माय नेम इज बाॅण्ड…इलेक्टोरल बाॅण्ड 056…!!!

सत्तेवर येताच दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातून खेचून आणण्याची भंपक भाषा करणारा ‘भाजपा’…स्वतःच ‘दाऊद इब्राहिम’चा बाप बनलाय आणि त्या विपरीत अर्थाने, खरोखरीच भाजपाने दाऊद इब्राहिमला भारतात आणून आपला शब्द पाळला (भले मग, स्विसबँकेतला काळा पैसा आणायचं आणि त्यातून प्रत्येक भारतीयाच्या जनधन खात्यात १५ लाख रु. टाकायचं, राहून का जाईना); त्याबद्दल, भारतीय जनतेनं भाजपाच्या दिल्लीश्वर धेंडांचं अभिनंदनच करायला नको का? …शिवाय, गेली १० वर्षे दिवसाढवळ्या आपल्या बड्या गुजराथी-भांडवलदार दोस्तांना ‘देश लुटून आणि देश विकून’, वर आम्हीच देशभक्त (मा. उद्धवजी ठाकरेंच्या अर्थवाही शब्दात बोलायचं; तर, ‘द्वेषभक्त’) म्हणून मिरवणारे व तशी शिमग्याची बेमालूम सोंगंढोंगं वठवणारे ‘भाजपाई-संघीय’ लोकं…तेव्हाच उघडे पडले; जेव्हा, पाकिस्तानी HubPower कंपनीकडून इलेक्टोरल-बाॅण्ड’द्वारे ‘चंदा’ वसुली केल्याचं जगजाहीर झाले आणि त्या धक्कादायक घटनेतून त्यांच्या बनावट ‘देशभक्ती’चा मुखवटा अगदी अलगद गळून पडला (सुब्रमण्यम स्वामी, ज्याचा सतत नामोल्लेख करत असतात…ते मोदी-शाह सरकारचं ‘चिनी कनेक्शन’, लवकरच उघडं पडावं)!
…तेव्हा, वाचकहो, राहुल गांधींनी ज्या ‘वसुली भाई’चा जबरदस्त उल्लेख केला…त्याची ‘भाईगिरी’ व त्याच्या ‘वसुली रॅकेट’चा भांडाफोड, ध्रुव राठीच्या वरील व्हिडीओतून आवर्जून पहा!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)