कंत्राटी कामगार

मधुरा स्वामिनाथन आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराची भाजपाई खिरापत…..

एका बाजुला ‘भारतरत्न’ पुरस्काराची ‘खिरापत’ वाटणार्‍या…आणि, दुसर्‍या बाजुला शेतकरी-शेतमजूर, कामगार, उच्चपदस्थ अधिकारीवर्गाकडून ‘खच्चीकरण’ करण्यात आलेला पोलीसदलातील हवालदार-शिपाईवर्ग, लष्करात भरती होऊ पहाणारी नवतरुणाई (तथाकथित, अग्निपथावरील अग्निवीर), ट्रकचालक-रिक्षावाले, सेवेतून निवृत्त झालेला समस्त कामगार-कर्मचारीवर्ग….अशा, देशातल्या तळागाळातील सर्वच समाज-घटकांवर ‘आफत’ आणणाऱ्या; मोदी-सरकारचं ‘मधुरा स्वामिनाथन’कृत ‘वस्त्रहरण’…. ———————————————– ज्यांनी, १९६०च्या दशकात भारतात ‘हरितक्रांती’ आणली, त्या एम. एस. स्वामिनाथनांची मुलगी मधुरा स्वामिनाथन …

मधुरा स्वामिनाथन आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराची भाजपाई खिरापत….. Read More »

४१ कामगारांची उत्तराखंडच्या ढासळलेल्या बोगद्यातून एकदाची सुटका झाली…या सुटकेच्या ‘तमाशा’चं कवित्व शिल्लक उरलंय, त्यातून निर्माण झालेले काही अनुत्तरित प्रश्न…!!!

**जर कुठले बडे राजकारणी किंवा बडे सरकारी अधिकारी अथवा त्यांचे कुटुंबिय…जर, या ‘मानवनिर्मित’ आपदेत सापडले असते; तर, सुटकेसाठी एवढा प्रदीर्घ काळ लागला असता का? **समस्त पर्यावरणतज्ज्ञ ठिसूळ हिमालयीन प्रदेशाशी बोगदा खणणे, खाणकाम करणे वगैरे धोकादायक खेळू नका, असे तडफडून सांगत असताना व यापूर्वी, अशा दुःसाहसातून अनेक जीवघेण्या मोठमोठ्या दुर्घटना घडल्या असतानाही…निसर्गाशी द्यूत खेळण्याचा, हा अवसानघातकी …

४१ कामगारांची उत्तराखंडच्या ढासळलेल्या बोगद्यातून एकदाची सुटका झाली…या सुटकेच्या ‘तमाशा’चं कवित्व शिल्लक उरलंय, त्यातून निर्माण झालेले काही अनुत्तरित प्रश्न…!!! Read More »

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’

कालपरवापर्यंत, देशामधील अनेक कंपन्या-कारखान्यांमध्ये, विशेषतः, महाराष्ट्रातील रासायनिक उद्योगांमध्ये, औद्योगिक-अपघातांची मालिका सुरुच आहे. यावर ताण म्हणजे, ‘आऊटसोर्सिग’च्या शोषणकारी नव-भांडवली तंत्रातून बनलेल्या छोट्यामोठ्या वर्कशाॅप्समधील तर, सातत्याने होणाऱ्या शेकडो-हजारो अपघातांची ना कुठली नोंद, ना मरणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्या ‘कामगार’ नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ची कुणाला पर्वा! …औद्योगिक-सुरक्षिततेचे अतिशय खर्चिक व काटेकोर नियम पाळण्यात अमानुष हेळसांड संबंधितांकडून होत असल्यानेच, ती मानवनिर्मित …

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’ Read More »

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”?

सध्या आहे त्या अवस्थेतल्या लुटारु-शोषक ‘भांडवली-व्यवस्थे’तली ‘बँकिंग-व्यवस्था, जनसामान्यांना खरंच आकळायला लागली (जे फार काही अवघड मुळीच नव्हे) तर, रिझर्व्ह बॅंकेसह सर्वच बँकांची पद्धतशीर लूट कशी सुरु आहे, ते जनतेला हळूहळू ध्यानात येईल. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन किंवा ऊर्जित पटेल, ती लूट करु देत नव्हते… म्हणून, पं. नरेंद्र मोदींनी त्यांना नाहक बदनाम करताना, “रिझर्व्ह …

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”? Read More »

“एका कायम कर्मचाऱ्याच्या जागी तीन कंत्राटी-कर्मचारी”- अजित पवार (उपमुख्यमंत्री)

सन्माननीय उपमुख्यमंत्री सर्वश्री अजितदादा पवार, “शासकिय-सेवेत एका ‘कायम’ कर्मचाऱ्याच्या जागी तीन ‘कंत्राटी-कर्मचारी’ घेता येतील”, या आपल्या ‘कामगारहितदक्ष कल्याणकारी-उच्चारणा’ला एकप्रकारचं ‘कामगारविरोधी वाक्ताडन’च समजून… आम्ही पामरांनी फार चुकीचा अर्थ लावला हो आणि आपल्यावर नाहक टीकेचा केवढा काहूर माजवला आम्ही… प्रथम, त्याबद्दल क्षमस्व! आपला मूळ उद्देश किती गहन होता, हे अंमळ उशिरानेच आमच्या ध्यानी आलं (“आपण बोलून मोकळं …

“एका कायम कर्मचाऱ्याच्या जागी तीन कंत्राटी-कर्मचारी”- अजित पवार (उपमुख्यमंत्री) Read More »

दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’

भांडवली-व्यवस्थेच्या दमनकारी दबावाविरुद्ध; तसेच, कंपनी-दहशतवादाविरोधात (Corporate-Terrorism) छाती पुढे काढून तडफेनं व एकजुटीने संघर्षरत रहात… तप्त मुशीतून बाहेर पडलेल्या सोन्यासारखं तावूनसुलाखून निघण्याऐवजी, मराठी कामगार… आपापसात फाटाफूट करत व ‘‘कामगारच कामगाराचा शत्रू बनत’’… गद्दारी व पळपुटेपणा करताना दिसतोय… दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’ सेवन करत, ‘‘नरेचि केला हीन किती नर’’, याचा अवघ्या कामगार-विश्वाला कंपन्या-कंपन्यांमधून परिचय देतोय, …

दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’ Read More »

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!!

विधिमंडळात विरोधी पक्षाच्या बाकांवर बसल्यावरच कसा, सगळ्या राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांचा उमाळा येतो??? … एरव्ही, सत्तेच्या खुर्चीची ऊब घेताना, ही डरकाळ्या फोडणारी मंडळी, निवडणूक-निधीसाठी उद्योगपतींच्या ताटाखालची ‘म्याऊँ’ बनून असतात! संतापजनक बाब ही, की, यातले कोणीच कधि कामगारांचे ‘कैवारी’ नसतात; उलटपक्षी, उघड उघड सरळसोट ‘वैरी’ असतात (म्हणूनच तर, कंत्राटी-कामगार पद्धतीची आणि ‘नीम’ NEEM ची अमानुष गुलामगिरी उद्योग-सेवाक्षेत्रात …

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!! Read More »

‘‘गाय कसायाला धार्जिणी!!!’’

कामगार नावाची ‘गाय’ आणि मोदी-शहा सरकार नावाचा ‘कसाई’ व यासंदर्भातील, एक चपखल अर्थवाही मराठी म्हणं, ती अशी… ‘‘गाय कसायाला धार्जिणी!!!’’ ‘कामगारद्रोही’ नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या भाजपा सरकारचा ‘‘NEEM’’ (National ‘Employability’ Enhancement Mission नव्हे; तर, National ‘Exploitation’ Enhancement Mission) च्या भयंकर घातकी प्रहारानंतर, भोळसट-बावळट कामगारवर्गाला ‘महामूर्ख’ किंवा संपूर्ण ‘उल्लू’ बनवू पहाणारा, प्राॅव्हिडंट फंडा संदर्भात (भविष्यनिर्वाह निधी), …

‘‘गाय कसायाला धार्जिणी!!!’’ Read More »

संघटनात्मक-ताकद

एक दगड उचला आणि कुत्र्याला मारा…. बघा, तो लगेच कुई कुई ओरडत पळून जाईल  पण, तोच दगड पुन्हा उचला बघू, आणि, आता फेका, मधमाश्यांच्या पोळ्यावर…. क्षणार्धात, त्या सर्व मधमाशा मिळून एकजुटीने तुमच्यावर असा काही हल्लाबोल करतील की, तोबा तोबा…. तुम्ही जीव घेऊन, दगडाने भेदरलेल्या कुत्र्यापेक्षा, जास्त वेगाने ढुंगणाला पाय लावून पळून जाल! दगड तोच… आणि मारणाराही तोच… …

संघटनात्मक-ताकद Read More »

“कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय!

नरेंद्र मोदी सरकारने वर्ष, २०१७-१८ मध्ये आणलेली “नीम”… NEEM (National Employability Enhancement Mission) योजना, म्हणजे “नॅशनल एम्प्लाॅयाॅबिलिटी एन्हान्समेंट मिशन” नसून, उद्योगपती-व्यवस्थापकीयवर्गाच्या, चांगलीच पथ्यावर पडणारी (म्हणजे, पडद्यामागून त्यांनीच नरेंद्र मोदीं सरकारकरवी आणलेली) आणि तमाम कामगार-कर्मचारी वर्गाची बेमालूम फसवणूक करत, “कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय! “नीम” (NEEM) हे, “स्किल-इंडिया” …

“कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय! Read More »