लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)
लेख, क्र. १०
* *”केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे….”
दुसरं महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी जिंकल्याच्या ऐन रणधुमाळीत तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांची लोकप्रियता इंग्लंडमध्ये टिपेला पोहोचली असतानाही…ब्रिटीश जनतेनं, युद्धपश्चात शांततेच्या काळात ‘कल्याणकारी-राज्य संकल्पना’ राबविण्याचा ‘जाहीरनामा’ काढलेल्या मजूर पक्षाच्या क्लेमंट ॲटली यांच्या हाती देशाची सत्ता सोपवण्याचा अत्यंत धक्कादायक स्वरुपाचा कौल दिला…आज इंग्लंडमध्ये ‘राष्ट्रीय आरोग्य सेवा’ (National Health Service…NHS) व ‘राष्ट्रीय विमा योजने’सारख्या (National Indurance Scheme) ज्या अनेक सार्वजनिक जनकल्याणकारी-योजना दिसतात, तो त्याचाच परिपाक!
…यादृष्टीनेच, सकारात्मक विचार करत महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाची दिशा आपण ठरवली पाहिजे.
* *संपत्तीचा अधिकार, ‘मूलभूत-अधिकार’ नव्हेच….
लक्षणीय बाब ही की, १९७८साली जनता दलाच्या मोरारजी देसाई सरकारने केलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ४४व्या घटनादुरुस्तीनुसार ‘संपत्तीचा अधिकार’, आता ‘मूलभूत-अधिकार’ राहिलेला नसल्याने एका बाजुला “शहरं-उपनगरांतून प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे जास्तीतजास्त ‘एक दुकान, एक मकान’ (‘एक घर, एक दुकान’) धोरण-कायदा” राबवून आणि दुसर्या बाजुला ‘कंत्राटी-कामगार पद्धती’चं निर्मूलन करुन… ‘मराठी-जगण्या’ची झालेली भीषण ‘कोंडी’ फोडता येईल!
‘एक दुकान, एक मकान’ धोरणाने, मराठी-तरुणाईसाठी प्राधान्याने अतिशय वाजवी दरात धंदा-व्यवसाय व निवासाची सोय करता येईल; तर, मराठी-तरुणाईसाठी ‘कंत्राटी-कामगार पद्धती’च्या निर्मूलनाने ‘बेरोजगारी व अर्धरोजगारी’, असा दोन्हीचा प्रश्न एकाच वेळेस सुटण्यास मोठी मदत होईल.
* *रक्तरंजित क्रांति, क्रांतिची पिल्लं खाते….
हे सगळंच ‘कायदेशीर व लोकशाही’ मार्गांनी व फार काही उत्पात न घडता, रक्ताचा थेंबही न सांडता करता येणं शक्य आहे…फक्त, तशी राजकीय-इच्छाशक्ति बाळगा! सर्वसाधारणपणे, आम जनता ‘बसलेली घडी’ विस्कटू नये, हा विचार करते व तदनुसार मतदान करते. आमूलाग्र बदलाला, इतिहासदत्त भयगंडापोटी नाकारते व स्वतःचं कायम नुकसान करुन घेत रहाते. या अशा धोरण-समुच्चयातून थोडाबहुत त्रास, थोडीबहुत उलथापालथ जरुर होईल…पण, या ‘प्रसववेदना’ एकदाच्या सहन केल्या की, मराठी-माणसासाठी नवं आश्वासक वातावरण महाराष्ट्रात तयार होईल… ‘समृद्धी सर्वांची’ (Common OR Shared Prosperity), या ‘युनो’नेही (U.N.O.) जागतिकस्तरावर स्विकारलेल्या मानव-कल्याणकारी धोरण-तत्त्वानुसार महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या संपत्तीच्या प्रवाहात…आजवर ‘वंचित’ असलेल्या सामान्य मराठी-माणसालाही हक्काने व सन्मानाने उतरता येईल व समृद्धीचं पाणी, समृद्धीची फळं चाखता येतील.
* *कायदेशीर धोरण व तदनुषंगाने आध्यात्मिक दृष्टीकोन….
…बरं, हे सगळं भारतीय-अध्यात्माला धरुनच असणार आहे. फक्त, तुम्ही इच्छाशक्ति दाखवायची खोटी! जैन धर्मात ‘अपरिग्रह’, हे मोठं व महान व्रत वा तत्त्व अंतर्भूत आहे…ज्याचा अर्थ, जीवनावश्यक गरजा मर्यादित राखत, त्यापेक्षा अधिक वस्तू-संसाधनांचा संग्रह व वापर टाळल्याने ‘आत्मिक उन्नती व मोक्ष’ प्राप्त होतो. बुद्धाच्या शिकवणुकीतील अनासक्ती बाळगणे व तृष्णा कमी करणे, म्हणजे दुःखाचे मूळच नष्ट करणे, ही संकल्पना… ‘अपरिग्रहा’शी अगदी मिळतीजुळती आहे. गुरु नानकांनी समाजहितासाठी दानाची मोठी परंपरा रूढ करताना, “इथली सुईदेखील मृत्यूपश्चात वर नेता येत नाही”, हा दृष्टांत दिला. हिंदुधर्मात ‘”त्येन त्यक्तेन भुञ्जीथा:” म्हणजेच, ‘त्यागातून भोग’ सांगितला आहे. आपल्याकडे राजाने वा धनाढ्य व्यक्तिने आपल्याकडचं मोठं द्रव्य, ठराविक काळानंतर गरजवंताना वाटून टाकण्याची पूर्वीची उज्ज्वल परंपरा आहेच, म्हणजे ‘हिंदुत्व’वाद्यांनीही आक्षेप घेण्याचं कारणच नाही.
शिवाय, “कुराण, तर शोषणाला कत्तलीहूनही अधिक भयंकर ठरवतं”, शोषणाविरोधात एवढे खडे बोल, क्वचितच कुठल्या धर्मग्रंथात आढळतील! म्हणजे, ‘तात्त्विक व धार्मिक’ दृष्ट्या पहाता, ‘एक दुकान, एक मकान’ कायदा करण्यात व राबवण्यात कुठली अडचण असायचं कारणच नाही…फारतर, कायदे करताना व राबवताना अनेक गुंतागुंतीच्या प्रशासकीय अडीअडचणी येतील; पण, इच्छा असेल तर, त्यातूनही नक्कीच मार्ग काढता येईल.
* *थोडं विषयांतर, पण अंति मराठी-हिताचं….
एखाद्या रोगावर औषधं घेताना वा रोग जर विकोपाला गेला असेल तर, जालिम औषध-उपाययोजना करताना; काही पथ्ये पाळणं हितावह ठरतं. तसंच, महाराष्ट्राच्या ७५% धनसंपदा व साधनसंपत्तीवर आपला ‘ताबा’ मिळवून बसलेल्या व फक्त, आपल्याचं जमातीचं राजकारण-अर्थकारण करणाऱ्या ‘जमातकेंद्री’ गुजराथी भाषिक ‘लाॅबी’ला प्रामुख्याने वरील ‘एक दुकान, एक मकान’ धोरणामुळे (त्यात, आपले बडे मराठी राजकारणी व सरकारी अधिकारीही आलेच) जबरदस्त हादरा बसेल. त्यावरील त्यांची प्रतिक्रियाही अर्थातच आत्यंतिक सुसंघटित व तीव्र प्रतिकाराची असेल, असू द्या… हा तुमचा नव्हे; शिवछत्रपतींचा आणि आम्हा मावळ्यांचा महाराष्ट्र आहे…हे संबंधित सगळ्यांनाच दाखवून देण्याची, हीच ती वेळ होय! पण, त्याकामी आपल्यालाही ‘ग्राहक’ म्हणून काही पथ्ये पाळणं आवश्यकच, ज्यातून आपली मानसिक-सशक्तता वाढेल व ती या मोठ्या कार्यपूर्तिसाठी सहाय्यक ठरेल.
आपण “मराठी-माणसंच, आपल्या ‘खर्चिक’ स्वभावाने आपल्या काही स्वभावदोषांमुळे या व्यापारीवर्गाला; तसेच, यांच्या बिल्डर-लाॅबीला अनावश्यक तेवढं अति धनवान बनवत असतो.” १५० अब्ज डाॅलर्सची संपत्ती असलेला अमेरिकेचा ९५ वर्षांचा गुंतवणूक तज्ज्ञ ‘वाॅरन बफे’ जर आजही कित्येक दशकांपूर्वीच्या आपल्या छोट्या घरात राहून ‘तणावमुक्त-स्वातंत्र्या’चा अनुपम अनुभव घेत असेल (जगातल्या पहिल्यावहिल्या अब्जाधीश राॅकफेलरची मुलं महागड्या हॉटेलात रहायची; पण, तो उद्योगसमूह उभारणारा ‘मूळ पुरुष’ मात्र, पैसे वाचवण्यासाठी साध्या हाॅटेलात रहायचा) व आपल्याला “कमाईतून आधी बचत करा व मगच खर्चाचं ठरवा” असा मोलाचा संदेश देत असेल…तर, आपण “आधी खर्च, बाकी सगळं नंतरचं”, असं वागत राहून संसाराच्या डब्याला इंजिन उलट दिशेने का जोडतो आहोत?
● जैन, गुज्जू, मारवाड्यांना ‘श्रीमंत’ करण्याचा नव्हे; तर, स्वतःला ‘समर्थ’ बनवण्याचा विडा उचलूया! एकतर आपल्या मराठी-संस्कृतीत सणासुदींची रेलचेल असते (त्यात, लहान मुलांचा अपवाद वगळता, घरातल्या कोणाकोणाच्या वाढदिवसांच्या न झेपणार्या खर्चांची भर)…त्यामुळे, तेव्हा हौसेपोटी आपल्या खर्चावरचं नियंत्रण ढासळतं, ते जमेल तेवढं सावरुन धरलंच पाहिजे… सणासुदीला आपल्या घरातून बाहेर पडणारी व गुजराथी व्यापाऱ्यांच्या घराच्या दिशेने जाणारी…लक्ष्मीची पावलं निर्धाराने रोखून, दिवाळीचं खरं ‘लक्ष्मीपूजन’ आपण साजरं केलं तर?
●…आणि, आपल्या जगण्यातला सगळ्यात मोठा खर्च म्हणजे ‘घरखरेदी’ व तो ही आपण ‘अंगापेक्षा बोंगा मोठा’ या न्यायाने अंमळ मोठा व महागडा फ्लॅट खरेदी करुन वा भाड्यावर घेऊन करुन बसतो. त्यानंतर, अनेकदा अनेकांवर नोकरीपेशात काही अडचण उभी राहिली (जी गोष्ट अलिकडे नेहमीच घडत असते… याला निसरड्या भांडवली-भाषेत निर्लज्जपणे ‘New Normal’ म्हणतात) की, कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ येताना आपण पहातो.
● कुठल्याही व्यसनाधीनतेवर होणारा खर्च, मनाच्या कठोर निर्धाराने रोखलाच पाहिजे… त्याबाबतीत, कुणी कुणाचा मुलाहिजा राखण्याची बिलकूल गरज नाही.
● लहान मुले व तरुण वयाच्या व्यक्ति, प्रसंगी वगळता…साठी-पासष्टीनंतरच्या (म्हणजे, आमच्या वयाच्या) ज्येष्ठांना, आपल्या खिशाला परवडत नसेल; तर, उपलब्ध सार्वजनिक-इस्पितळांतूनच उपचार करावेत…कारण, अशा वृद्ध रुग्ण व्यक्ति, काही लुटमार करणाऱ्या डाॅक्टरवर्गासाठी, त्यांचं ‘मीटर’ (जसं चालू रिक्षाचं मीटर) चालू होण्यासारखं असतं व मरमर कमाई करुन सावरु पहाणारं मराठी-घर, या मोठ्या वैद्यकीय खर्चाने एकदम खाली बसतं.
तेव्हा, वेळात वेळ काढून स्वतःसह (युट्यूब व्हिडीओ अथवा टीव्हीवर पाहून..विविध खाद्यपदार्थांच्या ‘रेसिपी’ पहातो, तसंच) मुलाबाळांना नीट ‘योग-प्राणायाम’ करायला लावाच…कुठलाही व्यायाम वा सकाळचं चालणं (Morning Walk) वगैरे कितीही चांगलं असलं; तरी, ‘योग-प्राणायामा’ला ते पर्याय बनूच शकत नाहीत, एवढं ध्यानी ठेवा! सोबतीनं थोडं आहारविहारावर (पाॅलिश न केलेला अथवा हातसडीचा तांबडसर भात; तसेच ज्वारी, बाजरी, नाचणीसारख्या भरड धान्यांचं अधिकचं सेवन / साखर व मीठ यांचं अल्पांशाने सेवन, साखरेऐवजी गूळ वापरणे, हिरवा भाजीपाला व तंतूमय पदार्थांचं आवर्जून सेवन) बर्यापैकी नियंत्रण ठेवलंत; तर, आजारपण तुमच्या घराच्या आसपासही फिरकणार नाही… आपण विविध निर्जीव यंत्रांची-उपकरणांची खूप काळजी घेतो; पण, या परमात्म्याच्या सजीव-यंत्राची धड काळजी घेत नाही… घोड्यापेक्षाही दणकट ‘हृदय’ नियतीने आपल्याला बहाल केलेलं असतानाही; मोठ्याप्रमाणावर अकालीच ‘हृदयविकार’ बळावतातच कसे?
(क्रमशः)

