कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!!

विधिमंडळात विरोधी पक्षाच्या बाकांवर बसल्यावरच कसा, सगळ्या राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांचा उमाळा येतो???

… एरव्ही, सत्तेच्या खुर्चीची ऊब घेताना, ही डरकाळ्या फोडणारी मंडळी, निवडणूक-निधीसाठी उद्योगपतींच्या ताटाखालची ‘म्याऊँ’ बनून असतात!

संतापजनक बाब ही, की, यातले कोणीच कधि कामगारांचे ‘कैवारी’ नसतात; उलटपक्षी, उघड उघड सरळसोट ‘वैरी’ असतात (म्हणूनच तर, कंत्राटी-कामगार पद्धतीची आणि ‘नीम’ NEEM ची अमानुष गुलामगिरी उद्योग-सेवाक्षेत्रात हातपाय पसरती झालीय). उद्योगपतींचे हात धरुन ‘कंपनी-दहशत’(Corporate_Terrorism) पसरवून कामगार-कर्मचारीवर्गाची लुटमार, पिळवणूक केल्याखेरीज अफाट पैशाचा खेळ असलेला, यांच्या राजकारणाचा गाडा चालूच शकणार नाही…. पण, आत्मग्लानी, अज्ञान, दगाबाजी, स्वार्थ, भित्रेपणा व आपापसातील दुही… या अशा दुर्गुणांच्या आहारी गेलेल्या कामगारवर्गाला जाग कधि येणार???

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)