“‘कंत्राटी पद्धत’ आणि ‘काळी कामगार-संहिता’ : कामगारवर्गाविरुद्धच्या नव्या गुलामगिरीचे शस्त्र!”

‘मतचोरी’तून सत्ता बळकावणारी BJP-RSS अभद्र युती; केवळ, कष्टकरी शेतकऱ्यांचीच नव्हे; तर, देशातल्या कामगार-कर्मचारीवर्गाचीही नंबर एकची शत्रू आहे…त्यांच्याकरवी, देशात ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ व ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) यांचा ‘बुलडोझर’ फिरवला जाण्यातून व समस्त कामगारवर्ग ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यते’च्या अंधारयुगात ढकलला जाण्यातून, ते क्षणोक्षणी दृग्गोचर होतयंच! एवढंच काय, आता अत्युच्चशिक्षित डाॅक्टर वर्ग (विशेषतः, काॅर्पोरेट-हाॅस्पिटल्समधील) व काॅर्पोरेटीय तंत्रज्ञ वर्ग (इंजिनिअर्स) देखील, त्याखाली भरडले जायला लागलाय.
तेव्हा, बिहार-निवडणुकीत ‘महागठबंधन-सेनापती’ तेजस्वी यादव, यांनी जरी निवडून आल्यानंतर ‘कंत्राटी-कर्मचाऱ्यां’ना नोकरीत कायम करण्याची घोषणा केली असली; तरी, त्या घोषणेचं स्वागत करताना आपल्याला खूपच तारतम्य बाळगावं लागेल….
बिहारमध्ये उद्योगधंदे फारसे नाहीतच…याचाच अर्थ, जनतेनं दिलेल्या विविध करांतून पोसले जाणाऱ्या ‘सरकारी-कर्मचाऱ्यां’पुरतीच मर्यादित असणारी, ही घोषणा असावी.
अशीच कामगारांची फसगत, दिल्ली व पंजाबमधील निवडणुकीदरम्यान ‘अरविंद केजरीवाल यांच्या AAP’ ने केली होती. तुलनेनं सरकारी-कर्मचाऱ्यांना नोकरीत ‘कायम’ करणं, ही बाब अगदी किरकोळ आहे; कारण, यातून देशातल्या कामगार-कर्मचारीवर्गाचं टोकाचं शोषण-अन्याय करणाऱ्या राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय काॅर्पोरेट्सना कुठलंही आव्हान दिलं जात नाही…’कायम’ करण्यासाठी जे काही अंशदान केलं जातं; ते जनतेच्या पैशातून…भांडवलदारांच्या तिजोर्‍यांतून नव्हे! कारण, त्यांच्याच मोठमोठ्या देणग्यांतून निवडणुका लढवल्या जातात व राजकीय पक्ष चालवले जातात!

…म्हणूनच, ‘राष्ट्रीय-संपत्ती’ निर्माण करणाऱ्या कामगारांविषयी खरोखरीच आस्था असेल; तर, त्यांचे माणुसपणाचे रास्त हक्क व संपत्ती-निर्मितीतला त्यांचा न्याय्य वाटा मिळवून देण्यासाठी…सार्वजनिक क्षेत्रासह *’खाजगी उद्योग व सेवा क्षेत्रा’तील ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ व ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) सत्तेवर येताच रद्द करण्याची, राहुल गांधींच्या ‘इंडिया आघाडी’ने घोषणा करावीच…देशभरातला तमाम कामगार-कर्मचारीवर्ग, त्यांना वर्ष-२०२९ला सत्तेचा सोपान खात्रीपूर्वक चढण्याच्या मतदान-प्रक्रियेत मोठ्याप्रमाणावर सहाय्यभूत होईलच!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)