“तुम मुझे ‘चंदा’ दे दो…मै तुम्हे ‘धंदा’ दूँगा”

कुठे ते, “तुम मुझे खून दो, मै तुम्हें आजादी दूँगा” म्हणणारे कडवे-देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुठे, “तुम मुझे ‘चंदा’ दे दो…मै तुम्हे ‘धंदा’ दूँगा” म्हणणारे बडवे-देशद्रोही ‘गुजराथी-लाॅबी’वाले… ज्यांच्यासाठी, “देश चालवणं म्हणजे केवळ, आपल्या खास गुजराथी-भाषिक भांडवलदार मित्रांसाठी मांडलेला-थाटलेला, एक अतिशय किफायतशीर धंदाच होय!

…अशी क्षुद्रवृत्ती धारण करणाऱ्या शासनकर्त्यांच्या हिणकस, समाजघातकी व्यापारी-वृत्तीकडे पाहूनच, ‘खलील जिब्रान’ म्हणाला होता, “जिस देश का राजा ‘बेपारी’, उस देश की प्रजा ‘भिखारी’…!!!”

…म्हणूनच, जगभरात आपल्याच देशात सर्वात वेगाने अतिश्रीमंतांची (ज्यांची संपत्ती १०००कोटींहून अधिक आहे) संख्या वेगाने वाढतेय…गेल्या वर्षभरात असे २७८ अतिश्रीमंत वाढले; तर, गेल्या पाच वर्षांत त्यांची संख्या ७६% नी वाढली) आणि अशा १०००कोटींहून अधिक संपत्ती असणाऱ्या धनाढ्यांची देशात आजमितीस एकूण संख्या १३१९ एवढी बनल्याने, एवढी मोठी संख्या असणाऱ्या, हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढ्या मोजक्या देशांपैकी जगभरात भारत एक देश बनलाय! दुसर्‍या बाजुला शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि आंदोलनं सुरुच आहेत व “१२ तासाच्या कामाला १२ हजार दरमहा पगार”, अशा अवनत स्थितीत आजच्या भांडवली-व्यवस्थेत…’गुलाम-नवअस्पृश्य’ असा, ‘कंत्राटी-कामगार’ म्हणून कामगार राब राब राबतोय…बेरोजगार तरुणवर्ग टाचा घासतोय मध्यमवर्ग महागाईने पोळून निघतोय; तरीही, कधि राममंदिराच्या घंटानादात, तर कधि ज्ञानव्यापी मस्जिदीच्या भोंग्यात…सामान्य माणूस अजूनही अडकलेलाच! या दुर्भाग्याला, भयंकर दुर्दैवाला… म्हणावं तरी काय…???

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)