‘‘उन्नावचा ‘भाजपी’य सैतानी उन्माद….’’

मोदी-शहांचा अत्यंत लाडका (blue eyed boy) भाजप आमदार कुलदीप सिंगर यांना उन्नाव बलात्कार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलय…. प्रचंड जनक्षोभाच्या उद्रेकानंतरच कुलदीप नावाच्या नराधम, करंट्या भाजपावाल्यावर पोलीस कारवाई होऊ शकली. ‘‘मेक इन इंडिया’’ ऐवजी, ‘‘रेप इन इंडिया’’ असं जे राहूल गांधी म्हणतायत…. त्याची, अलिकडे अशासारखी देशभर जागोजागी आढळणारी भाजपा-बलात्कारी प्रवृत्ती, ही पार्श्वभूमी आहे!

बलात्कारींनी पिडीतेच्या कुटुंबियांना व तिच्या वकिलांनाही कटकारस्थानं करुन ठार मारले (एवढी क्रूर हिंमत, केवळ, वर आपलीचं माणसं सत्तेत बसलेली आहेत, या राजकीय माज-मस्तीतून येते) … एवढं, या भाजपाच्या राक्षसांचं क्रौर्य आणि उन्मत्तपणा शिगेला पोहोचलेला आहे. पूर्वाश्रमीची नटी स्मृति इराणी, राहूल गांधींच्या ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यानंतर लोकसभेत तिच्या उपजत अभिनय-कौशल्याला साजेसा थयथयाट करुन दाखवण्याची ‘नौटंकी’ करती झाली…. पण, या डँबिस स्मृति इराणीनं कधी चिन्मयानन्द, राम रहिम, आसाराम बापू किंवा या नीच-अधम कुलदीप सेंगरच्या बाबती थयथयाट केल्याचं पाहिलय कुणी कधि??? यातूनच, या भाजपावाल्यांची तथाकथित बेगडी, दांभिक नीतिमत्ता, नाचणाऱ्या मोराच्या पार्श्वभागी उघड्या पडलेल्या लाजेसारखी, या अशा नाटकी थयथयाटातून साफ उघडी पडतेय!

हे, असं सर्रास, ज्यांच्या तोंडी फक्त ‘राम’ असतो; पण, वागण्यात ‘रावण’ असतो, अशा एखाद्या विधिनिषेधशून्य हुकूमशाही राजवटीतच घडत असतं, … अन्य कुठे नव्हे! अशा अत्याचारांतूनच नृशंस दहशतीद्वारे जनसामान्यांच्या जगण्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवता येतं… त्यातूनच, जनतेला सहजी गुलामगिरीत ठेवता येतं व तिचं अमानुष शोषण करता येतं… हे ऐतिहासिक विदारक सत्य होय!!!

….राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)