भाजपाने एकनाथ शिंदेंची औटघटकेच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, अपमानास्पदरित्या काढून घेतली…..काय वाकडं केलं त्यांचं शिंदेसेनेच्या गुंडांनी?
मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंचे निर्णय बदलण्याचा सपाटा लावण्यास आणि त्यांचे बगलबच्चे असलेल्या कंत्राटदारांच्या (त्यातला, एक मोठा मासा अजय आशर हजारो कोटी रु. घेऊन परदेशात पळून गेल्याची वदंता आहे) मुसक्या आवळण्यास देवेंद्र फडणवीसांनी सुरुवात केली…..काय वाकडं केलं त्यांचं शिंदेसेनेच्या गुंडांनी?
शरद पवारांकडून फुटून निघण्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर एकनाथ शिंदेंना ‘गद्दार’ संबोधून तसे पोस्टर (पाठीमागून खंजिराचा वार करणारे) अजित पवार गटाने जागोजागी महाराष्ट्रभरात लावले…..काय वाकडं केलं त्यांचं शिंदेसेनेच्या गुंडांनी?
सध्या AI GROK ला अनेकजण प्रश्न विचारु लागलेत, “महाराष्ट्रात गद्दार नेता कोण?”…एलिऑन मस्कच्या GROK ने तत्काळ उत्तर दिलंय, “एकनाथ शिंदे!”…..काय वाकडं केलं त्या ‘एलिऑन मस्क’चं आणि त्याच्या मुंबईतल्या ‘टेस्ला-शोरुम’चं शिंदेसेनेच्या गुंडांनी?
शिवछत्रपतींचा व छ. संभाजी महाराजांचा घोर अपमान करणाऱ्या काळी टोपीछाप राज्यपाल ‘कोश्यारीपासून कोरटकर’पर्यंतच्या भाजपाई-संघीय धेंडांचं…..काय वाकडं केलं शिंदेसेनेच्या गुंडांनी?
…थोडक्यात, ‘भाजपा-महाशक्ति’समोर केवळ नांगी टाकणाऱ्याच नव्हे; तर, थेट लोटांगण घालणाऱ्या…पण, ‘स्वाभिमान’ गहाण ठेवण्यास ठाम नकार देणाऱ्या एका ‘काॅमेडियन’ला धमक्या देण्याची ‘काॅमेडी’ करणार्या शिंदेसेनेच्या वाचाळवीरांचा आणि कामराच्या स्टुडियोवर हल्लाबोल करणाऱ्या गुंडांचा…शिवबा-संतांच्या स्वाभिमानी-नीतिमान महाराष्ट्राला अभिमान वाटावा की, वाटावी भयंकर लाज…???
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)