Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##2

भारताचे पंतप्रधान कोण…नरेंद्र मोदी की, डोनाल्ड ट्रंप…???
अंधभक्त समाजमाध्यमांतून बोंबलत होते, बरळत होते की, “अमेरिकन सरकारपुढे मान तुकवायला मोदींनी सपशेल नकार दिलाय”…मग, “शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार यांच्या हिताशी ते कधिच तडजोड करणार नाहीत”, असं तारस्वरात गर्जून सांगणाऱ्या मोदींचा तो ‘बनावट’ स्वर, या अमेरिकन व्यापार-करारात एकदम ‘म्यान’ कसा झाला? डोनाल्ड ट्रंप यांच्या ‘Executive Order’मध्ये अमेरिका तिला हवं तेव्हा, हा करार रद्द करु शकण्याची तरतूद असल्याचं सरळ सरळ म्हटलंय…शिवाय, खनिज तेल व संरक्षण साहित्यासह ‘अमेरिकन व्यापार-करारा’बाहेरच्या बाबींवर देखील (Non-Market Policies of Third Parties etc.) अमेरिकेची कडक निगराणी व नियंत्रण रहाण्याचा छुपा इशाराही दिला गेलाय; या अशा कुठल्या गोष्टींची ना परराष्ट्र मंत्र्यांना, ना वाणिज्य-उद्योग मंत्र्यांना कुणकुण; तरीही, ट्रंप बिनधास्त घोषणा करत सुटलेत; हे कशाचं लक्षण? किंवा, हे दोन्ही मंत्री, ‘तो मी नव्हेच’मधल्या ‘लखोबा लोखंडे’चा अवतार धारण करुन बसलेत?? ही कसली उच्चदर्जाची लपवाछपवी आहे??? अशातर्‍हेच्या करारासंदर्भात अथवा ‘WTO’मधील वाटाघाटींबाबत सर्व चर्चा, पूर्वी अत्यंत खुलेपणाने व पारदर्शकपणे होत होत्या; पण, ज्यांचा राजनैतिक पायाच मुळी पूर्णतया गोबेल्स-तंत्राच्या ‘खोटारडेपणा’वर आधारलेला आहे, त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा करायच्या? देशाच्या परराष्ट्र मंत्र्यालाही पूर्ण अंधारात ठेवलं गेलंय, तिथे तुमची-आमची गत काय?
…ही भाजपाई-संघीय ‘मीर जाफरी’ अवलाद, अमेरिकन वसाहतवादाला खुलं आमंत्रण देत आहेत, जे ‘ईस्ट (ब्रिटीश) इंडिया कंपनी’च्या संदर्भात घडलं; तेच, ‘इंडिपेंडंट-इंडिया’च्या बाबतीत घडू पहातंय…तोच दर्दनाक इतिहास, पुन्हा नव्याने लिहीला जातोय; पण, मूळ मुद्दा हा की, ही थेरं कोणासाठी व कशासाठी चाललीयत?…नुकत्याच अमेरिकेने जारी केलेल्या भारतीय-नकाशात पाकव्याप्त काश्मीर व अक्साई चीन, हे दोन्ही प्रदेश भारताचे म्हणून दाखवलेत; या गोष्टीचं कौतुक घालायचं की, हे तथाकथित ‘विश्वगुरु’, भारताचा ‘व्हेनेझुएला’ करुनच थांबणार, असं लक्षण समजायचं?…लक्षात ठेवा, “भारताच्या ‘सार्वभौमत्वा’चा नंतर ‘बळी’ जाईल; प्रथम आपल्या स्वयंपूर्णतेचा ‘बळी’ जाईल”!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)