ॲडाॅल्फ हिटलर का गुरु… ‘बेनेटो मुसोलिनी’ अभी जिंदा है और ‘काली टोपी’ पहना है…!!!

काल शिवतीर्थावरील शिवसेनेच्या पारंपरिक ‘दसरा-मेळाव्या’त, आपल्या आक्रमक शैलीतील भाषणात मा. उद्धवजींनी ज्या ‘काळ्या टोपी’चा उल्लेख केला (यापूर्वीही, छत्रपती संभाजीनगरमधील भाषणात, “संघाची टोपी ‘काळी’ का, ‘भगवी’ का नाही?”, असा तो प्रकर्षाने त्यांच्याकडून झाला होताच)…याचं फार मोठं औचित्य आपल्याला “4PN News Network”तर्फे प्रसारित करण्यात आलेल्या, वरील अतिशय महत्त्वपूर्ण अशा व्हिडीओतून, वाचकांच्या ध्यानात यावं!

…खरंतरं, बेनेटो मुसोलिनीच्या ‘काळी टोपी, हाफ पँट’च्या ‘काळ्याकुट्ट’ कारकीर्दीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्या बिरुदाखाली संदेशात्मक काही लिहावंच… असं मनात योजित असतानाच, हा सर्वागसुंदर असा प्रभावी व्हिडीओ, संजय शर्मा यांच्या “4PN News Network”च्या अजय शुक्ला यांनी सादर करुन फार मोठं प्रबोधनात्मक कार्य पार पाडलंय, यात तिळमात्र शंका नाही. त्या उभयतांचं व त्यांच्या पत्रकार-चमूचं मनापासून कौतुक व आभार!

हा व्हिडीओ, आपण जरुर पहावाच; पण, त्याहीपेक्षा नवतरुणपिढीने त्याचा अभ्यास करावा व स्वतःच्या वैचारिक-बौद्धिक कुवतीनुसार त्यावर निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

https://youtu.be/vtXMswa7KOI?si=XSx-pTmLhU2003CS