‘‘गाय कसायाला धार्जिणी!!!’’

कामगार नावाची ‘गाय’ आणि मोदी-शहा सरकार नावाचा ‘कसाई’ व यासंदर्भातील, एक चपखल अर्थवाही मराठी म्हणं, ती अशी… ‘‘गाय कसायाला धार्जिणी!!!’’

‘कामगारद्रोही’ नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या भाजपा सरकारचा ‘‘NEEM’’ (National ‘Employability’ Enhancement Mission नव्हे; तर, National ‘Exploitation’ Enhancement Mission) च्या भयंकर घातकी प्रहारानंतर, भोळसट-बावळट कामगारवर्गाला ‘महामूर्ख’ किंवा संपूर्ण ‘उल्लू’ बनवू पहाणारा, प्राॅव्हिडंट फंडा संदर्भात (भविष्यनिर्वाह निधी), नवा बदमाषीचा ‘फंडा’ पहा आणि खडबडून जागे व्हा…!!!

संसदेत येत्या आठवड्यात मंजुरीसाठी मांडण्यात येणाऱ्या, ‘सामाजिक सुरक्षा विधेयका’तील एका प्रस्तावित अवसानघातकी बदलानुसार, कामगारांना स्वतःचा PF मधला, (मूळ पगार+महागाई भत्त्याच्या) PF-Baseच्या १२% एवढा ‘सक्ति’चा असलेला कामगारांचा सहभाग, कामगारांपुरता ऐच्छिकदृष्ट्या कमी करण्याची मुभा देण्यात येणार आहे.

त्यातून, म्हणे, कामगारांचा मासिक पगार वाढून (ही प्रत्यक्ष पगारात वाढ न होताही महिनाअखेर दिसणारी वाढ, फसवी व वरकरणीच… जशी, C.T.C. म्हणून पगार खोटा वाढवून सांगण्याची बदमाषी HR-IR वाले सदैव करत असतात) कामगारांची ‘क्रयशक्ति’ वाढेल व बाजारात वस्तू व सेवांची मागणी वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल…. वा रे व्वा, डँबिस, अर्थशास्त्री असलेली आमची अ(न)र्थमंत्री निर्मला सीतारामण (जी बया, कांदा-भाववाढीवर संसदेत मध्यंतरी ‘‘नाकाने कांदे सोलते’’ झाली होती)!!! म्हणजेच, ‘‘कामगारांची हक्काची भविष्याची काठी आजच मोडून, त्यांना निवृत्तीपश्चात अक्षरशः भीकेला लावण्याची’’, ही भाजपा-सरकारची अत्यंत हिणकस व निंदनीय योजना! साधारणपणे, कामगारवर्गाची समज १२-१३ वर्षाच्या लहान मुलासारखी असते; हे, या ‘रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे’ला (Vampire-State System) चांगलचं माहित असतं… त्यामुळे, त्यांना आज हातात प्रत्यक्षात ‘काडीमात्र पगारवाढ’ न होताही, चार पैसे महिन्याच्या शेवटी हाती पडणार (भले मग, म्हातारपणी लाचारीचा सामना करावा लागून सुना-मुलांच्या लाथा खायला का लागेनात) म्हटल्यावर, ते लहान मुलासारखे पुढचामागचा साधकबाधक विचार न करता खूष होतील (त्यातून, ते भोळेभाबडे कामगार, भाजपाला पुढे मतंही द्यायला कमी करणार नाहीत). एकाबाजूला बोनस-पगारवाढीची आंदोलनंही मंदावतील आणि ‘‘आला पैसा हातात, टाक उडवून’’, या बेदरकार, अंति घातकी वृत्तीने कामगारांकरवी ताबडतोब खर्चाचं प्रमाणही वाढीस लागेल आणि त्यातून, कदाचित मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला थोडीफार उभारीही मिळू शकेल…. असा भाजपा सरकारचा दुहेरी फायद्याचा अत्यंत दुष्ट व नीच हेतू आहे… हे म्हणजे, कामगारांच्या टाळूवरचं लोणी खाण्याव्यतिरिक्त दुसरं काय असू शकेल???

भारताचे महान सुपुत्र व पहिले अर्थमंत्री कै. चिंतामणराव देशमुखांनी (ज्यांच्यासारखा, जाज्वल्य समाजभान व ‘महाराष्ट्रभान’ असलेला ‘ज्ञानसूर्य’ विरळाच) स्वातंत्र्यापश्चात, तळागाळातील कामगारवर्गासाठी, त्यांच्या सुरक्षित भविष्याच्या महन्मंगल दृष्टीकोनातून सुरु केलेल्या, PFसारख्या महान सामाजिक-सुरक्षा योजना, आताचं हे घातकी व कारस्थानी भाजपा सरकार, हळूहळू हाणून पाडत आहे… कुठे ते अल्पावधीतच राष्ट्राचे ‘कंठमणी’ बनलेले ‘चिंतामणी’ आणि कुठे ही दळभद्री निर्मला सीतारामण नावाची अवदसा…!!!

‘‘झोपी गेलेल्या कामगारा ऊठ… धर्मराज्यके अलावा बाकी सब झूठ!!!’’

II जय महाराष्ट्र, जय हिंद II

… राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष आणि धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)