काही बेअक्कल, लाळघोट्या, नाठाळ अशा भाजपाई लोकांकरवी शिवछत्रपतींची तुलना पं. नरेंद्र मोदींशी केली जाणं, हा शिवछत्रपतींचा घोर अपमान आहे… औरंगजेबाकडून, त्याच्या भर दरबारात केला गेलेला शिवछत्रपतींचा अवमान, त्यापुढे फिका ठरावा!

काही बेअक्कल, लाळघोट्या, नाठाळ अशा भाजपाई लोकांकरवी शिवछत्रपतींची तुलना पं. नरेंद्र मोदींशी केली जाणं, हा शिवछत्रपतींचा घोर अपमान आहे… औरंगजेबाकडून, त्याच्या भर दरबारात केला गेलेला शिवछत्रपतींचा अवमान, त्यापुढे फिका ठरावा!

आता, शिवाजी आणि औरंगजेब, यांचे आपण अगदी थोडक्यात स्वभावदर्शन मांडूया….

** आमचा शिवाजी सर्वधर्मसमभाव मानणारा, अत्यंत न्यायी व सहिष्णू होता…तर, मोंगलांचा औरंगजेब धर्मद्वेष्टा, अन्यायी व कमालीचा असहिष्णू होता!

* वर्ष-२००२च्या गुजराथ-दंगलीसारखं शिवछत्रपतींनी चुकूनही कधि, कुणी मुसलमान वा अन्य धर्मीय आहे म्हणून, आपल्या राज्यात त्यांचं शिरकाण वा हत्याकांड घडवलं नव्हतं; त्यांनी *सर्वधर्मियांना समान न्यायाने व सन्मानानेच वागवलं होतं…
औरंगजेबाने हिंदुंना ‘जिझिया-कर’ वगैरे लादून छळलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आमच्या महाराष्ट्राच्या छाव्याची, शंभूराजांची माणुसकीला लाजवणारी क्रूर हत्या केली!

** आमचा शिवाजी शूर होता, नीतिमान होता…तर, मोंगलांचा औरंगजेब क्रूर होता, अनितीमान होता!

* शिवछत्रपतींनी रयतेची म्हणजेच, तळागाळातील लोकांची विशेष काळजी वाहिली…उदा. त्यांनी भूमिहीन कुळांना कसायला मालकी-हक्काने जमिनीचे पट्टे दिले; म्हणजे, आजच्या ‘भांडवली-परिभाषे’त त्यांनी “गुलामीत खितपत पडलेल्या ‘कंत्राटी-कामगारां’ना नोकरीत ‘कायम’ केलं!
आजचे भाजपाई-संघीय राज्यकर्ते, तळागाळातील शेतकऱ्यांची व कामगारांची लूट करण्यासाठी, त्यांना उध्वस्त करण्यासाठी काळे-कायदेकानून आणू पहातात; तर शिवछत्रपती फर्मान काढून व चोख राज्यकारभार करुन समाजातल्या शेवटच्या घटकाला म्हणजेच, श्रमिकवर्गाला बळकटी व सन्मान-सुरक्षा देण्यात गुंतले होते.
…याउलट, औरंगजेब आपली सत्ता कायम राखण्यासाठी आपल्या हुजर्‍यांवर, दरबार्‍यांवर व सरदार-बरकदारांवर विशेष मेहरबान होता; जसे, आजचे राज्यकर्ते आपल्या बड्या दोस्त-भांडवलदारांवर (Crony-Capitalists) कायदे धाब्यावर बसवून मेहेरनजर राखून आहेत.


तात्पर्य क्र. १ : वरील त्रोटक, पण महत्त्वपूर्ण विवेचनांति…तथाकथित हिंदुत्ववादी बड्या भाजप नेत्यांची तुलना कोणाशी करायची; “शिवछत्रपतींशी की, औरंगजेबाशी” …ते आपण सुजाण वाचकांवरच सोडून देऊया!
…अन्यथा, त्याचं अचूक उत्तर द्यायला “AI GROKE” आहेच की मदतीला. नाहीतरी, नुकतंच AI GROKE तांत्रिक-सुविधेने, रा. स्व. संघाच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाविषयी अचूक उत्तर दिलेलं आहेच…तेव्हा, त्या कृत्रिम-बुद्धिमत्तेचा आधार घ्यायला, काय हरकत कुणाची?

तात्पर्य क्र. २ : आपल्यावर चालून आलेल्या व दगाबाजीने आपल्याला ठार करु पहाणार्‍या… अफझलखानाचा वध केल्यानंतर, त्याची सन्मानपूर्वक कबर बांधण्याचा हुकूम सोडणारे, आभाळाएवढ्या मोठ्या मनाचे आमचे शिवछत्रपती आज हयात असते; तर, औरंगजेब महाराष्ट्राचा ‘अनंत अपराधी’ असूनही, त्या औरंग्याची कबर उध्वस्त करायचा विचार, त्यांच्या मनाला शिवला असता?

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)