ध्रुव राठीच्या अभ्यासपूर्ण व्हिडीओवरील प्रतिक्रिया…

उत्तर-दिशादिग्दर्शन करत, रात्रीच्या अंधःकारमय विश्वात अचूक मार्गदर्शन करणाऱ्या, आकाशातल्या अढळ ध्रुव तार्‍यासारखेच भारतीय समाजाला मार्गदर्शक ठरलेल्यांपैकी एक ‘ध्रुव राठी’… एखाद्या ‘अग्निपथावरावरुन चालणाऱ्या अग्निवीरा’सारखा (मोदी-शाह सरकारकडून गंडवले गेलेले ‘अग्निपथावरील लष्करी अग्निवीर’ नव्हे!) या व्हिडीओतून… महाभारत युद्धसमयी श्रीकृष्णाने अर्जुनाला जसं विश्वरुप दर्शन घडवलं होतं…तसंच, मोदी-शाह सरकारच्या ‘काॅर्पोरेट-शाही’च्या काळ्याकुट्ट अंतरंगाचं रौद्रभीषण दर्शन आपल्याला घडवतोय!

अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला असेल, अनेकांकडून पहायचा राहून गेला असेल (त्यांनी तो, न चुकता आवर्जून पहावाच, ही नम्र विनंती). पण, हा व्हिडीओ संपूर्ण पाहिल्यावर ज्यांच्या मनावर काडीचाही परिणाम होत नाही, अंतःकरणात एक ओरखडादेखील उमटत नाही…उलटपक्षी, ‘अंधभक्त’ म्हणूनच दगडाधोंड्यासारखं ‘अज्ञानी जगण्या’त किंवा ‘भांडवली-व्यवस्थे’ने फेकलेल्या तुकड्यांवर ‘संवेदनशून्य व स्वार्थपूर्ण जगण्या’त, जे धन्यता मानतात…ती माणसंही नाहीत आणि ती मंडळी, अगदी जनावरंही नाहीत; कारण, जनावरांनादेखील निसर्गतः किमानपक्षी काही समज-उमज, इमान व संवेदना ही असतेच!

या व्हिडीओतून अंधभक्ति करणाऱ्या सर्वसामान्य अज्ञानी लोकांसोबतच… शेतकर्‍यांच्या आंदोलनाला ‘बदनाम’ करु पहाणारे (यात, ‘शी: शी: रविशंकर’सारखे ‘सामाजिक जंत’ अग्रणी आहेत…महाराष्ट्रात तर असे, लाखो अंध-अज्ञानी भक्तांची मांदियाळी बाळगणारे, ‘संत’ म्हणून मिरवणारे अनेक दांभिक ‘संप्रदायी जंत’, उदंड झालेले आपण राजरोस पहात असतोच), तथाकथित विकासपुरुष वगैरे म्हणून मिरवणारे नितीन गडकरी, ‘गोदी-मिडीया’तले ‘बुद्धिमान बदमाष’ अँकर, अदानीसारखे उन्मत्त झालेले काॅर्पोरेटीय सुलतान-शहेनशाह… या सगळ्याच डँबिस लोकांची, जी सप्रमाण व सोदाहरण ‘वरात’ ध्रुव राठीने काढलीय, त्या ध्रुव राठीच्या अभ्यासपूर्ण धैर्याला, मेहनतीला व जनकल्याणाच्या तळमळीला ‘धर्मराज्य पक्षा’चा त्रिवार सलाम…!!!

 …राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

https://youtu.be/Y9253_M38Xk?si=WULu6lhCyhA8ws_w