‘पाईल्स’ (मूळव्याध) झालेला मनुष्य जसा कुथत-कुंठत जगतो; तशी ‘एपस्टिन-फाईल्स’मुळे भाजप-संघीय सत्ताधाऱ्यांची मोठी कठीण व अवघड अवस्था झालीय! ते देश चालवत नसून, फक्त ‘भाजप पक्ष आणि संघ’ एवढ्या दोनच गोष्टी चालवतायत…ते देश चालवत नसून, त्यांनाच वाॅशिंग्टन आणि तेल अव्हिवमध्ये बसलेले दुसरेच कुणी चालवतायत; आणि, तिथून इशारे आले की, त्यांना चक्क पाकिस्तानच्याही प्रेमाचे उमाळे येतात. यांनी सत्तेवर आल्यानंतर कधि इराण-रशियाने स्वस्त दरात पुरवलेल्या तेलाचा जनतेला फायदा मिळू दिला नाही आणि आता, हे दोन्ही देश जाहिरपणे सांगतायत की, आजही आम्ही आमच्या परंपरागत मित्राला स्वस्तात तेल पुरवायला तयार आहोत; तरीही, ‘एपस्टिन-फाईल्स’च्या भितीमुळे आणि गौतम अदानीला वाचवण्याच्या नादामुळे…तसेच, ‘पेगॅसस’ हे हेरगिरी करणारं इस्रायली छुपं ‘सॉफ्टवेअर’, विरोधक-पत्रकार-न्यायाधीश वगैरे प्रभृतींच्या मोबाईलमध्ये टाकण्याच्या सोयीमुळे…आमचं कर्मदरिद्री व ‘मतचोरी’ (Vote-Chori) करुन सत्तेवर आलेलं भाजप-संघीय सरकार, ते तेल घ्यायला नकार देतंय…आणि, भारतीय जनतेला ऊर्जासंकट व महागाईच्या झळा सोसायला लावतेय…धन्य धन्य ते, जनतेच्या तोंडाला फेस आणणारं व गळ्याला फास लावणारं, तथाकथित ‘हिंदुत्ववादी’ सरकार!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

