ते आले महाराष्ट्रात तेव्हा…’काळी-टोपीधारी’ हाफचड्डीवाल्या लोकांसारखेच (हल्ली, ‘फूल चड्डी’…ज्यासाठी ते, कुठला संस्कृत शब्द नव्हे; तर, चक्क पँट हा ‘आंग्ल’ शब्द वापरतात) इंग्रजांचे दोस्त व स्वातंत्र्य-चळवळीचे ‘मारेकरी’ म्हणूनच….
ते आले महाराष्ट्रात तेव्हा…त्यांच्या हातात ‘लोटा’ नव्हताच; तर, हाती होत्या इंग्रजांनी दिलेल्या ‘बीज-भांडवल’स्वरुप ‘नोटा’ अन् विविध सरकारी-कंत्राटांचा ‘लखोटा’!
ते आले महाराष्ट्रात, तेव्हा ‘शिवबां’चा महाराष्ट्र ‘पुण्यवान’ होता, नितीमान होता; पण, ते आले आणि त्यांनी महाराष्ट्रात बेईमानीने भेसळ, वजनमापात पाप अन् आपल्या जमातीचं ‘संघटना-छाप’ अर्थकारण (मराठी-माणसाच्या दृष्टीने ‘अनर्थकारण’) करायला घेतलं. त्यातून बक्कळ पैसा कमावला, गब्बर झाले…आणि, आपल्या जमातीच्या नीतिशून्य, वाममार्गी संस्कृतिने…महाराष्ट्राची सोन्यासारखी असलेली ‘मराठी-संस्कृती’ पार बिघडवून, महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाच्या उरावर ते बसायला लागले… ते अगदी थेट, मराठी-माणसांनी देव्हार्यात बसवलेल्या नेत्यांचा हात धरुन अन् त्यांची ‘ओटी’ भरुन!
ते आले महाराष्ट्रात तेव्हा….
…आता ते नुसतेच आले नव्हते; तर, शहरं-उपनगरांच्याच काय; तर, गावागावांच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते; तेव्हा त्यांच्या हाती होत्या…फुकटात वाटण्यासाठी आणलेल्या शालोपयोगी वस्तू (वह्या-पुस्तके, पाटीपेन्सिल) व क्रिकेट खेळाचं साहित्य” वगैरे वगैरे…जे जागोजागच्या मराठी-नेत्यांच्या हाती, त्यांनी सोपवलं…अर्थातच, फुकटात वाटण्यासाठी आणि त्यातून नेतेपद मिरविण्यासाठी!
…आणि, सोपवल्या नोटांच्या चळती…भोळ्याभाबड्या मराठी जनसामान्यांना ‘फाजील-उत्सवप्रियते’त (सार्वजनिक पूजा-गणेशोत्सव-दहीहंड्या-गरबे-भंडारे इ. इ.) आणि विविध धर्मसंप्रदायात अडकवून ठेवण्यासाठी…जेणेकरुन, त्या ग्लानीत आणि अफुच्या नशेत… “मराठी-गुलामाला, आपल्या गुलामीची आणि फसवणुकीची जाणिवच होऊ नये!”
ते आले महाराष्ट्रात; सर्वत्र फिरले, वावरले…तेच मुळी, मराठी-ग्राहकांना भरमसाठ लुटून, मराठी-कामगारांचं अतोनात शोषण करुन व ‘करचोरी’ करुन कमावलेल्या काळ्या पैशाच्या राशी, हातात घेऊनच!
…त्या त्यांनी, मराठी-शेतकऱ्यांच्या हातात ठेवल्या..!!
…आता, फरक एवढाच पडला होता की, तो थोडाथोडका काळा पैसा पडला, शेती कसणार्या ‘भूमिपूत्र’ मराठी दरिद्री-नारायणाच्या अन् जमीन-विक्रेत्या दलालांच्या हाती…आणि, ‘मराठी-सातबारा’ पडला, ‘त्यांच्या’ हाती…!!!
…तेव्हा, ‘महाराष्ट्र’ नावाच्या आटपाट नगरीची कहाणी थोडक्यात सांगायची; तर, “महाराष्ट्रात ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते जिंकले (“Veni, vidi, vici”) …ते ही जिंकले अन् जिंकले ‘ते मराठी-नेते’ही…हरले फक्त, उपनगरं-महानगरांच्या सांदीकोपर्यात १०’ × १०’ च्या कोंडवाड्यात आणि ‘कंत्राटी-कामगार पद्धती’च्या पिंजऱ्यात श्वास अडकून पडलेले, ते ‘मराठे’!”
इतिहासात ते पानिपतावर धारातिर्थी पडले होते; आता धारातिर्थी पडले, ते शिवतिर्थावर अन् टेंभीनाक्यावर…!!!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

