सत्य, अहिंसा आणि पर्यावरणाच्या प्रयोगात आयुष्य झोकून देणाऱ्या सोनम वांगचूकवर सत्ता का संतापली?

गौतम बुद्धानंतर या भरतभूमीत, म. गांधींनीच तहहयात असंख्य ‘सत्याचे प्रयोग’ केले, ज्यातून जगभराला कळीकाळाच्या अंतापर्यंत मार्गदर्शन होत राहील…त्यानंतर, बर्‍याच काळानंतर अशातऱ्हेचे अनेक प्रयोग, ‘सोनम वांगचूक’ या समाजहितैषी व निसर्ग-पर्यावरणवादी तंत्रज्ञाने आजवर केलेत.
उदाहरणंच द्यायची झाली; तर, १९८८ मध्ये लेहपासून १८ कि मी. अंतरावर शाश्वत-जीवनशैलीवर आधारित निसर्ग-पर्यावरणस्नेही…अशा एका नाविन्यपूर्ण खेडेगावाची निर्मिती त्यांनी केली (The SECMOL OR Students’ Educational and Cultural Movement of Ladakh)…२० एकरावर पसरलेला हा प्रकल्प, पूर्णतः सौरऊर्जेवर आधारित असून, त्याचं संपूर्ण व्यवस्थापन, हे तेथील विद्यार्थ्यांकडूनच पाहिलं जातं. ‘रमन मॅगसेसे ॲवाॅर्ड व अशोका फेलोशिप’ मिळवणारा हा प्रकल्प विद्यार्थ्यांना, व्यावहारिक व सामाजिक कौशल्याधारित वेगळ्या वाटेवरचं व्यावसायिक-प्रशिक्षण देतो व त्यांना स्वतःच्या पायावर उभं करताना, आजच्या ‘जागतिक-तपमानवाढी’च्या पर्यावरणीय महासंकटकाळात निसर्ग-पर्यावरणाची काळजी वाहण्याचा अमोघ संदेश देतो!
वांगचूक यांनी १९९४ साली (अर्थात, तेव्हा पी. व्ही. नरसिंहराव यांचं काँग्रेसचं सरकार होतं…) केंद्र-सरकारच्या सहयोगातून व स्थानिक स्वराज्यसंस्था तसेच, स्वयंसेवी-संस्थांना सोबत घेऊन ‘ऑपरेशन न्यू होप’, ही सरकारी-शाळांमधून मूलगामी सुधारणा करण्याची मोहिम राबवली.
त्रिकोणाकृती बर्फाचे मोठे ढिगारे रचून ‘कृत्रिम हिमनद’ (Artificial Glaciers) तयार करायचे व त्यातूनच कडाक्याच्या थंडीत पिण्याच्या पाण्याचा साठा तयार करुन ठेवायचा…विस्मृतीत गेलेल्या ‘Conical Ice Stupa’, या पारंपरिक तंत्राला, वांगचूक यांनी पुनरुज्जीवित केलं. पहिल्या टप्प्यात २५ लाख लिटर्स पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध करुन देणाऱ्या, या प्रयोगाला ‘रोलेक्स ॲवाॅर्ड फाॅर एक्सलन्स’ मिळालं होतं.

…पण, म. गांधींचा द्वेष एवढा पराकोटीचा की, म. गांधींच्या उपोषण-अहिंसेच्या व नव-प्रयोगाच्या आणि मार्गावर चालणारा ‘थ्री इडियट’ सोनम वांगचूक देखील…तत्काळ त्याच्याकडून ‘देशद्रोही’ घोषित केला जातो व जोरजबरदस्तीने तुरुंगात डांबला जातो; कोणाकडून, तर ज्याने स्वतः तुरुंगाची हवा खाल्लीय आणि ज्याने, त्यांच्या ‘मातृसंस्थे’शी इमान राखून देशाशी ‘गद्दारी’ करणाऱ्या ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांकरवी व न्यायाधीशांकरवी आपली बेकायदेशीर सुटका करवून घेतलीय!

आता, फक्त एवढंच बघत रहायचं, म. गांधींच्या मारेकर्‍यांच्या ‘पुढच्या पिढीच्या गुन्हेगारी हाता’तून, हा ‘नवा गांधी’, तुरुंगातून सुखरुप बाहेर येतो की, ……….

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)