‘‘शाॅकिंग अँड कम्प्लिट्ली स्टॅगरिंग….अॅन् आर्क्टिक हिट वेव्ह, हॅज् अरायव्हड्!’’ ….डेव्हीड फिलीप्स (ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, एन्व्हायर्नमेंट अँड क्लायमेट चेंज… कॅनडा)

मानवीवस्तीचे उत्तरेकडचं शेवटचं ठिकाण म्हणजे, कॅनडातील उत्तर ध्रुवापासून अवघ्या ६०० मैलावर असलेलं, ‘‘कॅनडाज् अॅलर्ट’’ या ठिकाणी १४ जुलै-२०१९च्या रविवारी  २१° सेंटिग्रेड एवढे उच्च तापमान धक्कादायकरित्या नोंदले गेले. ही जणू, ध्रुवप्रदेशातली प्रलयंकारी उष्णतेची लाटच होय!

पृथ्वीच्या इतर कुठल्याही भागापेक्षा दोन्ही ध्रुवांवरील तापमान तिप्पट वेगाने वाढत चालल्याचं, आर्मेल कॅस्टॅलान या कॅनडा सरकारमधल्या अजून एका हवामानतज्ज्ञाचं म्हणणं आहे.

अर्थव्यवस्था, विकासाचं प्रारुप, जनसंख्या-जीवनशैली यात युद्धपातळीवरुन कल्पनातीत आमूलाग्र बदल करुन ‘‘कार्बन-ऊत्सर्जन’’ न रोखल्यास, मानवी अस्तित्वासाठी ते नजिकच्याच भविष्यात अत्यंत धोकादायक ठरेल, असंही एखाद्या प्रेषितासारखं ठामपणे त्यांनी पुढे प्रतिपादन केलय.

‘‘मानवजातीच्या हातून झपाट्यानं वेळ निसटून जात असून जागतिक पर्यावरणीय महासंकट टाळण्यासाठी अभूतपूर्व असे फार मोठे बदल सामाजिक ढाच्यात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत करावेच लागतील’’, ही बाब, गेल्या ऑक्टोबरमध्येच प्रकाशित झालेल्या युनोच्या पर्यावरणविषयक खळबळजनक अहवालातून मांडण्यात आली होती, हे वाचकांना स्मरत असेलच !!!

…… राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष…. भारततील पहिलावहिला निसर्ग आणि पर्यावरणवादी ‘हरित पक्ष’)