‘कार्बन-टॅक्स’ संकल्पना

नेदरलँडमध्ये, कमीतकमी कार्बन ऊत्सर्जन करणार्‍या, अपारंपरिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून, वर्ष-२०२५ पर्यंत पेट्रोल, डिझेलवर चालणार्‍या वाहनांवर बंदीचा प्रस्ताव !

रस्त्यावर धावणारी वाहने ही केवळ, इलेक्ट्रिक, हायब्रीड किंवा हायड्रोजनवर चालणारी ‘ग्रीन वाहने’ असतील, असं या प्रस्तावात म्हटलेलं आहे. भारताचा सख्खा शेजारी असलेल्या भूतान या देशात, यासंदर्भात फार मोठी मजल याअगोदरच मारण्यात आलेली आहे.

भारतातील पहिलावहिला नोंदणीकृत निसर्ग आणि पर्यावरणस्नेही पक्ष असलेला “धर्मराज्य पक्ष”, नेदरलँडमधील ‘लेबर पार्टी’च्या सदरहू प्रस्तावाचं स्वागत करत असून….. गेल्या वर्षअखेरीस (३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर-२०१५) पॅरिसमध्ये पार पडलेल्या COP-21 (किंवा CMP-11) या जागतिक पर्यावरण-परिषदेची जाहीर उद्दिष्ट्ये (INDC… Intended Nationally Determined Contributions) साध्य करण्यासाठी, धर्मराज्य पक्षपुरस्कृत ‘कार्बन-टॅक्स’ संकल्पनेचाही तातडीने सार्वत्रिक अंगिकार केला जावा आणि अखिल जगतातील अवघ्या सजीवसृष्टीला पर्यावरणीय संकटांमुळे उध्वस्त होण्यापासून वाचवावं, असं ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन आंतरराष्ट्रीय जनसमुदायाला आम्ही आवाहन करीत आहोत !!!

…….राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)