एक तडफदार, प्रामाणिक ‘तुकाराम मुंढे’

“एक तडफदार, प्रामाणिक ‘तुकाराम मुंढे’ एवढं मोठं काम करतो आहे आणि बाकीचे आजचे व आजवरचे, बहुतांश IAS / IPS ‘अकार्यक्षम गुंडे’…आजवर नेमकं काय करत होते आणि काय करताहेत?”
“तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकण्याऐवजी आपण जनता म्हणून जिंकलो”… एवढा मात्र फरक, आपल्याला “He came, he saw, he won”, या ज्युलियस सीझरने उच्चारलेल्या जगप्रसिद्ध (“Veni, vidi, vici “) लॅटिन उक्तित करावा लागेल. कारण, तुकाराम मुंढेंसारखं ‘सतीचं वाण’ हाती घेऊन सरकारी नोकरी करताना, कुठकुठल्या अग्निदिव्यांना सामोरं जावं लागतं; त्यांचं तेच जाणो! सरकारी-नोकरीच्या कार्यकाळात अनंत यातना त्यांना भोगाव्या लागतात, लागल्यात…पण, अंततः परिणामस्वरुप, अशा अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील व त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सार्वजनिक जीवन स्वच्छ व पारदर्शक होतं. त्यांच्याकरवी, आम जनतेला मोठा दिलासा मिळत जातो व जनतेची ‘रोजमर्रा की जिंदगी’ सुसह्य व समाधानी होत जाते.
एकीकडे, पूर्वीचे ज्यूलियस रिबेरो व हल्लीचे अशोक खेमका, महेश झगडे आणि अर्थातच तुकाराम मुंढे* वगैरे प्रामाणिक व ताठ पाठकण्याचे सरकारी-अधिकारी अतिशय दुर्मीळ असताना…दुसरीकडे ‘अ’विश्वास नांगरे पाटलांसारखे अप्रामाणिक व पिचक्या पाठकण्याचे अधिकारी उदंड असतात. उदंड असतात एवढंच नव्हे; तर, अशांचा सार्वजनिक जीवनात आपल्याला पदोपदी, अगदी उघडपणे सुळसुळाट झालेला दिसत असतो!
…म्हणूनच, भ्रष्ट राजकारण्यांच्या संपत्तीचा लोकायुक्त, लोकपाल द्वारे किंवा SIT स्थापन करुन (हल्लीच्या “चौकीदार चोर व चंदा चोर” काळात…ईडी, सीबीआय, सेबी, आयटी या संस्थांची विश्वासार्हता रसातळाला पोहोचली असल्याने) चौकशी करण्याअगोदर… अफाट संपत्तीची जमवाजमव करुन गब्बर (खरंतरं ‘गब्बरसिंग’) झालेल्या, आजी / माजी सरकारी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल तपासणी करुन त्यांना, ‘जन-लोकपाल कायद्या’तील तरतुदीनुसार… “भ्रष्ट मार्गाने कमावलेली संपत्ती व ती कमावताना सरकारी-तिजोरीचं केलेल्या एकूण नुकसानीची; त्यांनी तहहयात कमावलेल्या संपत्तीतून, एकत्रित नुकसानभरपाई करुन घेऊनच”, मग त्यांना तुरुंगाच्या ‘गजाआड’ पाठवलं पाहिजे.
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)