तमाम कामगारांसाठी… फ्रान्समधील चौथ्या क्रांतीचं मर्म (क्रांती-वर्षे…१७८९, १८३०, १८४८ आणि २०२४)….
ज्या फ्रेंच-राज्यक्रांतीनंतरच, संसदेत बसण्याच्या व्यवस्थेतून ‘डावे’ (साम्यवादी-समाजवादी गट) आणि ‘उजवे’ (भांडवलवादी गट) अशा दोन परस्परविरोधी विचारसरणीच्या लोकांचं विभाजन जगभरात रूढ झालं…त्याच फ्रान्समधे, नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्रेंच नॅशनल ॲसेंब्ली’च्या सार्वत्रिक-निवडणुकीत डाव्यांना मोठा ऐतिहासिक विजय मिळालाय… आणि, तो विजय म्हणजे जणू, युरोप-अमेरिकेसारख्या भांडवलप्रधान राष्ट्रांमधल्या बदलत्या सामाजिक व राजकीय वातावरणाची नांदीच होय! यंदाच्या फ्रान्समधील निवडणुकीत ‘न्यू पाॅप्युलर फ्रंट’ […]