दादरच्या शिवतीर्थावरच्या ‘दिपोत्सवा’चा, डोळ्याचं पारणं फेडणारा लखलखाट पाहिला…आणि, सहजच मनात आलं,
“अशा बाहेरच्या कृत्रिम लखलखाटाने अवघ्या जगण्याचा ‘कोंडमारा’ झालेल्या मराठी-घरांमध्ये…’दीप जवळी घेता पाही, अवघा प्रकाश त्याच्या ठायी’, असा आनंद व सुखासमाधानाचा, अंशाने तरी ‘प्रकाश’ पडू शकेल काय?
…गावपाड्यांच्या व नगरं-उपनगरांच्या १०’ × १०’ च्या कोंडवाड्याला, या लखलखाटाचा खरोखरीच संसर्ग जडेल काय??
…तो लक्षदिपांचा लखलखाटही कदाचित; ज्यांना, आम्ही ‘मुं.ठा.पु रा.ना’, म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक-नागपूर…असं संबोधतो; ती, मुंबईसह महाराष्ट्रातली सगळी मोक्याची शहरं बळकावून बसलेल्या, जैन-गुज्जू-मारवाडी भांडवलदारवर्गाच्या पैशाच्या बळावर तर झालेला नसावा ना?
‘काट्याने काटा काढता येतो’ हे ठीक…पण, ज्यांनी महाराष्ट्र लुटून सामान्य मराठी-घरांमध्ये अंधार पसरवलाय, त्यांच्याच देणगीच्या पैशाने मराठी-घराघरांमध्ये ‘प्रकाश’ व्हायची अपेक्षा; म्हणजे, ‘अंधाराकडून अंधार नाहिसा करण्याची अपेक्षा’, नव्हे काय???
…थोडक्यात, हा ‘दिपोत्सव’, त्या थोड्याथोडक्या समृद्ध ‘उच्चमध्यमवर्गीय’ मराठी-घरांचं प्रतिनिधित्व करतो…जो ‘स्वांत सुखाय’ जगणारा आहे; तसेच, सध्याच्या रक्तपिपासू-निर्मम-शोषक ‘भांडवली-व्यवस्थे’चा (Vampire-State System) ‘लाभार्थी’ आहे…ज्याच्या जगण्यात रोजच दिवाळी आहे व जो प्रस्थापित राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सरकारी अधिकारी किंवा काॅर्पोरेटीय-व्यवस्थापकीय क्षेत्रातला उच्चशिक्षित वर्ग म्हणून गणला गेलेला आहे…आणि, ज्याला सुकाओला दुष्काळ, नापिकी यामुळे वा ‘हमीभावा’विना तडफडणार्या शेतकऱ्यांच्या…अथवा कंपन्या-कारखान्यांमधून ‘कंत्राटी-कामगार पद्धती’च्या दुष्टचक्रात अडकवल्या गेलेल्या अभागी जीवांच्या डोळ्यातल्या अश्रुंशी, त्यांच्या घरातल्या अंधाराशी बिलकूल देणंघेणं नाही!
अयोध्येतल्या दिपोत्सवात ‘राम की पैडी’ येथे ८० हजार दिव्यांनी सजवलेली रांगोळी आणि शिवतीर्थावरचा दिपोत्सवी-लखलखाट; यात तत्त्वतः कुठलाच फरक नाही…उत्तरेतल्या काय किंवा महाराष्ट्रातल्या काय, एकूणच जनसामान्यांच्या जगण्याशी फारकत घेतलेल्या या दोन्ही बाबी, धनदांडग्यांच्या उंच महालांशी मात्र, उत्तम सूत जमवून आहेत!”
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

