वयाच्या ३४व्या वर्षी ‘पीपल मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत आणि वयाच्या ४१व्या वर्षी ‘ऑपरा विनफ्रे शो’मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी आपण अमेरिकेचे अध्यक्ष बनायला इच्छुक असल्याचे ऐन तारुण्यात निर्देश दिले होते आणि ते तसे खरंच झाले देखील…नुकतीच त्यांनी भविष्यातले ‘पोप’ म्हणून AI Image च्या आधारे स्वतःची पॅपल-गणवेषात एक ‘पोस्ट’ सादर केली होती…त्या पोस्टमधला विक्षिप्तपणा किंवा अगोचर-आचरट विनोद बाजुला ठेवला; तरी, भारत-पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या शस्त्रसंधिनंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट झालीय की, अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, हे ‘जागतिक-शांतते’साठी दिल्या जाणाऱ्या ‘नोबेल-पुरस्कारा’साठी पात्र ठरलेत; कारण, त्यांच्याच पोस्टनुसार त्यांनी भारत-पाकिस्तानमधील लक्षावधी लोकांचे प्राण, सदर शस्त्रसंधिसाठी मध्यस्थी करुन वाचवलेत… म्हणजेच, भारत-पाकमधलं संभाव्य आण्विक-युद्ध (Nuclear-War) त्यांनी ‘मध्यस्थ’ या नात्याने (हा भारत-पाकमधील सिमला-कराराचा भंग असला तरी) कौशल्याने टाळलंय!
…ट्रंपना जरुर द्या तो नोबेल-पुरस्कार; पण नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथसिंह आणि एस. जयशंकर यांचे राजीनामे मात्र, एकूण शस्त्रसंधिच्या घोळाबद्दल घ्यायला विसरु नका, म्हणजे झालं…जय हो!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)