आता, सगळं शांत शांत झाल्यावर…

“आता, सगळं शांत शांत झाल्यावर… कोणाला इस्पितळात रक्ताची गरज लागल्यास, आपापल्या जातीचे लेबल असलेल्या रक्ताच्या बाटल्या घ्या… पोलीस स्टेशन आणि कोर्टात आपापल्या जातीचे वकील न्या… म्हणजे, जिंकलात जातभाईंनो” !!!

जळलेल्या मोटरसायकली, बहुशः कंत्राटी-कामगार असलेल्या मराठी पोरांनी हौशीनं बँकेचं कर्ज काढून घेतलेल्या असणार (अर्थात, औकात नसताना पोरींवर इंप्रेशन पाडायला!) ….तोडफोड झालेल्या बसेस तर, आमच्याच मायमराठी जनतेच्या सेवेसाठी नव्हत्या का? आमच्या सोलपटलेल्या मराठी ढुंगणाखाली, कुठून आरामदायी गाड्या येणार???….

राजकारण्यांच्या नादाला लागून, जगण्याच्या मूलभूत प्रश्नांवर (शेतीतील उध्वस्तता, गुलामी कंत्राटी-कामगार पद्धत, तुटपुंजं वेतन, नोकरीतली असुरक्षितता वगैरे वगैरे) शेपूट घालून बसणाऱ्या माझ्या मराठी बंधू-भगिनींनो, “फेकलेला तुमचा प्रत्येक ‘दगड’, राजकारण्यांचे ‘गड’, कालही बांधून गेला आणि आजही जातोयं…. तुम्ही मात्र, देशातील धनदांडग्यांच्या टाचेखाली (रक्तपिपासू शोषक व्यवस्था) छान खोलवर ‘गाडले’ जाताय”…. धन्य आहे तुमची !!!

                        ….. राजन राजे  (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)