अल्पबचत योजनांवरील (PPF, Postal Savings etc.) धक्कादायक व्याजदर-कपातीबाबत अर्थमंत्री अरुण जेटली सांगतात की, “सदरहू योजनांवरील ‘भारतीय व्याजदर’, हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वात मोठे’ व्याजदर आहेत”….. पण, मग हे असले आमचे, बड्या भांडवलदारांचे ‘हस्तक’ असलेले नरेंद्र मोदी सरकारचे अर्थमंत्री, सोयिस्कररित्या हे सांगायला विसरतात की, “जे सामान्य भारतीय नागरिक अशी बचत करतात, त्यांचं ‘पगारमान’ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वात कमी’ पगारमान आहे !”
हीच ती, “कमळ-धनुष्यबाण’वाल्यांची….. “सर्वसामान्य श्रमिकांच्या (महाराष्ट्रात मराठी माणसांच्या !) नेहमीच मुळावर येणारी ‘अभद्र युती’ !!!”
आम्हाला माहितही नसतं की, जेव्हा ‘राम’ वनवासातून अयोध्येला आला तेव्हा, त्याने ‘भरता’ला जे दोन प्रश्न विचारले ते असे होते……
१) अयोध्येची प्रजा आपल्या राज्यकारभारामुळे सुखी आहे का ?
२) आपल्या राज्यातील सेवकांना ‘समाधानकारक वेतन’ मिळतयं का ??
…..शिवछत्रपतींनी तर, “सत्तेवर येताच सरंजामदारी व सामंती व्यवस्थे‘नं ज्यांच्या जगण्यात अस्थैर्य निर्माण केलं होतं, त्या शेतजमीन कसणार्या गोरगरीब ‘कुळां‘ना कायमची स्थिरता बहाल केली व त्या दुःखी जीवांच्या जगण्यात प्रथमच आनंद निर्माण केला”….. तर इकडे, उठताबसता श्रीराम, शिवछत्रपती व बाबासाहेबांच्या नांवाने प्रचंड नफ्याचा ‘राजकारणाचा धंदा’ करणार्या या चोर व दरोडेखोरांनी, “उद्योग व सेवाक्षेत्रात कंत्राटी-कामगार/कर्मचारी प्रथा राबवून आणि कामगार-कायद्यांची वासलात लावून”, नव्या सरंजामशाही व सामंतशाहीची ‘मोगलाई’ या देशात-महाराष्ट्रात घट्ट रुजवलीयं !!!
….. तरीही आम्ही ‘मराठी कामगार-कर्मचारी’ बावळटासारखे अज्ञानाने, त्या “कमळ-धनुष्यबाण‘वाल्यांच्या नादाने, भाकड व ढोंगी ‘हिंदुत्वा‘च्या गप्पा मारत म्हणत रहाणार, “जय श्रीराम…. जय भवानी….. जय शिवाजी” !!!
जय महाराष्ट्र । जय हिंद ।।
…राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)