कै. विलास शिंदेंच बलिदान, फुकट जाऊ देणं एक महापातक ठरू शकतं!

वाहतूक हवालदार ‘विलास शिंदें’चं दुःखद निधन, हे आज उभ्या महाराष्ट्रातल्या घराघरातलं ‘आक्रंदन’ बनलयं!…. जशी, १९६२च्या भारत-चीन युद्धात “भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी”, ही नागरिकांच्या आत्म्याची तडफड महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली होती…. तशीच तडफड, काल ‘तुकाराम ओंबळें’साठी आणि आज ‘विलास शिंदें’साठी, महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाच्या ‘आत्म्या’ची होतेयं! ज्यांच्या हृदयाचा एक साधा ठोकाही, माझ्या या मराठी पोलीसासाठी चुकत नाहीयं… चुकलेला नाहीयं, त्या माजलेल्या प्रस्थापित राजकारण्यांचा वा धनदांडग्या-मुजोर जैन-गुज्जू-मारवाड्यांचा हा देश, हा ‘महाराष्ट्र’ नांवाचा प्रदेश नाही…. तो, तुमचाआमचा ‘सामान्यां’चा आहे.

विलास शिंदेंची अंत्ययात्रा एका बाजुला आणि दुसर्‍या बाजुला ‘कर लो दुनिया मुठ्ठीमें’वाल्यांची चाललेली ‘दे धम्माल’ आम्ही उघड्या डोळ्यांनी पहातोच आहोतं… आम्ही धृतराष्ट्रासारखे जन्मांध किंवा गांधारीसारखे ठरवून आंधळे थोडेच बनलोतं?…. जणू काही महाराष्ट्रात काहीही अघटित घडलेलचं नाही, असं एकूण ‘त्यांचं’ विलासी वातावरण… त्यात कोण विचारतो आणि कोणाच्या ध्यानात आहे, ‘विलास शिंदें’ नांवाच्या सामान्य पोलीस शिपुरड्याची अंत्ययात्रा, नाही का? पण मित्रांनो, दखल न घेण्याजोगा हा सामान्य मृत्यू थोडाच होता? निवडणुकीतल्या मतांच्या, नापाक राजकारणामुळे आणि एकूणच भ्रष्ट व्यवस्थेमुळे… मातलेल्या मवाली-गुन्हेगारांच्या भयानक ‘थैमाना’चा, हा ‘कर्तव्य’ बजावताना गेलेला नाहक बळी आहे…. ज्याची स्पंदनं, दीर्घकाळ मराठी समाजमानसात धुमसत राहतील. यातून कायमचा बोध घेऊन आपण पुढे निर्धाराने नीतिमान व कठोर होऊन वाटचाल करणार असू, तरच हे ‘बलिदान’ आहे… अन्यथा, हा भरकटलेला समाज बस्स फक्त दिशाहीन ‘बेभान’ आहे….

भविष्याच्या दृष्टीकोनातून हे बलिदान, फुकट जाऊ देणं एक महापातक ठरु शकतं! याक्षणी आणि या क्षणानंतर, फुकटचे ‘नक्राश्रू’ ढाळणार्‍या आणि ‘पुतना मावशी’सारखा ढोंगी प्रेमाचा अचानक पान्हा फुटणार्‍या, सगळ्यांपासून कायमचचं पोलीसदलाला सावध व्हायला हवं. पोलीसदल, ही महाराष्ट्रातील उरलीसुरली एकमेव ‘संस्था’, जी अजून महाराष्ट्राचं ‘मराठमोळंपण’ जपून आहे!
भारताच्या राष्ट्रपतींनाही ज्या ‘खाकी’चा मान राखावा लागतो…. ती ‘खाकीवर्दी’ घालणारा ‘पोलीस’, हा आमचा केवळ ‘आधारस्तंभ’च नव्हे; तर, ‘मानबिंदू’ देखील आहे. पोलीसदलाची ‘खाकीवर्दी’, खरंतरं स्वामी विवेकानंद परिधान करायचे, त्या जाज्ज्वल्य संन्यस्त्वाच्या ‘भगव्या’ वस्त्रापेक्षाही ‘पवित्र’….. पण, सरतेशेवटी तसं ‘मानलं’ तर आणि तसं ‘वागलं’ तरच! न पेक्षा, ही ‘खाकीवर्दी’ चोराच्या लंगोटीसारखी हिणकस व कुचेष्टाचाही विषय बनू शकते. शेवटी, कुठल्याही ‘संस्थे’तल्या माणसांचं वागणचं, त्या त्या संस्थेचं ‘महात्म्य’ व ‘चारित्र्य’ ठरवतं असते…. “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” असं नुसतं लिहून किंवा नुसते कायदे करुन ‘सन्मान’ मागून मिळत नसतो आणि मिळालाच तरी त्यात ‘जान’ नसते, त्यात जबरदस्ती आणि नाईलाजाचा भाग असतो. ‘सन्मान’ आपल्या कृतिने मिळवायचा असतो. जुलमाचा रामराम आणि उपचाराचा सलाम घेण्यापेक्षा, आम जनतेचा लाखमोलाचा ‘दुवा’ घ्यायला पोलीसांनी शिकलं पाहीजे! नाहीतर, पोलीस-प्रशासनात ‘मराठमोळंपण’ आहे; पण, शिवबा, साधुसंतांची ‘मराठी-संस्कृति’ मात्र कुठे, हा प्रश्न उभा राहील.

आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक लहानमोठ्या पोलीस कर्मचाऱ्यानं, हे अभिमानानं अंतःकरणपूर्वक समजून घेतलं पाहीजे की, ‘विलास शिंदें’च्या मृत्युचा विलाप, हे महाराष्ट्रातल्या घराघरात, ‘घरचं माणूस’ जावं, एवढं तीव्र दुःख बनलं आहे,… एवढी ही सामान्य जनता आमच्या मराठमोळ्या पोलीस बांधवांवर प्रेम करते. यानिमित्ताने, प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने छातीवर हात ठेऊन आणि परमेश्वराला स्मरुन, “आपणही खरचं या सामान्य जनांवर इतकं निर्मळ व निरपेक्ष प्रेम करतो का”, हे एकदा जरुर तपासून घ्यावं….. म्हणजे आपणं नेमकं, आपल्याच हाडारक्तामांसाच्या माणसांशी कसं वागलं पाहीजे, हे त्यांना कोणीही न सांगताच समजेल! ज्या, समाजात आपण जन्माला आलो… वाढलो, त्या समाजाविषयी असलेलं ‘आतड्याचं प्रेम’, असं नाळ कापून फेकून दिल्यासारखं फेकून नाही देता येतं…. ते अशा प्रसंगी आपसूकच उसळून बाहेर पडतं, हा ‘विलास शिंदे’च्या करुणाजनक हत्येचा, करुण ‘संदेश’ आहे! या महाराष्ट्रभरात उसळलेल्या करुणेच्या सागराला असलेली ही ‘मायमराठी’ किनार, ही या दुर्दैवी घटनेतील एकमेव जमेची बाजू म्हणायची…. दुसरं काय म्हणणारं?

प्रत्येक मराठी माणसानं, यापुढे आमचा एकही पोलीस कर्मचारी… कुठल्याही फालतू नगरसेवक-आमदार-खासदाराचा ‘मार’ खाणार नाही…. शिव्याही खाणार नाही, असा पोलीसदलाला विश्वास देण्यासारखं जबाबदार वागलं पाहीजे. कुठल्याही आमिषाला वा क्षणभराच्या भावनिक लाटेला बळी न पडता, जबाबदारीने मतदान करायला शिकलं पाहीजे…. चांगल्या माणसांना निवडून दिलं पाहीजे. तसेच, प्रत्येक पोलीस-कर्मचार्‍याने पोलीसी दंडुक्यापेक्षा ‘पोलीसी नैतिक दरारा’ मोठा राहील, याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायला हवी…. तो, या ‘शिवबां’च्या महाराष्ट्राचा ‘वज्रनिर्धार’ बनला पाहीजे! खरंतरं, सशस्त्रदलांच्या बंदुकांची भिती, सदैव या भ्रष्ट राजकारण्यांच्या पापी मनात असतेच…. म्हणून, ‘पोलीस-भरती’पासूनच संपूर्ण पोलीस-प्रशासनाला, हे बदमाष प्रस्थापित घराणेबाज-दलाल राजकारणी भ्रष्टाचाराच्या गटारगंगेचा चांगलाच ‘परिचय’ करुन देतात व नंतर त्यातच त्यांना न्हाऊमाखू घालतात…. जेणेकरुन, त्यांचा ‘आत्मा’च एकदाचा मरुन जाईल व “तेरी भी चूप और मेरी भी चूप” म्हणतं, सशस्त्रदलांच्या बंदुकीची भिती, त्यांच्या मनातून कायमची नाहीशी होईल! आपण नीतिमान वागलो… नीतिमान राहीलो की, कुणाची सहजी आपल्या वाटेला जाण्याची हिंमत होत नाही. जो आज उठतो तो, पोलीसांना टपली मारुन जाण्यापर्यंतच नव्हे; तर, थेट ठार मारण्यापर्यंत मजल गाठत असेल तर, आम्हाला अतिशय गंभीर होऊन विचार करणं भाग आहे (या घटनेला चोवीसतास ही उलटत नाहीत तर, मुंबई बैलबाजारात देविदास निंबाळकर या वाहतूक हवालदाराला स्थानिक मवाली-गुन्हेगारवृत्तीच्या कुणी इम्तियाज खान नांवाच्या तरुणाने मोटारसायकलने जाणिवपूर्वक धडक देऊन पाडल्याने, त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करावं लागलयं!). काही वर्षांपूर्वी भिवंडीत, नवी मुंबईत अशाच पोलीसांच्या निर्घृण हत्या झाल्या होत्या…. त्या भरत चाललेल्या जखमांवरची खपली, या खार-विलेपार्लेतल्या घटनेमुळे निघून, पुन्हा जखमा भळभळायला लागल्यात. हे सगळचं, समाजात पसरलेल्या भ्रष्टाचारामुळे, बेबंद चंगळवादामुळे आणि सहसंवेदनेच्या अभावामुळे घडतयं. रोग समाजाच्या नसानसात भिनलायं, तो नुसत्या थातूरमातूर उपायांनी दूर होणार नाही.

मर्सिडीज बेंझ किंवा बीएमडब्ल्यूमधून जाणार्‍या ‘शेठजी-संस्कृति’तल्या धनदांडग्यांना, वहातूक पोलिसांनी अडवल्यावर तोंडावर पाचशेची नोट फेकून जाताना मी स्वतः पाह्यलयं…. तो तर, आपल्या डोळ्यावरचा केवढा मोठा अत्याचार?
वेडेवाकडे न्यायनीतिला व कायद्याला धरुन नसलेले ‘खालचे-वरचे आदेश’ पाळणार्‍या व सतत ‘चिरीमिरी’च्या शोधात, समाजात ‘अन्याया’चं थैमान माजू देणाऱ्या पोलीस-प्रशासनातल्या संबंधित प्रत्येक कर्मचाऱ्याने, एकदा समजूनच घेण्याची वेळ आलेली आहे की, नुसतं निम्मं पोलीस-प्रशासन जरी नीतिमान बनलं तरी, या देशातल्या रक्तपिपासू-शोषक धनदांडग्या-मुजोर व्यवस्थेची पाचावर धारण बसेल. म्हणूनच, विलास शिंदेंची ‘शहादत’ जर, वाया जाऊ द्यायची नसेल…. तर, यापुढे पोलीसदलातला प्रत्येक कर्मचारी हा, हवालदार ‘बबन जाधवां’सारखा करारी, प्रामाणिक आणि लढवय्या बनला पाहीजे…. अशा कर्मचाऱ्यांसोबत आणि त्यांच्या पाठीशी ‘धर्मराज्य पक्ष’ सदैव राहीलच, जसा तो ‘बबन जाधवां’च्या पाठीशी ठामपणे आजही उभा आहे…. त्यासाठी, कुठलीही किंमत चुकवायला, आम्ही सारे ‘धर्मराज्य’वाले तयार आहोत.

“नरेची केला हिन किती नर” ही आता बिघडलेली, पोलीसदलाची प्रतिमा कायमची सुधारलीचं पाहीजे…. तेव्हा, राजकारण्यांनो, ‘मपिसा’ काय आणतायं, रिलायन्सचा ‘जियोमरो’चा फोर-जी काय आणतायं नी नको तिथे सीसीटीव्ही कॅमेरे काय लावतायं… प्रत्येक पोलीस-स्टेशनमध्ये आणि सरकारी कार्यालयात ‘सीसीटीव्ही’ कॅमरे चोवीसतास चालू ठेवा…. पोलीसदलाचा कारभार पूर्णतः ‘पारदर्शक’ होऊ द्या. तेवढं करून थांबू नका….. सोबतीला, “या देशात ‘जनलोकपाल’ व ‘अर्थक्रांती’ विधेयकासारख्या कारदेशीर तरतूदी करुन, एकदाचा या सार्वजनिक जीवनातला भ्रष्टाचार कायमचा आटोक्यात आणा”….

इथून पुढे प्रत्येक वहातूक हवालदाराने, ट्रकवाल्याकडे वा अन्य कोणाकडे ‘चिरीमिरी’साठी ‘हात’ पसरताना वा ती गोळा करण्यासाठी ‘भाडोत्री हात’ नेमताना, शहीद ‘विलास शिंदें’ना एकदा डोळ्यासमोर आणावचं…. आणि, त्यांच्या डोळ्यासमोर ‘विलास शिंदे’ येवो ना येवो, तो हटकून प्रत्येक मराठी माणसाच्या नजरेसमोर येणार आहेच…. नेमकी कुठली भावना त्यावेळेस पहाणार्‍या नागरिकांच्या मनात उमटेल, याचा किंचितही विचार करण्याएवढी संवेदना शिल्लक असणारा ‘वहातूक हवालदार’, हे असं काही वेडवाकडं वागायला कधिही धजावणार नाही!!!

पोलीसांवर हल्ले करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन त्वरेनं होऊन, कायमची जरब बसली पाहीजे आणि विलास शिंदें’च्या मारेकर्‍यांना ‘फास्ट ट्रॅक’ कोर्ट चालवून फाशीच दिली गेली पाहीजे…. या ठाम मागणीसह धन्यवाद…..

जय महाराष्ट्र । जय हिंद ।।

…… राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)⁠