‘शिवाजी विद्यापीठा’चा नामविस्तार, “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” करण्याच्या मागणीच्या निमित्ताने……
‘शिवाजी’, हे मराठी घराघरात शिरलेलं हक्काचं नुसतं ‘नाव’ नाही, मराठी नीतिमत्तेचं आणि बुलंद शौर्याचं नुसतं ‘गाव’ही नाही… तो आहे, प्रत्येक मराठी हृदयाचा प्रेमानं घेतलेला ‘ठाव’!!! … ओसंडून वहाणाऱ्या अंतर्यामी प्रेमाला वरकरणी आदराची ‘क्षिती’ नाही, त्यामुळेच केवळ ‘शिवाजी’ उच्चारल्यानं कुठल्याही अनादराची काडीमात्र ‘भिती’ही नाही! छत्रपती शिवाजी महाराज, या नावात उत्तुंग आदर ओतप्रोत भरलेला जरुर आहे… तसा […]