…प्रकाश राज, अगदी अभावाने व अपवादाने असतात

अंतःकरणाला हात घालणारं, भारतीय-अध्यात्माला प्रतिबिंबित करीत निखळ सत्याकडे धाव घेणारं…अलिकडच्या काळात ऐकलेलं एक अतिशय प्रभावी भाषण!
…हे भाषण किंवा भाष्य, अशा एका आधुनिक जगण्यातील ‘कलाक्रिडे’सारख्या मनोरंजनात्मक क्षेत्रामधून अचानक फोफावत उगवलेलं सकस धान्याचं पीक आहे…जिथे, आजुबाजुला सर्वत्र तणंच तण उगवलेलं आहे. कधि त्या तणाचं नाव अमिताभ बच्चन असतं, तर कधि नाना पाटेकर किंवा सचिन तेंडुलकर! …आणि हो, त्यात “ब्रूट्स यू टू” या नीतिने मोदींसमवेत पतंग उडवणाऱ्या शहारुख खान आणि सलमान खान यांच्या नावाचं देखील ‘तण’ असतं, हे विसरुन चालणारं नाहीच.
…दुर्दैवाने “इतना सन्नाटा क्यूँ है भाई”, असं विचारणारा ‘शोले’मधला ‘रहीमचाचा’ ए. के. हंगल आज आपल्यात नाही…पैसा-प्रसिद्धीचं जोखड मानेवर घेतलेल्या व ‘करियर’च्या दावणीला बांधल्या गेलेल्या; या नपुंसक कलाक्रिडा क्षेत्रात जिथे, पडद्यावरचा ‘अँग्री यंग मॅन’ करोना-काळात व इतरही वेळी टाळ्या-थाळ्या वाजवत, नतद्रष्ट-जातधर्मद्वेष्ट्या भाजप-संघीय धुरिणांसमोर आपल्या ‘पेशा’ची माती खाताना दिसतो…तिथे, अन्याय-अत्याचाराची परिसीमा होऊनही, इथल्या कुठल्या ‘अल्बर्ट पिंटो’ला ‘गुस्सा’ येण्याची कितपत शक्यता…???

…प्रकाश राज, अगदी अभावाने व अपवादाने असतात; पण कंगना राणावत, अक्षयकुमार आणि अनुपम खेर ‘पायलीचे पन्नास’ पैदा होत रहातात…म्हणूनच, भारतीय-अध्यात्माचा ‘आत्मा’ छिन्नभिन्न करणार्‍या या उजव्या अतिरेक्यांची, या परमपवित्र भरतभूमीत ‘शंभरी भरण्या’ऐवजी, ते आज ‘शंभरी साजरी’ करताहेत!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

—————————————————————————-

—————————————————————————-