रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचं (Vampire-State System), खरंखुरं अंतरंग…

प्रत्येक भारतीय तरुणाने (विशेषतः, मराठी-तरुणाईने), हे ध्यानात घ्यावं की, या रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचं (Vampire-State System), हेच खरंखुरं अंतरंग आहे…!!!

(‘THE HINDU’च्या सौजन्याने…)

‘डेमोग्राफिक-डिव्हिडंड’ वगैरे मोठे मोठे शब्द… ‘मन की बात’पासून निवडणुकीच्या भाषणातील ‘जन से बात’पर्यंत व्यक्त होणारी भारतीय ‘तरुणाईची कवतिके’ (कौतुकं), ही भांडवली-व्यवस्थेची सगळी निर्लज्ज-निरर्गल सोंगंढोंगं असतात!

…जोपर्यंत, “भांडवली-दहशतीला सपशेल शरण जाऊन, कंपन्या-कारखान्यांमधून कंत्राटी-कामगार किंवा वेठबिगार म्हणून गुलामासारखी राब राब राबायला निमूटपणे तयार असते…तोवरच तिची, पत्रास ठेवली जाते. पण, जे या भांडवली-व्यवस्थेविरुद्ध संतापाने पेटून उठून ‘एल्गार’ पुकारु पहातात… त्या सगळ्यांचीच हालत, थोड्याफार फरकाने संसदेत ‘जनजागृती’साठी घुसलेल्या वरील पाच नवतरुणांसारखीच, ही भयंकर भांडवली-व्यवस्था करत असते.

ज्याप्रमाणे, भारतात काॅर्पोरेटीय-क्षेत्रात ‘कंपनी-दहशतवादा’चा नंगानाच सुरु आहे आणि त्यातून, भांडवली-व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांना खोट्यानाट्या प्रकरणात गुंतवलं जातं…तोच प्रकार, राजकारणात चालू आहे.

आधी, काॅर्पोरेटीय-क्षेत्रच, वेगवेगळ्या प्रकारच्या बदमाषीला जन्माला घालतं आणि मग, ती बदमाषी जशीच्या तशी प्रस्थापित राजकारणीवर्ग उचलतो आणि पुढे ती बदमाषी, अधिक गर्हणीय स्वरुपात खोलवर समाजात मुरत जाते. कंपन्यांमधून कामगारांचे लढे प्रामाणिकपणे व प्राणपणाने उभारणाऱ्या कामगारांवर व त्यांच्या पुढार्‍यांवर खोटे खटले दाखल करण्यासाठी…डरपोक, गांडूळासारख्या जगणाऱ्या इतर हिणकस बांडगुळीवृत्तीच्या कामगारांवर…नोकरीतून काढून टाकण्याचा, विविध व्यवस्थापनांकरवी दबाव आणला जातो. कामगार-कर्मचारीवर्गाकडून, ‘कंपनी-दहशतवादा’चा (बाऊन्सर्सचा वापर करत केबिनमध्ये कोंडून बदली-निलंबनाची; तसेच, खोट्या पोलिस-केसेस दाखल करण्याची धमकी वगैरे देऊन) अवलंब करत, हव्यातशा कोर्‍या कागदांवर सह्या घेतल्या जातात. त्याच संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणार्‍या घृणास्पद प्रकाराचा अघोरी प्रयोग, त्या पाच तरुणांवर झाल्याने, सगळा भारत देश व्यथित व संतप्त झाला असेल, तर नवल ते काय?

…विशेष म्हणजे, ही अशी ‘भांडवली-व्यवस्था’ (विद्यमान सरकार व त्याचा पाठीराखा राजकारणीवर्ग + बडे उद्योगपती-व्यापारी + शासकीय व खाजगी प्रशासकीयवर्ग/अधिकारीवर्ग) या तरुणाईला बरोबर व्यसनाधीनतेत बुडवते, एकदोनGB डेटापॅक मोफत देऊन मोबाईलच्या ग्लानीत ठेवते…मग, जागोजागी अडवते-रडवते आणि पाहीजे तशी ‘गुलाम’ म्हणून वापरुन घेते. बरं, हे सगळं, ‘तरुणाईच्या नावाने चांगभलं’ करण्याचा बेमालूम कांगावा करत बिनदिक्कत चालू असतं!

उत्तर भारतात मंदिरं उभारणीचा एकमात्र कार्यक्रम यासाठीच चालू आहे, जेणेकरुन तेथील उत्तर-भारतीय तरुणाई…अशीच कायम ‘गुलाम’ म्हणून जैन-गुज्जू-मारवाडी भांडवलदारवर्गाला बिनतक्रार, कुठल्याही विद्रोहाविना कायमच उपलब्ध रहावी; पण, लक्षात कोण घेतो…???

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)