संपूर्ण सृष्टी ही ‘त्रिगुणात्मक’ (वेदउपनिषदे-भगवतगीतेनुसार ‘सत्व, रज , तम’ या गुणांनी भरलेली-भारलेली व ‘प्रोटाॅन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन’ या मूलभूत कणांनी प्रत्येक अणूरेणू बनलेला असताना… RSS च्या के. सुदर्शनजी यांच्यासारखी अनेक नेतेमंडळी, वर्ष १९५० ते २००२ दरम्यान (तब्बल ५२ वर्षे) संघ-मुख्यालयावर भारताचा ‘तिरंगा’, हा राष्ट्रध्वज न फडकविण्यामागे “तीनचा आकडा, हा भारतीय-अध्यात्मानुसार ‘अशुभ’ व ‘अपवित्र’ आहे”, असा जावईशोध लावून एक बादरायण व निर्बुद्ध तर्कट मांडत असताना… तामीळनाडूमधील “Earthworm Man Of India” म्हणून मोठ्या प्रसिद्धीस पावलेला ‘सुलतान ईस्माईल’ हा एक ‘मुस्लिम’ जीवशास्त्रज्ञ, भारतीय-अध्यात्मातील “ब्रह्मांडाच्या चराचरात-अणूरेणूत ‘प्राणतत्त्व’ कसं सामावलेलं आहे…ते या व्हिडिओतून सांगतोय!
…माती ही ‘सजीव’ कशी (जेम्स लव्हलाॅक’, या ब्रिटीश शास्त्रज्ञाने ‘ग्रीक पुराणकथेतील ‘Gaia’, ही मनुष्यरुपात वावरणार्याच ‘पृथ्वीदेवता’वरुन मांडलेल्या ‘Gaia’ सिद्धांतानुसार, ज्याला अलिकडे आधुनिक वैज्ञानिक-परिभाषेत, पृथ्वीवरील सगळ्या सजीवांचा एकमेकाशी असलेला अन्योन्य संबंध आणि त्यांचं पर्यावरणाशी असलेलं तादात्म्य, या अर्थाने ‘Earth System Science’ असं म्हणतात) याची संजीवक मांडणी करताना…जणू भारतीय-अध्यात्मातील ‘अद्वैता’चा (आत्म्याचे ब्रह्माशी एकत्व) किंवा संतसाहित्यातील “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” किंवा चराचरात सजीव (चर वा हालचाल करणारे) आणि निर्जीव (अचर-स्थिर/जड) अथवा ‘चेतन-अचेतना’मध्ये ‘ईश्वरी रूप’ पाहण्याचा संदेश, हा मुस्लिम शास्त्रज्ञ देतोय… हे किती कमालीचं आश्चर्यकारक व आश्वासक आहे!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष…भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही ‘हरित-पक्ष’…The First ‘Green-Political Party’ Of India)

