“कलम ३५६ मध्ये असलेली ‘संदिग्धता व पळवाट’ !”

भारतीय राज्यघटनेत, ज्या अनेक त्रुटी राहून गेलेल्या आहेत, त्यातील एक महत्त्वपूर्ण त्रुटी म्हणजे, केंद्र सरकारने कुठल्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील घटनेतील कलम ३५६ मध्ये असलेली संदिग्धता पळवाट ! याचाच, गैरफायदा घेऊन ‘हुकूमशाही वृत्ती’च्या स्व. इंदिरा गांधींनी अनेकवेळा (आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत वर्ष १९६६-६७ या दहा वर्षात तब्बल ३९ वेळा राज्यघटनेतील 356 कलमाचा गैरवापर केला) विविध राज्यांतील विरोधी पक्ष सरकारे, अन्यायरित्या कोसळवून राष्ट्रपती राजवट लागू केली होती…..

एच.एन. कुंझरू यांनी घटनेतील या ३५६ कलमाच्या संभाव्य गैरवापराविषयी संसदेत उपस्थित केलेल्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, कुठलही केंद्र सरकार या तरतुदींचा वापर करण्यास धजावणार नाही हे कलम मृताक्षर (Dead-Letters) म्हणूनच केवळ घटनेत पडून राहीलं ! …..मात्र, असं घडणे नव्हते….. बाबासाहेबांचं भाकित साफ खोट ठरवतं, पं. नेहरूच्या काळापासून आजवर, या ३५६ कलमाचा सव्वाशेपेक्षा जास्त वेळा, विविध केंद्र सरकारांमार्फत बेलगाम गैरवापर करण्यात आलेला आहे !

एस.आर. बोम्मई वि. केंद्र सरकार (वर्ष-१९९४) या खटल्यात, सर्वोच्च न्यायालयाने कलम ३५६च्या वापराबाबत दिलेल्या सुस्पष्ट निर्देशांमुळे आणि वर्ष १९८८ मधील सरकारिया आयोगाच्या यासंदर्भातील कडक शिफारशींमुळे, सदरहू ३५६ कलमाच्या गैरवापराला जरी पुढे फार मोठ्याप्रमाणावर आळा बसलेला असला व त्याबाबत भारतीय न्यायालये कडक निगराणी ठेवत असली तरीही….. नरेंद्र मोदी सरकारने इंदिरा गांधीवर वरताण करीत, अरूणाचल प्रदेश पाठोपाठ दोन महिन्याच्या आतच, उत्तराखंडमधील काँग्रेस सरकार या ३५६ कलमाचा ‘हुकूमशाही’ पध्दतीने गैरवापर करून, विधानसभेत बहुमत अजमावण्याच्या एकच दिवस आधी बरखास्त केलेलं आहे.

याच, उत्तराखंड राज्याच्या संदर्भात लक्षात घेण्याजोगी महत्त्वाची बाब ही की, उत्तराखंड हे राज्य, उत्तरप्रदेश राज्यापासून अलग होत, २७वे राज्य म्हणून, भारतीय संघराज्यात निर्माण होत असताना (९ नोव्हेंबर-२०००), तत्कालीन भाजपा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ‘संघराज्यीय प्रणाली’ बळकटीकरणाचा संदेश देण्याच्या सद्हेतूने….. उत्तराखंड हे ‘केंद्रशासित राज्य’ करण्याचा पर्याय समोर खुला असतानाही, तसं ‘न’ करता, एका स्वतंत्र राज्याची निर्मिती केली होती. त्याउलट, देशात ‘हिटलरशाही’ रूजवू पहाणाऱया नरेंद्र मोदींनी अरूणाचल व उत्तराखंडात राष्ट्रपती राजवट लागे करून, या ‘भारतीय संघराज्यीय प्रणाली’वरच केवळ हल्ला चढवलेला नसून, भारत ‘काँग्रेस-मुक्त’ करण्याचा एक अभिनव ‘हुकूमशाही मार्ग’ शोधून काढलेला आहे, असचं म्हणावं लागेल…..

…..आम्ही, ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरून सातत्याने नरेंद्र मोदींची वाटचाल ही, वर्ष १९३०-३३ मधला जर्मनीचा क्रूर हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याच्याच मार्गाने होऊ घातल्याचे गंभीर इशारे देत आलेलो आहोत !!! तेव्हा, मतदारांनो, “जागे रहा, रात्र वैऱयाची आहे !”

(संयुक्त महाराष्ट्रानंतर आता, स्वायत्तमहाराष्ट्र’….. राष्ट्रांतर्गत राष्ट्र, स्वायत्तमहाराष्ट्र !)

जय महाराष्ट्र जय हिंद ।।

… राजन राजे (अध्यक्ष धर्मराज्य पक्ष)