हा आहे सैयद हुसैन शाह….’पहेलगाम’मध्ये पर्यटकांना घोड्यावर फिरवण्याचं काम करणारा!
दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा त्याने हे आपले पाहुणे आहेत… “या ‘मासूम’ पर्यटकांना मारु नका”, अशी कळवळून विनंती दहशतवाद्यांना केली….
पण, तरीही दहशतवादी ऐकत नाहीत म्हटल्यावर, सैय्यद दहशतवाद्यांच्या अंगावर चालून गेला आणि त्यांच्या हातातली रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला…याच प्रयत्नात दहशतवाद्यांनी सैय्यद हुसेन शाहची गोळी मारुन त्याची हत्या केली!
पहेलगामच्या मृतांमधला हा ही एक “काश्मिरी शेर”…गुलाम नबी नावाचा दुसरा घोडेवाला या दुःखद प्रसंगी एवढंच म्हणाला की, “आमच्या एका सहकार्याने, कालपरवा नुकतीच ओळख झालेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आपला जीव कुर्बान केला…आम्हाला सर्वांना त्याचा रास्त अभिमान आहे!”
…हिंदू बांधवांना वाचवण्यासाठी अतिरेक्यांवर झडप घालून, त्यांची रायफल हिसकावण्याच्या प्रयत्नात ‘शहीद’ झालेल्या ‘सैय्यद हुसेन शाह’, या जिगरबाज वाघाच्या ‘शहादती’ला त्रिवार सलाम!
कुठे तो जिगरबाज देशभक्त ‘सैय्यद हुसेन शाह’ आणि कुठे ते बेजबाबदार-बेफिकीर देशद्रोही ‘अमित शाह’!
१ लाख ८० हजार नियमित सैनिक भरती रोखून…तुटपुंज्या पगारावर अर्धप्रशिक्षित ‘अग्निवीर-गुलाम’ भरती करण्याचा ‘देशद्रोह’ कुणी केला? ६ वर्षांपूर्वी ‘पुलवामा’ हत्याकांडात ४७ CRPF जवान शहीद झाले होते…तेव्हाही कारण तेच! दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची संभाव्य शक्यता दिसत असूनही बेफिकिरीने व बेजबाबदारपणे त्यांना ‘हेलिकॉप्टर-सेवा’ नाकारली गेली होती, म्हणूनच ते दुर्दैवी हत्याकांड घडलं…विशेष म्हणजे, दोन्ही हत्याकांडाची ‘पूर्वसूचना’ प्राप्त करण्यात तथाकथित ‘भारतीय जेम्स बाँड’ची RAW आणि IB सपशेल अपयशी ठरली!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)