कामगार-धर्माची चार आर्य सत्ये….

१) “ही भांडवली-व्यवस्था माझ्यासाठी काम करत नाही; तर, मी त्या व्यवस्थेसाठी काम करतो…केवळ, माझ्या टोकाच्या शोषणातूनच ती चालते व चालू शकते आणि हे दुष्टचक्र थांबवण्याची जबाबदारी माझीच आहे”….

२) “मी कामगार म्हणून ‘राष्ट्रीय-संपत्तीचा निर्माता’ आहे; पण, त्या निर्मीत-संपत्तीतून मी आज बेदखल आहे; कारण, माझ्या श्रमाची आणि रक्ताघामाची भांडवलदारांकडून राजरोस चोरी-दरोडेखोरी होतेय आणि ती चोरी-दरोडेखोरी थांबवण्याचा इलाज आहे”….

३) “ही लुटारु व्यवस्था, अशीच चालत रहावी…काँक्रिटचे अगणित इमले रोज सर्वत्र उभारले जात रहावे, खाजगी (काॅर्पोरेटीय) व सरकारी अधिकार्‍यांचा भ्रष्टाचार, ऐय्याशी…अशीच अनिर्बंध चालू रहावी; म्हणूनच, मला मान मोडून ‘तुटपुंज्या पगारा’वर जबरदस्तीने काम करायला ‘भांडवली-व्यवस्था’ भाग पाडते….

४) “माझ्या अस्थिर जीवनाचं व तुटपुंज्या पगाराचं ‘दुष्टचक्र’ थांबवायचं; तर, मलाच राजकारणात सक्रिय पुढकार घेऊन ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ आणि ‘४ काळ्या कामगार-संहिता’ (Black Labour-Codes) या दोन्हींचा नायनाट करायला हवा….

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)