२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”?

सध्या आहे त्या अवस्थेतल्या लुटारु-शोषक ‘भांडवली-व्यवस्थे’तली ‘बँकिंग-व्यवस्था, जनसामान्यांना खरंच आकळायला लागली (जे फार काही अवघड मुळीच नव्हे) तर, रिझर्व्ह बॅंकेसह सर्वच बँकांची पद्धतशीर लूट कशी सुरु आहे, ते जनतेला हळूहळू ध्यानात येईल. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन किंवा ऊर्जित पटेल, ती लूट करु देत नव्हते… म्हणून, पं. नरेंद्र मोदींनी त्यांना नाहक बदनाम करताना, “रिझर्व्ह बॅंकेच्या तिजोरीवर वेटोळं घालून बसलेले नाग”, अशी संभावना केली होती.

बँकिंग-व्यवस्था, जनताला आकळू लागली की, १० लाख कोटी रुपयांची आपल्या बड्या गुजराथी-भांडवलदार मित्रांची (निवडणुकीसाठी शेकडो-हजारो कोटींच्या छुप्या व उघड  देणग्या देणारे) कर्जे, नरेंद्र मोदी-अमित शहा सरकारने कशी माफ केली, ते तिला कळेल आणि शेतकऱ्यांची कर्ज माफ करताना किंवा कामगार-कर्मचारीवर्गाला चांगलंचुंगलं ‘किमान-वेतन’ देताना; तसेच, रोहयो (रोजगार हमी योजना), अन्नसुरक्षा व आरोग्य-शिक्षण सेवेसारख्या लोककल्याणकारी योजनांवर खर्च करताना हे निर्दय, हुकूमशाही भाजपाई-सरकार हात पूर्ण आखडता का घेतं, हे सहजी आकळेल… एवढंच नव्हे तर, ८ नोव्हेंबर-२०१६ रोजी अचानक केलेली ‘नोटबंदी’, ही शतकातला सर्वात मोठा घोटाळा कशी होती, हे ही जनतेला समजून येईल.

…पण, त्यानंतर जे काही होईल, ते क्रांतिपेक्षा कमी नसेल; ज्यात, रक्तपिपासू-शोषक भांडवलशाही-व्यवस्थेचं बुजगावणं, लोकक्षोभात जळून भस्म होईल… देशात, ‘कार्ल मार्क्स’प्रणित साम्यवादी-समाजवादी स्थायी-व्यवस्था निर्माण होऊन (जो, सध्या जगभरातला जनमताचा मोठा क्रांतिकारी असा ‘डावीकडे कल’ आहे) सर्वसामान्य जनता, भांडवलदारांच्या जोखडातून कायमची मुक्त होऊन मोकळा श्वास घेऊ शकेल!

…एक असा समाज निर्माण होईल ज्यात, टोकाची व अमानुष स्वरुपाची आर्थिक-विषमता कधिही नसेल. कोणीही अदानी-अंबानी किंवा अमेरिकेन ॲमेझाॅनच्या ‘जेफ बेझोस’सारखा विकृत अतिश्रीमंत (Blood- Billionare) नसेल; जनतेतला फक्त, अल्पसंख्याकवर्ग आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याऐवजी म. गांधी,  पं. जवाहरलाल नेहरु व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली ‘आर्थिक-समानता’ बर्‍यापैकी येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, “भांडवली-व्यवस्थेतल्या चंगळवादी जीवनशैली व कार्बनकेंद्री आर्थिक-प्रारुपामुळे होणारं कार्बन-ऊत्सर्जन  झपाट्याने घटून निसर्ग-पर्यावरणीय महासंकटातून मानवजातीसह अवघी सजीवसृष्टी उध्वस्त होण्याचा धोका टळू शकेल!”

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)