कोलरॅडो, लुझियाना, इलॅनाॅईस यांच्या पाठोपाठ मेन (Maine) हे अमेरिकन राज्य बंदुकीतून गोळीबाराच्या सामूहिक-हत्याकांडांचं (Mass-Shooting) लक्ष्य बनलंय…

जवळपास ३२ जण ठार व ६० पेक्षा अधिक लोकं जखमी झालेत. या वर्षाला संपायला अजून दोन महिन्यांहून अधिक काळ शिल्लक असताना, हे एकूण ५६५ वे सामूहिक-हत्याकांड घडलंय, याचाचअर्थ,  वर्ष-२०२१चा अशा एकूण ६८६ घटनांचा काळा-विक्रम या वर्षी मोडला जाऊ शकेल, अशी गंभीर स्थिती आहे. आजवर दरदिवशी १२० या हिशोबाने ४३,३७५ अमेरिकन माणसं, दरवर्षी बंदुकीच्या गोळीबारात मारली जातात. तरीही, अनिर्बंध बंदुकीच्या वापरावर कडक निर्बंध घालण्याची, कुणा एका अमेरिकन अध्यक्षाची हिंमत होऊच शकत नाही… एवढी, ‘भांडवलदार’ अमेरिकेतल्या ‘भांडवली-व्यवस्थे’तील बंदूक-उत्पादकांची संघटना शक्तिशाली आहे. अमेरिकेतील शस्त्रास्त्र-निर्मिती करणारे लाॅकहिड-मार्टिन, रेथाॅन टेक्नाॅलाॅजिज, बोईंग सारखे बडे बडे कारखाने चालावेत म्हणूनच, जगातली युद्धे, कधिच थांबू शकत नाहीत…कारण, वेळोवेळी ढासळणारी अमेरिकन-अर्थव्यवस्था सावरुन धरण्याचं तथाकथित ‘महत्कार्य’ या कंपन्या, परंपरागतरित्या करत आलेल्या आहेत.

‘लोकशाही-राज्या’चा व जगातील मानवी-हक्कांच्या संरक्षणाचा खोटा मुखवटा धारण करणाऱ्या, तमाम अमेरिकन भांडवलदारवर्गाचा हा आत्यंतिक क्रूर, हिडीस व अमानुष अशा खरा चेहरा आहे!

ॲपल, अमेझाॅन,मायक्रोसॉफ्ट, वाॅलमार्ट, फेसबुक, टेस्ला, गुगल (अल्फाबेट) सारख्या महाकाय अमेरिकन-कंपन्यांची, जी काॅर्पोरेटीय-क्षेत्रात भयंकर दहशतवादी दादागिरी (Corporate-Terrorism) जगभरात सर्वत्र चाललेली आहे… ती जगभरातल्या नामचीन दहशतवादी-संघटनांनासुद्धा मान खाली घालायला लावेल आणि हीच अमेरिकन लोकं, साम्यवादी (कम्युनिस्ट) देशांमधील मानवी-हक्कांना पायदळी तुडवलं जाण्याबाबत, गेली कित्येक दशके कोल्हेकुई करत आलेली आहेत… पण, वर्ष-१९९१मध्ये सोव्हिएत रशिया कोसळल्यानंतर व डेंग झिओपिंग यांच्या नेतृत्त्वाखाली चीनने भांडवली-अर्थसुधारणा (Economic-Reforms) हाती घेतल्यानंतर… जगभरातलं साम्यवादाचं (कम्युनिझमच) आव्हानच संपुष्टात आल्यावर, या अमेरिकन भांडवली-व्यवस्थेतल्या लोकशाहीचा भेसूर, हिंसक खरा चेहरा आता जगाला दिसू लागलाय… व्हिएतनाम-अफगाण युद्धातला पराभव व त्यातील अमेरिकन मनुष्यहानी तसेच, ९/११ चा अमेरिकेवरील आतंकी हल्ला आणि अशी  सामूहिक-हत्याकांडाद्वारे वगैरे बंदुकीतून किडामुंगीसारखी मारली जाणारी अमेरिकन माणसं, ही अमेरिकन ‘विषवृक्षा’ला लागलेली कटू फळं आहेत… त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या पातकांची सजा आहे!

तेव्हा, मूळ मुद्द्यावर येताना, जर शक्तिशाली बंदूक-उत्पादकांची अमेरिकन संघटना (Gun-Lobby), अमेरिकन सरकार नियंत्रणात आणू शकत नाही… तर, पॅलेस्टाईनींच्या ऊरावर, त्यांच्या क्रूर हत्या करुन व त्यांना त्यांच्या रहात्या घरांतून हुसकावून लावून जबरदस्तीने वसवल्या व वाढवल्या गेलेल्या, माणुसकीचा वैरी असलेल्या क्रूर-हिंसक इस्रायलला… त्यांची अतिश्रीमंत व राजकीयदृष्या प्रचंड शक्तिमान असलेल्या अमेरिकन ज्यू-यहुदी अमेरिकन संघटना (Jewish-Lobby) चोवीस तास सज्ज असताना, अमेरिकन-सरकार काय अटकाव करणार…???

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)