Devil lies in the details…
‘ऑपरेशन-सिंदूर’ असो वा असो अमेरिकन ‘टॅरिफ वॉर’… जी घोषणा, दिल्लीतून व्हायला पाहिजे; तिचं जर वॉशिंग्टनमधून व्हायला लागली, तर त्याचा सरळ अर्थ हाच की, “आजवरच्या स्वाभिमानी व मूलतः भारतीय-जनहिताच्या भू-राजनेतिक (Geo-Political) आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ‘बळी’ दिला गेलाय !”
…जग, अमेरिका (नाटो) आणि सोव्हिएट रशिया (वॉर्सा करार), अशा दोन गटांत विभागले गेले असण्याच्या व त्यांच्यामधील ‘शीतयुद्ध’ टिपेला पोहोचलं असण्याच्या, अतिशय कठीण कालखंडात पं. जवाहरलाल नेहरुंनी युगोस्लाव्हियाचे मार्शल टिटो (रशियाच्या स्टॅलिनविरुद्ध दंड थोपटणारे), इजिप्तचे अब्दुल नासेर आणि इंडोनेशियाचे सुकानों यांना सोबत घेऊन मोठ्या धैर्याने ‘अलिप्ततावादी चळवळ परिषद’ (Non-Aligned Movement…NAM) स्थापन केली. त्याद्वारे, अगदी डोळ्यात तेल घालून भारतीय हित आजवर जपण्यात आलं; याचं कारण, “वसाहतवादाला विरोध, आर्थिक विषमतेला आळा घालणे, नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांचे ‘सार्वभौमत्व’ टिकवणे, त्यांचे आर्थिक हितसंबंध व जागतिक शांतता राखणे”… हीच मुळी, या चळवळीची मुख्य उद्दिष्टे होती.
… आणि, आज याच महान तत्त्वांचा ‘बळी’ दिला जातोय; ज्यातून, ‘बळी तो कानपिळी’, ही जंगली स्वरुपाची ‘भांडवली-मानसिकता’ सर्वसामान्य भारतीय पिढ्यापिढ्यांचं अतोनात नुकसान करेल !
… शेकडो बळी देऊन ‘३ काळे शेतकी कायदे’ रद्द करायला लावणाऱ्या शेतकऱ्यांवर यातून ‘खुन्नस’ काढला जातोय, त्यांच्यावर एकप्रकारे सूड उगवला जातोय, एवढं निश्चित !
याच सगळ्या तरतुदी गेल्यावर्षीच अमेरिकन डोत्रो अथवा ट्रोनो प्रणालीनुसार सुरु झालेल्या ‘टॅरिफ-वॉर’च्या वेळीच स्विकारता आल्या असत्या… त्यात, आज काय मोठा फरक आहे? याचाच अर्थ, ही सगळी करामत, प्रामुख्याने गौतम अदानीवरचा अमेरिकन न्यायालयातील गुन्हेगारी दावा आणि ‘एपस्टिन-फाईल्स’ यामुळेच घडून आलेली असावी, असं दिसतंय… “Our Prime Minister is compromised”, असं विरोधीपक्ष नेते राहुल गांधी जेव्हा म्हणतात, त्याचा अर्थ अजून वेगळा काय असू शकतो?
… राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)

