“ISI तपास करणार ISI चा”

ज्याचा उल्लेख आम्ही, “ISI तपास करणार ISI चा”! असा मागल्या खेपेस केला होता…. त्या, ‘पठाणकोट हल्ल्याच्या तपासणी’साठी आलेले पाकिस्तानी पथक मायदेशी परतताच, त्या तपासकामी ‘निधड्या छाती’नं (बोगस ५६” छातीनं नव्हे !) समन्वयकाची भूमिका पार पाडणारे, … NIA चे जाँबाज पोलीस उपअधीक्षक ‘तन्जीम अहमद’ यांची, शनिवारी मध्यरात्री (दि. २ एप्रिल-२०१६) दहशतवाद्यांकरवी क्रूर हत्या करण्यात आलीयं, हे कमालीचं धक्कादायक आहे ! तुमच्याआमच्या हृदयातच नव्हे; तर, देशभर एकच संतापाची आणि दुःखाची लाट उसळलेली असताना….. PM (Product Of Media?) नरेंद्र मोदी यांच्या चेहऱयावर मात्र एक प्रकारचं ‘समाधान’ विलसताना दिसू शकेल…. कारण, नरेंद्र मोदींच्या ‘प्याऱया-दुलाऱया’ ‘अदानी उद्योग समूहा’ला त्यांच्या अत्यंत विवादास्पद अशा, जगातल्या सर्वात मोठ्या, १.१२ लाख कोटी डॉलर्स गुंतवणुकीच्या, ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्ड येथील दगडी कोळसा खाणप्रकल्पाला काल रविवारीचं, तीन ठिकाणी खाणकाम करण्यासाठी दीर्घकालीन मुदतीने भाडेपट्टा बहाल करण्यात आल्याची मोठी बातमी हाती आलीयं…..

आजवरच्या इतिहासात सैन्यांनी देश पादाक्रांत केले; पण, तराजूतागडी हाती धरणाऱया व्यापाऱयांनी ते जिंकून घेतलेत, हे एक वैश्विकसत्य आहे !….. आमचं स्वातंत्र्य हे, अनाम व असंख्य स्वातंत्र्यवीरांच्या प्राणारक्ताच्या शिंपणातून आणि अनंत हालअपेष्टा सोसण्यातून मिळालं….. त्या स्वातंत्र्यवीरांच्या मान्यवर मांदियाळीत वासुदेव बळवंत फडके, हरी शिवराम राजगुरू, स्वा. सावरकर, लो. टिळक, चाफेकर बंधू, राणी लक्ष्मीबाई, अनंत लक्ष्मण कान्हेरे, दादा धर्माधिकारी, सेनापती बापट, वीर कोतवाल, नाना पाटील, नरहर गाडगीळ, नरसिंह केळकर, पंडित धुळेकर, बाबू गेनू, नंदुरबारचा शिरीषकुमार यासारखे अनेक महान ‘महाराष्ट्रवीर’ आघाडीवर होते; पण, महाराष्ट्र देशासकट अवघा भारत देश जिंकला कोणी…. तर, “जैन-गुज्जू-मारवाड्यां”नी !! हे असं आक्रित घडल्यानंतर, ‘पठाणकोट’सारखे अनेक घटनाक्रम व त्यावरील राजकीय षंढपणा आणि निवडणुकीच्या भाषणांतील ढोंगीपणा, हा आपल्याला सहजी समजून घेता येऊ शकेल !!!

‘तन्जीम अहमद’ यांच्या बलिदानाच्या बातमी सोबतच, ‘स्विस-लिक्स’नंतर…. “पनामा पेपर्स” नांवाने प्रसिध्द झालेल्या, Tax Havens म्हणून गणल्या जाणाऱया परदेशांतील अतिप्रचंड स्वरूपाच्या काळ्या पैशाच्या गुंतवणुकीच्या भानगडीत, ‘अदानी उद्योग समूहा’च्या गौतम अदानींचा थोरला बंधू ‘विनोद अदानी’ यांचही नांव त्या ‘काळ्या यादा’त मुंबईचा पूर्वीचा अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची, ‘छगन भुजबळ स्कॅम-फेम’ इंडियाबुल्सचा मालक समीर गेहलोत, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय यांच्यासह अग्रक्रमाने ‘पहिल्या यादी’त असल्याची अत्यंत खळबळजनक व सनसनाटी बातमी आजच्या ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये छापून आलीयं !!!

मित्रहो, पुन्हा पुन्हा गर्जून सांगतो की, पेज थ्री कल्चरवाल्यांना किंवा उद्योगपतीव्यापाऱयांना, त्यांचे दलाल असलेल्या राजकारण्यांना….. कुठलाही देश नसतो…. देशप्रेम नसतं…. त्यांना फक्त हाती येणाऱया धनादेशाचं (Cheque) प्रेम असतं…. मग, तो कुठूनही आणि कुठल्याही मार्गाने, काळ्याचा पांढरा होऊन, एकदाचा का होईना !

वाचून रक्त उकळतयं का ते पहा अन्यथा, नेहमीप्रमाणेच थंडपणे (मी षंढपणे अशी अजून टोकाची भाषा वापरत नाहीयं !) टीव्हीवरील करमणुकीचे कार्यक्रम पहात वाचून सोडून द्या…. सोबत भरल्या पोटी ढेकर देत, जय भीम…. जय श्रीराम…. जय भवानी…. जय शिवाजी, बोलायला विसरू नका…… अजून काय बोलणार (कारण, राजकारण नांवाचा तुमच्या सर्वपक्षीय राजकारण्यांचा धंदा’, बिनबोभाट चालूच रहायला नको ?) ???

जय महाराष्ट्र जय हिंद ।।

…राजन राजे (अध्यक्ष धर्मराज्य पक्ष)