मराठी

“लबाड लांडगं ढाँग करतंय…लगीन करायचं साँग करतंय!”

एकापाठोपाठ एक परिस्थितीवशात ‘माफीचा रतीब’ घालणाऱ्यांनो, आम्ही मतदार म्हणून अनेकदा मूर्ख बनत असतो…कधि ‘सब का साथ, सब का विकासा’च्या नादानं; तर, कधि ‘बालासोर सर्जिकल-स्ट्राईक’च्या रुपानं…आम्ही सहजी मूर्ख बनवले जात असतो…आणि, प्रत्येक निवडणुकीदरम्यान ‘उल्लू’ तर पिढ्यानपिढ्या बनलेलो असतोच (सध्या, आम्ही सत्ताधाऱ्यांचे अचानक ‘लाडके भाऊबहिण’ झालोत)…पण, आम्हाला एवढेही ‘बिनडोक’ समजू नका की, आमच्या ‘महाराष्ट्र-पुरुषा’चा पुतळा, तुमच्या किळसवाण्या […]

“लबाड लांडगं ढाँग करतंय…लगीन करायचं साँग करतंय!” Read More »

“भ्रष्टाचाराच्या छायेत शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा अपमान”

पाश्चात्य देशात, जनता स्वतः वर्गणी जमा करुन आपापल्या राष्ट्रपुरुषांचे, महापुरुषांचे पुतळे उभारते…अगदी, अमेरिकन ‘स्वातंत्र्य देवतेचा पुतळा’ (Statue Of Liberty) देखील, विविध सार्वजनिक-उपक्रम राबवून, जनतेनेच पैसा गोळा करुन उभारला होता. पण, आपल्याकडे जनतेला भांडवली-व्यवस्थेनं एवढं ‘कफल्लक’ आणि राजकारण्यांनी एवढं ‘फुकटं’ बनवून ठेवलंय की, जनता पुतळे उभारण्यासाठी सोडाच; पण, निवडणुका लढवण्यासाठी देखील कपर्दिकही (जुन्या काळचं नाणं) देत

“भ्रष्टाचाराच्या छायेत शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा अपमान” Read More »

काश्मीरची नव्हे आणि बदलापूरची तर नव्हेच नव्हे….तर, अगदी ताजी घटना आहे ही झारखंडची!

झारखंडची राजधानी रांचीच्या मोराबादी मैदानावर भाजपा युवा मोर्चातर्फे ‘आक्रोश-रॅली’ आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान, झालेल्या हिंसाचारात भाजपा-युवा मोर्चावाल्यांनी अट्टल दंगेखोरांसारखी खुलेआम पोलिसांवर तूफान दगडफेक करत त्यापैकी अनेक पोलीसांना गंभीर जखमी केलंय… बदलापुराच्या घटनेतील छुटपुट दगडफेकीचं निमित्त साधून समस्त बदलापूरकर-आंदोलकांना, मोठी पोलिसी-कार्यक्षमता दाखवत (जी एरव्ही, अंबरनाथ-बदलापुरच्या गुंड राजकारण्यांकडून दिवसाढवळ्या सर्रास गुन्हे घडत असताना पेंड खात असते),

काश्मीरची नव्हे आणि बदलापूरची तर नव्हेच नव्हे….तर, अगदी ताजी घटना आहे ही झारखंडची! Read More »

“घटनात्मक अथवा संविधानिक न्यायालय म्हणून गणल्या गेलेल्या उच्च न्यायालयाचा ‘महाराष्ट्र-बंद’ बाबतचा निर्णय पटला नसला; तरी, निर्णयाचा सन्मान राखणं मान्य, पण…..”

“घटनात्मक अथवा संविधानिक न्यायालय म्हणून गणल्या गेलेल्या उच्च न्यायालयाचा ‘महाराष्ट्र-बंद’ बाबतचा निर्णय पटला नसला; तरी, निर्णयाचा सन्मान राखणं मान्य, पण…..” …यातून काही गंभीर प्रश्न अनुत्तरित रहातायत, ज्याचं ‘सूतोवाच’, मा. उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या आजच्या ताज्या पत्रकार-परिषदेत केलंय…. तोच धागा पकडून आम्ही खालील सवाल जनतेसमोर ठेवत आहोत; ———————————————————————- ** न्यायालयाने फक्त उद्याचा ‘बंद’ बेकायदेशीर असल्याचा आज

“घटनात्मक अथवा संविधानिक न्यायालय म्हणून गणल्या गेलेल्या उच्च न्यायालयाचा ‘महाराष्ट्र-बंद’ बाबतचा निर्णय पटला नसला; तरी, निर्णयाचा सन्मान राखणं मान्य, पण…..” Read More »

बांगलादेशातल्या हिंदुंसाठी ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘सरसंघचालक’ सर्वश्री मोहन भागवत…भारतातल्या हिंदुंविषयी कधि अश्रू ढाळणार…???

बांगलादेशातल्या हिंदुंसाठी ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘सरसंघचालक’ सर्वश्री मोहन भागवत…भारतातल्या हिंदुंविषयी कधि अश्रू ढाळणार…??? त्यांच्या आडनावातली ‘भगवतता’…व्यवहारात कधि उतरणार, व्यवहारात कधि दिसणार?? …शेजारच्या बांगलादेशातल्या हिंदुंविषयी एवढी कणव जर सरसंघचालक खरंच बाळगून असतील…तर, अशा ‘संवेदनशील’ सरसंघचालकांसमोर, एखाद्या आटपाटनगरीची कहाणी असावी तशी, आपल्याच देशातल्या ‘औद्योगिक व सेवा क्षेत्रा’तल्या नगरीतली… करोडो आत्म्यांची करुण कहाणी, आज मांडायचं ठरवलंय (अर्थातच, त्यांना हे

बांगलादेशातल्या हिंदुंसाठी ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘सरसंघचालक’ सर्वश्री मोहन भागवत…भारतातल्या हिंदुंविषयी कधि अश्रू ढाळणार…??? Read More »

The 78th Independence Day and the ‘Industrial-Scenario’ of the Present Day…!!!

The conclusion of the 16th Loksabha Election, was aptly termed as the ‘Rockefeller Moment’ for Corporate-India. The real economic power-shift towards ‘Crony-Capitalists’ or Oligarchs, gave rise to the damned reality that the real stream of power started flowing from the Corporate-Club 2.0. The way, Seeta in Ramayana was hijacked by demon Ravana, the same way,

The 78th Independence Day and the ‘Industrial-Scenario’ of the Present Day…!!! Read More »

शनिवार, दि. १० ऑगस्ट-२०२४ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या, ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथील कार्यक्रमाप्रसंगी, काही ‘राज’कीय-समाजकंटकांनी जो काही धिंगाणा घातला, त्यावर ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांचे परखड भाष्य…

गुजराथी-भाषिक बड्या भांडवलदारांसमोर ‘ब्र’ काढण्याची आणि ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधातला ‘क’ काढण्याची हिंमत नसलेल्या…तकलादू, डरपोक मराठी-राजकारण्यांनी राणाभीमदेवी थाटात गर्जना करण्याचे, धमकावण्याचे आणि ‘राडा-संस्कृती’च्या नादाने पोलिस-केसेस अंगावर घ्यायला लावून…मराठी तरुण पिढ्या न् पिढ्या बरबाद करण्याचे ‘राजकीय-धंदे’, आतातरी आवरते घ्यावेत…!!! ————————— “भितीपोटी गर्भगळीत झालेले विरोधी पक्ष नेते आणि ‘लोकशाही-देवते’चं सत्ताधाऱ्यांकडून झालेलं ‘अपहरण’ आणि ‘वस्त्रहरण’ पाहून गोंधळलेली-धास्तावलेली जनता”, हे जगाच्या

शनिवार, दि. १० ऑगस्ट-२०२४ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या, ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथील कार्यक्रमाप्रसंगी, काही ‘राज’कीय-समाजकंटकांनी जो काही धिंगाणा घातला, त्यावर ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांचे परखड भाष्य… Read More »

हाती गद्दारीचा ‘खंजीर’ असणाऱ्यांना, महाराष्ट्राचा ‘खंबीर’ कामगार, हेच योग्य उत्तर होय!

“महाराष्ट्रात महागुंतवणूक” अशा दिलखेचक शीर्षकाखाली लिथियम बॅटरी, EV, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मितीच्या वगैरे क्षेत्रातील ८१ हजार कोटींच्या राज्यातील गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांची व त्यातून, २०-२५ हजार थेट रोजगारांची; तर, ५० हजार अप्रत्यक्ष रोजगारांची राणाभीमदेवी थाटात देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच मोठी गर्जना केलीय (उपमुख्यमंत्री अशा महत्त्वपूर्ण घोषणा करत असतात…तेव्हा, मुख्यमंत्री फक्त ‘तोंडी लावण्यापुरतेच’). या घोषणांचे पतंग हवेत

हाती गद्दारीचा ‘खंजीर’ असणाऱ्यांना, महाराष्ट्राचा ‘खंबीर’ कामगार, हेच योग्य उत्तर होय! Read More »

भारतातील हवामान संकट: उत्तराखंड ते केरळ, पर्यावरण संवर्धनाची निकड

दोनर्षांपूर्वी उत्तराखंड, आता केरळ (वायनाड…जिथे, हवामानखात्याकडून फक्त तयारीला लागण्याच्या, २४ तासात जास्तीतजास्त २०४.४ मि.मी. पावसाच्या नारिंगीरंगाची सावधगिरीची सूचना अथवा ‘ऑरेंज ॲलर्ट’ दिला गेला होता; पण, प्रत्यक्षात दुपटीहून अधिक म्हणजे ४०९ मि.मी. पाऊस पडला आणि दिडशे लोक मृत्यूमुखी; तर, दोनशेहून अधिक गंभीर जखमी झाले) आणि पुढे ‘कोकण की, मुंबई’…??? पश्चिम घाट परिसरातील जैवबहुविधतेचं संरक्षण व जतन

भारतातील हवामान संकट: उत्तराखंड ते केरळ, पर्यावरण संवर्धनाची निकड Read More »

(सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख, सर्वश्री उद्धवजी ठाकरे यांना, त्यांच्या ६४व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणारा व शुभेच्छा देणारा ‘धर्मराज्य-संदेश’….)

मा. उद्धवजी, ६४व्या वाढदिवसानिमित्त, आपले आमच्या ‘धर्मराज्य-परिवारा’तर्फे; तसेच, तमाम महाराष्ट्रीय-भारतीय जनतेतर्फे अभीष्टचिंतन व आपल्याला शतकोत्तर निरोगी आयुष्य लाभण्यासाठी मनःपूत शुभेच्छा! आपल्या वयाची ‘चौसष्टी’ पूर्ण करत, आपण आज वयाच्या ‘चांगदेव-पासष्टी’त प्रवेश करत आहात…. ‘‘सुवर्णाचे दागिने घडवले, म्हणून त्याच्या सोनेपणात उणीव निर्माण होत नाही किंवा मातीची भांडी घडवली म्हणून मातीच्या गुणधर्माचा क्षय होत नाही वा चंद्रावर सोळा

(सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख, सर्वश्री उद्धवजी ठाकरे यांना, त्यांच्या ६४व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणारा व शुभेच्छा देणारा ‘धर्मराज्य-संदेश’….) Read More »