाही…त्याच विविध मुद्द्यांवर, स्वतंत्रपणे सामाजिक-चळवळी चालवणाऱ्यांना, जाहिरपणे ‘धर्मराज्य पक्षा’चं साधं नाव घेण्याचीही इच्छा होऊ नये…हे ‘धर्मराज्य पक्षा’चं नव्हे; तर, महाराष्ट्राचं दुर्दैव होय (उदा. दीपकजी, ‘मराठीकरणा’च्या विषयक आपल्या भाषणात, त्यांना खरीखुरी साथ न देणार्या राजकीय पक्षांविषयी बोलताना दिसतात; पण, छोटेखानी असला तरी, एक जाज्वल्य-जातिवंत राजकीय पक्ष, आपल्याला केव्हाचीच मोलाची साथ देतोय, हे सांगायला कायम विसरतातच…नाही म्हणायला, नुकतंच त्यांनी खास निमंत्रण-पत्र पाठवलंय, पण त्याचं स्वरुप खाजगीच)!
…याच संदर्भात, अन्य विषयांशी संबंधित अशा, काही समाजधुरिणांची नावं घेणं आज मी टाळतो; पण, या त्यांच्या नकारात्मक प्रतिसादात बदल कधि झालाच जर नाही; तर, ती प्रसंगोपात्त कधितरी घ्यावीच लागतील. कारण, ही सगळी मोठी माणसं, समाजासाठी (विशेषतः, मराठी-माणसांसाठी) स्वयंप्रेरणेनं प्रामाणिकपणे धडपडून काही करु पहातायत; म्हणूनच, या सगळ्याच महोदयांना व त्यांच्या संघटनाकार्याला वेळोवेळी खस्ता खाऊन व पदरमोड करुन, यथाशक्ती ‘धर्मराज्य’ संघटनेनं भरभरुन मदत केलेली आहे आणि त्यांच्या अनेकानेक उपक्रमात सक्रिय सहभाग घेताना, फार कष्ट उपसले आहेत…पण, त्यांनीही व्यक्तिगत व
धर्मराज्य पक्षाची ‘मराठीकरणा’विषयक भूमिका….
सर्वप्रथम, हा (एक प्रकारचा ‘डिस्क्लेमर’च) जाहीर कबुली जबाब देतो की, आम्ही जरी मराठी-माध्यमातून शिकलो असलो तरीही…हो, आम्ही आमची मुलं ‘इंग्लिश-मिडियम’मध्ये शिकवली; कारण, फिर फिर फिरुन व्यवस्थित-शिकण्याच्या आसपासच्या लायकीची, एकही ‘मराठी-शाळा’ ठाण्यात धड आढळली नाही, म्हणूनच केवळ! पण, त्या ‘अपराधी-भावने’तून बाहेर पडत…आमच्या मुलांवर शक्यतेच्या पलिकडे जाऊन आम्ही मराठी भाषेचे, मराठी-वळणाचे, मराठी-संस्कृतीचे संस्कार, अत्यंत कष्टपूर्वक केलेले आहेत आणि ‘मराठीकरणा’ला मजबूत करणारी, त्याची दृश्यरुपात फार चांगली फळं आम्हाला लाभली आहेत.
“भाषा आणि संस्कृती अभिन्न अंग आहेत”… म्हणूनच, पर्शियातून आलेल्या पारशांना ‘गुजराथी’ भाषा सक्तिने अंगिकारावी लागल्यानंतर, आपसूकच ते ‘कशाचाही विधिनिषेध न बाळगणारे ‘व्यापारी’ बनले (त्यात, पारशी ‘टाटा घराणे’ही आलंच).
…म्हणूनच, जो पूर्णतया ‘मराठी-भाषा’, घरात आणि व्यवहारात पूर्णतया स्विकारतो-अंगिकारतो; तो, मूळ कुठल्याही मातृभाषेचा असो, तो ‘मराठा’च…नाहीतर, पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहून ‘मराठी’ त्याज्य समजणारे, इतर कुणीही ‘मराठे’ अजिबात नव्हेत (यात, घरीदारी मराठी बोलायला लाजणारे वा तिला नाकारणारे अथवा स्वार्थापोटी मराठ्यांचा ‘विश्वासघात-अवसानघात’ करणारे, जन्मजात ‘मराठे’ असले तरी देखील त्यात आलेच)!
भांडवलदारांकडून कपर्दिकही देणगी न घेताच (ज्यात, “quid pro quo” असतोच) पक्ष चालला; तरच, तो ‘मराठी माणसाचं आणि अर्थातच पर्यायाने मराठी-माणसा’चं चांगभलं करु शकेल…अन्यथा, अजिबात नव्हेच! …म्हणूनच, ‘मराठी माणसां’च्या नावाने काढलेले, वाढलेले आणि (आजही) चाललेले राजकीय पक्ष, या मुद्द्यावरच आजवर अपयशी ठरलेत आणि त्यांच्या अशा अटळपणे अपयशी ठरण्यानं (कारण, मुळातून त्यांचा पायाच ‘भांडवल-पुरस्कार’प्राप्त असल्याने, निर्मितीपासूनच ठिसूळ, सदोष व अवसानघातकी होता) मराठी-माणूस तोंडघशी पडला आणि मराठी-भाषा, आपल्या मायभूमीतच ‘धाराशायी’ होऊ लागली…ती कधी इंग्रजीपुढे, तर कधी हिंदीपुढे आणि आताशी गुजराथीपुढे.
…तरीही, हे सगळेच ‘मराठी मराठी’ करणारे पक्ष, आजही ‘गुज्जू-भांडवलदारां’कडून वसूल केलेल्या पैशात फुकटात वह्यापुस्तकं, क्रिकेटचं-साहित्य वाटप करण्यात व हळदीकुंकू-नवरात्रौत्सव-भंडारे-सार्वजनिक पूजा/गणेशोत्सव-दहीहंड्या-क्रिकेटस्पर्धा यांच्या आयोजनातच रमलेले दिसतात; कारण पुन्हा तेच!
“युद्धात जिंकले आणि तहात हरले”, असे परंपरागत ‘मराठे’ आणि आजचे ‘पाटील जरांगे’ व्हायचं नसेल; तर, वरील कशाचाही ‘मराठीकरणा’साठी काहीही उपयोग नाही; जोवर, देश आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या, आपल्या हातात करकचून ताणून ठेवलेल्या ‘भांडवली-व्यवस्थे’ला तुम्ही आव्हान देत नाही!
…आणि, ते देण्यासाठी सकस ‘मराठी-राजकीय मानसिकता’ तयार करत नाही…मग, भले ती कुठल्याही पक्षाच्या ‘बॅनर’खाली करा (हवंतरं, नवा पक्ष काढा…आमचाच ‘धर्मराज्य पक्ष’ मोठा करा, असं काही आमचं म्हणणं नाही; पण, भूमिका ‘धर्मराज्य’चीच घ्यावी लागेल…इतर कुठलाही पर्याय नाहीच)!
‘धर्मराज्य’च्या छत्रछायेत असंख्य कार्यकर्ते तयार झाले…संघटनेत तयार होताना थोडीबहुत शिकलेली ‘पोपटपंची’ वापरत, अनेकजण कामगारवर्गाच्या (पर्यायाने, अर्थातच मराठी-माणसाच्या) पाठीत खंजीर खुपसणारे ‘गद्दार’ (आणि, अर्थातच मालामाल) बनले…काही भलेही निपजले; पण, त्यातले बरेच वैयक्तिक अहंगंडापोटी, आमच्याशी ‘सवतासुभा’ न मांडता; हकनाक वेगळी चूल मांडत ‘माहिती-अधिकार वा सामाजिक-कार्यकर्ते’ बनले…तर, काही संघटनेतच राहून “संघटना जगेल, पण फार वाढणार नाही” (जेणेकरुन, पक्षवाढीमुळे आपल्या वर्चस्वाला धोका निर्माण होऊ नये) याची ‘दक्षता’ घेऊ लागले.
…अशा विपरीत स्थितीतही जो पक्ष वाढीचीच काय पक्ष-अस्तित्वाचीही पर्वा न करता “टोकदारपणे सर्वंकष मराठी-हिताची काळजी वाहू पहातो”, असा कोण आहे… या प्रश्नाचं उत्तर, “जगी सर्वसुखी असा कोण आहे”, या समर्थ रामदासांच्या वैश्विक प्रश्नासारखं बिलकूल नकारात्मक नाही…त्याचं उत्तर, फक्त आणि फक्त, “धर्मराज्य पक्ष”, हेच एकमेव आहे!
‘धर्मराज्य’ला किंवा ‘धर्मराज्य’च्या भूमिकेला नाकारलंत आणि कदाचित प्रसिद्धीच्या मोहापायी आपल्याच ‘सामाजिक-संस्थां’चे (त्यांची अजून ‘संस्थानं’ झाली नसली, तरीही) झेंडे फडकवत राहिलात; तर, येणारा काळ तुम्हाला माफ करणे नाही!
…आज मराठीचा व मराठी-माणसाचा कोसळू पहाणारा डोलारा, तुम्ही कसाबसा सावरुन धरालंही…पण, उद्या नव्याने नव्या रुपात; या ना त्या मार्गाने, ‘मराठी माणसं आणि मराठी भाषा’ यावर संकटं कोसळतच रहाणार आहेत…तेव्हा, वेळीच सावधान, धन्यवाद!
|| जय महाराष्ट्र, जय हिंद ||
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
(‘धर्मराज्य पक्षा’तर्फे, मराठी-जनहितार्थ प्रसारित…)

