अमेरिका

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”…

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”, असं ज्या निवडणुकीचं एका वाक्यात वर्णन करता येईल; अशा ‘अंकल सॅम’च्या नुकत्याच लागलेल्या निवडणूक-निकालानंतर तर, भांडवली-व्यवस्थेसंदर्भातील अनेक गंभीर प्रश्न आता सातत्याने ऐरणीवर येत राहतील. ८ वर्षांपूर्वी ‘अमेरिका फर्स्ट’, हे अमेरिकेची ताकद, सुरक्षा व वर्चस्व जगभरात अव्वल नंबरवर राखण्याबाबतचं वक्तव्य करणाऱ्या डोनाल्ड ट्रंप नावाच्या अब्जाधीश उद्योगपतीची, याहीवेळेस […]

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”… Read More »

हे सगळं अमेरिकेत तेव्हा घडतंय; जेव्हा, भारतात कामगार-चळवळी’चं थडगं बांधण्यासाठी खड्डा खणून, दगड रचून तयार आहेत….

एप्रिल महिना उजाडताच, Amazon.com Inc (AMZN.O) या फार मोठ्या अमेरिकन कंपनीच्या न्यूयाॅर्क शाखेत, प्रथमच कामगार-संघटना (युनियन) गुप्तमतदानाद्वारे अस्तित्वात आलीय. आजवर आपल्या कंपनीत युनियनबाजी होऊ नये, यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या कुटील नीतिचा आणि प्रचंड ‘कंपनी-दहशती’चा (Corporate-Terrorism) बेलगाम वापर करुनही, हे ज्यो बायडेन प्रशासनाच्या आशिर्वादाने अघटित घडलेलं आहे! जवळपास १० लाख लोकांना रोजगार पुरविणारी ॲमेझाॅन ही

हे सगळं अमेरिकेत तेव्हा घडतंय; जेव्हा, भारतात कामगार-चळवळी’चं थडगं बांधण्यासाठी खड्डा खणून, दगड रचून तयार आहेत…. Read More »

२२ सप्टेंबर-२०१९च्या अमेरिकेतील “हूस्टन, हाऊडी मोदी” तमाशाचा एकमात्र निष्कर्ष….. “गोरे आणि हुजरे”!!!

बरोब्बर सव्वादोनशे वर्षांपूर्वी अशाच हुजऱ्यांनी… आपल्या सत्तापिपासू स्वार्थासाठी इंग्रजांच्या सत्तेला आपल्या देशात आधार दिला होता आणि पुढे तब्बल दिडशे वर्षे, या गोऱ्या इंग्रजांना तमाम भारत लुटू दिला होता, गुलाम बनवू दिला होता… जालियनवाला बागेसारखं हत्याकांड घडूनही त्यांच्या अमानुष स्वार्थी भूमिकेत, तेव्हाही काडीमात्र फरक पडला नव्हता, एवढे ते संवेदनशून्य स्वार्थांध असे “गोऱ्यांचे पक्के हुजरे” होते ….आणि,

२२ सप्टेंबर-२०१९च्या अमेरिकेतील “हूस्टन, हाऊडी मोदी” तमाशाचा एकमात्र निष्कर्ष….. “गोरे आणि हुजरे”!!! Read More »