“लालकृष्ण अडवाणींना ‘गहना कर्मणो गतिः’, या श्रीकृष्णाच्या गीतेतल्या कर्मसिद्धांताचा जळजळीत प्रत्यय, अयोध्येतल्या राममंदिराच्या उद्घाटनानिमित्त चांगलाच आला असेल…!!!”
अडवाणी, विनय कटियार, उमा भारती…ज्यांनी ज्यांनी म्हणून, ‘मंदिर वहीं बनायेंगे’ म्हणत दीर्घकालीन आंदोलन केलं, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगले…त्यापैकी बहुतेक कुणालाही निमंत्रण नसावं? अडवाणींना तर, अगोदर निमंत्रण देत, नंतर प्रकृति-अस्वास्थ्याचं कारण जबरदस्तीने द्यायला लावून निमंत्रण अचानक रद्द करण्यात आलं. नितीन गडकरी, राजनाथसिंह यांची अवस्था तर उद्घाटन-समारंभात, “हरवले आहेत, कुणाला सापडले तर कळवा”, अशी केविलवाणी झालेली! […]